Skip to main content

काळाची उबळ

लेखक माहितगार यांनी शुक्रवार, 10/11/2017 13:18 या दिवशी प्रकाशित केले.
खोकल्याची उबळ यावी तशी आज मला काळाची उबळ आलीए, तरुणाई तर म्हणते ती सगळ सर करत चालली पण त्यांचे सर तर मला खाली दिसतात आणि पाय हवेत ! खोकल्याची उबळ यावी तशी आज मला काळाची उबळ आलीए, जेव्हा माणूस विचार करावयास शिकला तेव्हा पासून मला कलीयुगच दिसत तो माकड होता तेव्हा सुखी होता कदाचित ते सुख मला वापस हवय स्वछंद माझ्या स्वप्नातल्या सारखं पण त्यांच्या स्वप्नातल्यासारख नसलेल. सगळच कसं सडक नासलेल दिसतय आज गुन्हेगारी आभाळाला टेकली राक्षसी प्रवृत्ती वाढीस लागली महागाईचा पारावर गेला प्रदुषणाने कळस केला प्रगती कशी प्रतिगामी झाली प्रत्येक स्त्रीची अब्रू गेली प्रत्येक पुरुषाचे वस्त्रहरण झाले स्

शिवमानसपूजा

लेखक शरद यांनी शुक्रवार, 10/11/2017 07:01 या दिवशी प्रकाशित केले.
शिवमानसपूजा आपण घरी देवाची पूजा करतो तेव्हा शक्य असेल त्याप्रमाणे देवाला अंघोळ घालतो, गंध लावतो, फुले वाहतो, उदबत्ती लावतो, घंटा वाजवतो एखाद दुसरे स्तोत्र म्हणतो. व हे सर्व आपल्या सोयिस्कर वेळेनुसार.करतो. खरी पंचाईत होते जेव्हा आपण सहली निमित्त बाहेरगावी जातो व एखाद्या देवळात जाण्याचा प्रसंग येतो तेव्हा. तेथे ह्यापैकी काहीच शक्य नसते. अशा वेळी काय करावे ? आद्य शंकराचार्यांनी तुमची सोय करून ठेवली आहे. मानसपूजा. ईश्वराला बाह्योपचाराची अपेक्षा नाही. हे सर्व तुम्ही केवळ मनातल्या मनातही करू शकता. क्से ? बघा.

काल: क्रीडति (भाग २) - अधिकमास आणि क्षयमास.

लेखक अरविंद कोल्हटकर यांनी गुरुवार, 09/11/2017 23:31 या दिवशी प्रकाशित केले.
काल: क्रीडति (भाग २) - अधिकमास आणि क्षयमास. भाग १ - आठवड्याचे सात दिवस. अतिप्राचीन कालामध्ये कालगणनेची नैसर्गिकपणे उद्भवलेली पहिली संकल्पना ’दिवस’ असे निश्चितीने म्हणता यावे. एका सूर्योदयापासून दुसर्‍या सूर्योदयापर्यंत लोटणारा काळ म्हणजे एक दिवस. तो प्रत्येक मानवाला सहजच जाणवतो. त्या नंतरची निर्माण झालेली संकल्पना म्हणजे मास किंवा महिना. अमावास्या १ म्हणजे सूर्य-चंद्र युती किंवा सूर्य आणि चन्द्र ह्यांचे रेखांश (Right Ascension) सारखे असणे. अशा एका अमावास्येपासून त्याच्या पुढच्या अमावास्येपर्यंतचा कालावधि म्हणजे एक चांद्रमास होय.

शेजाऱ्याचा डामाडुमा - भारत आणि सख्खा शेजारी मालदीव - भाग १

लेखक अनिंद्य यांनी गुरुवार, 09/11/2017 16:48 या दिवशी प्रकाशित केले.
प्रस्तावना: माझ्या 'शेजाऱ्याचा डामाडुमा' (http://www.misalpav.com/node/38362) ह्या मालिकेतील नेपाळबद्दलची लेखमाला मिपावर बऱ्याच लोकांनी वाचली. काहींनी इथेच लेखांवर उत्साहवर्धक प्रतिक्रिया देऊन तर काहींनी व्यक्तिगत संदेश पाठवून लेखन आवडल्याचे सांगितले. इथे वाचून काहींनीं अन्य माध्यमांमध्ये लिहाल का अशी विचारणा केली. बरे वाटले, आनंद झाला. यथावकाश पुढचा देश कोणता, पुढे कधी लिहिणार अशी प्रेमळ दटावणीही झाली. आज -उद्या करता करता बरेच दिवस झाले, लेखन काही पुढे सरकत नव्हते.

गरुडाचे घरटे आणि घरट्यातील हत्ती

लेखक हेमंत ववले यांनी बुधवार, 08/11/2017 19:31 या दिवशी प्रकाशित केले.
आजपर्यंत वेगवेगळ्या ऋतुंमध्ये, अनेक वेळा तोरणा किल्ला पाहण्याची संधी मिळाली. प्रत्येक ऋतुमध्ये तोरण्याचे वेगळेच रुप बघावयास मिळते. तोरणाच काय, सह्याद्रीतील प्रत्येक किल्ला ऋतुमानानुसार रुप पालटतो.

इंडीयन डिमन डे -३०१६ कहाणी एका सणाची !

लेखक रामदास यांनी बुधवार, 08/11/2017 16:28 या दिवशी प्रकाशित केले.
१००० वर्षांनंतर भारतात साजरा होणार्‍या एका सणाचे हे वर्णन आहे." मुलांच्या पुस्तकातला हा धडा अर्थातच इंग्रजीत आहे. मुलांनो, आपण दरवर्षी इंडियन डीमन डे साजरा करतो. खरे म्हणजे हा डीमन डे म्हणजे दैत्याचा दिवस असा गैरसमज तुमच्या मनात झाला असेल तर तो काढून टाका.

"मागोवा रायगडाच्या काही अपरिचित वाटांचा"

लेखक दिलीप वाटवे यांनी बुधवार, 08/11/2017 15:47 या दिवशी प्रकाशित केले.

"मागोवा रायगडाच्या काही अपरिचित वाटांचा"

. पुण्यातील ट्रेकींग क्षेत्रात अग्रगण्य असणाऱ्या 'पुणे व्हेंचरर्स' या संस्थेचा आणि माझा घरोबा तसा जुनाच. माझा या संस्थेशी संबंध येण्यापूर्वीही मी ट्रेकींग करीत असे पण पुणे व्हेंचरर्सच्या गोतावळ्यात दाखल झालो आणि ट्रेकींग करण्याची एक नवीन दिशा मिळाली. म्हणतात ना की गुरू मिळाल्याखेरीज तुमचं जीवन समृद्धच होत नाही त्याचप्रमाणं इथं आल्यावर मला देखील अनेक गुरू मिळाले.