मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

२०१४ आधी आणी नंतर

पॅट्रीक जेड · · राजकारण
पडले पूल, पडले छत, २०१४ आधी पडत नव्हते का? मेले लोक चेंगराचेंगरीत, २०१४ आधी मरत नव्हते का? समस्या जुनी, पण आवाज नवा, कोण बदललं, कोण विचारेल का? चुकीच्या हातात सत्ता दिली, कळलं नाही, कोण भुललं का? नवीन वाद, जुने प्रश्न, उत्तरं मात्र राहिली तशीच. स्वप्न दाखवून, फसवणूक झाली, झाली चूक, जनता न शिकली. विचार करावा आपण, मंथन करावे, काय फरक, काय बदल घडले? दोष देऊन संपत नाही काही, दोष काढून, काम चालले. पडले पूल, पडले छत, २०१४ आधी पडत नव्हते का? सर्व मिळून शोधू उत्तर, की बदल खरोखर घडले का?

वाचने 5806 वाचनखूण प्रतिक्रिया 14

कर्नलतपस्वी Sat, 07/06/2024 - 18:36
पडले पूल, पडले छत, २०१४ आधी पडत नव्हते का? मेले लोक चेंगराचेंगरीत, २०१४ आधी मरत नव्हते का? कवीता समयोचित आणी भारी. लगे रहो.

आंद्रे वडापाव Sun, 07/07/2024 - 12:14
२०१४ आधी , आरडाओरड करणार्यांना देशद्रोही मानलं जायचं का ? २०१४ आधी , शेतकरी आंदोलनाला खालिस्तानी आंदोलन म्हटलं जायचं का ? २०१४ आधी पंप्र खोट्या पदव्या दाखवाव्या लागायच्या का ?

आग्या१९९० Sun, 07/07/2024 - 12:55
बघा ना ! फुटपट्टी पण २०१४ आधीची वापरतात.अद्याप नवीन केलीच नाही. यदाकदाचित केलीच तर ती अचूक होईल की नाही ह्याची त्यांनाही खात्री नसावी.

आंद्रे वडापाव Sun, 07/07/2024 - 13:37
ह्या पंप्र ला एक मराठी शब्द बिरूद चपखलपणे बसते... " थापाड्या "... ह्याच्या आधीच्या कुठल्याही पक्षाच्या कुठल्याही पंप्र साठी हा शब्द कोणालाही वापरावासा वाटला असेल...

In reply to by आंद्रे वडापाव

आंद्रे वडापाव Sun, 07/07/2024 - 16:30
ह्या पंप्र ला एक मराठी शब्द बिरूद चपखलपणे बसते... " सोंगाड्या "... ह्याच्या आधीच्या कुठल्याही पक्षाच्या कुठल्याही पंप्र साठी हा शब्द कोणालाही वापरावासा वाटला असेल...???