हिवाळी भटकंती: सुधागड, भोरपगड( Sudhagad, Bhorapgad)
औरंगजेबाच्या कराल मगरमिठीतून महाराजांची सुटका झाली आणि राजगडावर परतल्यानंतर त्यांनी एकुणच जयसिंगाचे आक्रमण आणि आग्रा भेट याचा सकल विचार करून काही महत्वाचे धोरणात्मक निर्णय घेतले. स्वराज्याची राजधानी राजगडावरून हलवणे हा त्यापैकी एक महत्वाचा निर्णय. राजगड बेलाग तर होताच, पण तो पठारी प्रदेशात वसलेला. मागे शाहिस्तेखानाच्या स्वारीच्या वेळी मोगली फौजानी काही पायथ्याच्या गावात जाळपोळ केलेली. त्यात जसा पुरंदरला वेढा पडला, तसा भविष्यात एखाद्या सरदाराने राजगडाला वेढा घातल्यास, अडचणीचे होईल, हे ओळखून एखाद्या बेलाग आणि शत्रुला सहजासहजी पोहचता येणार नाही अश्या गडावर राजधानी हलवने आवश्यक होते.
मिसळपाव