Skip to main content

आज पडलेलं स्वप्न

लेखक nishapari यांनी मंगळवार, 07/11/2017 01:25 या दिवशी प्रकाशित केले.
आज दुपारी झोपले असताना पडलेलं स्वप्न .. यात काही माणसंही होती पण ते बहुधा निरर्थक होतं .... सुरुवात अशी झाली की कोणतंतरी नाटक होणार आहे , स्टेज लागलं आहे , माणसं येऊन खुर्च्यांवर बसली आहेत . गर्दी जमली आहे . आणि मी विंगेत नाटकातल्या 2 कलाकार मुलींना नाटकाचे भरजरी कपडे , दागिने , वेणी वगैरे चढविण्यासाठी मदत करत आहे ... त्यातली एक मुलगी माझी मैत्रीण आहे . तिथून पुढचा सिन - मी मागच्या रांगेतल्या एका खुर्चीवर येऊन बसते नाटक पाहण्यासाठी , ही जागा मला त्या दोघींपैकी कुणीतरी मिळवून दिली आहे नाहीतर गर्दीत जागा मिळणं शक्य नव्हतं ..... तिकीट बिकिट प्रकार नसावा ....

मनातल्या मनात मी...

लेखक सत्यजित... यांनी सोमवार, 06/11/2017 23:14 या दिवशी प्रकाशित केले.
मनातल्या मनात मी तुलाच गुणगुणायचे अशीच मी,कधीतरी.. तुझ्यासवे जगायचे! तुटून तारका क्षणात आसमंत लांघते उगाच रात्र-रात्र मी नभात चमचमायचे! गुलाब-पाकळ्यांतुनी तुझी गझल घुमायची उरात लाख मोगरे सुरात घमघमायचे!
काव्यरस

हे टाळता आले असते?- २ एअर कॅनडा फ्लाईट १४३

लेखक लाल टोपी यांनी सोमवार, 06/11/2017 22:49 या दिवशी प्रकाशित केले.
वारिग फ्लाईट २५४ चा लेख आपण मिपाच्या दिवाळी अंकात वाचला असेलच. मुळात या विषयावर एक मालिका करण्याचा विचार होता मात्र तसा उल्लेख करणे राहून गेले होते. त्यानुसार या मालिकेतील दुसरा लेख प्रकाशित करीत आहे... दिनांक २३ जुलै, १९८३ एयर कॅनडा ची फ्लाईट १४३ विमान वाहतूक क्षेत्रातील एका असामान्य घटनेची साक्षीदार आहे. canada वैमानिक पियर्सन आणि सहवैमानिक क्विंटल त्या दिवशी सकाळी मॉंट्रेयलहुन एडमॉन्टन ला नियमित जाणारे विमान उड्डाणासाठी तयारी करीत होते.

कोकण दर्शन

लेखक आमि तिथे काय कमि यांनी सोमवार, 06/11/2017 16:22 या दिवशी प्रकाशित केले.
मी माझ्या कुठुंबासह (७ जण मोठे २ जण लहाण) कोकण दर्शन प्लान करतोय पुण्याहून . कोकणात ही माझी पहिलीच ट्रिप आहे,इथे बरेचजण कोकणातले असल्याने/ कोकणात जाऊन आले असल्याने मदत करु शकतील असे वाटले. ३ दिवसात काय काय पहाता येइल? साधारण टूर प्लान कसा करावा? रहाण्यासाठी/जेवणासाठी शक्यतो घ्ररगुती चांगली ठिकाणे माहिती असतील तर सुचवाल का प्लीज?

डिश टीव्ही व ग्राहक मंच चा अनुभव

लेखक अलबेला सजन यांनी सोमवार, 06/11/2017 14:49 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार.. मी डिश टीव्ही चा गेले ३ वर्ष ग्राहक आहे. इतके दिवस त्यांची सेवा सुरळीत चालू होती. मात्र १८.१०.२०१७ रोजी मला एक विचित्र अनुभव डिश टीव्ही कडून मिळाला त्याबद्दलचे हे अनुभवकथन. दि. १८.१०.२०१७ रोजी मी संध्याकाळी नेहमीप्रमाणे झी मराठी वरील कार्यक्रम बघत होतो. ८.१० मिनिटांनी अचानक माझ्या टीव्ही वरील प्रसारण बंद झाले व तेथे “तुमचा balance संपला आहे, रिचार्ज करा” असा मेसेज झळकू लागला. मला काही समजेना कारण माझ्या खात्याला पुढचे ६ महिने पुरेल इतका रिचार्ज मी करून ठेवला होता. मग नेहमी प्रमाणे एकदा टीव्ही व डिश बंद करून चालू करून पहिले पण तोच मेसेज दिसत होता.

ऐसपैस अंगण

लेखक जागु यांनी सोमवार, 06/11/2017 12:04 या दिवशी प्रकाशित केले.
अंगण म्हणजे घराचंच एक अंग जे घराबाहेर असूनही घराइतकंच जिव्हाळ्याचं असत. ऊन, पाऊस, दव झेलत आकाशाच्या प्रेमात पडलेलं असत. प्राजक्ताच्या सड्याच्या सुगंधी रांगोळीने ते बहरलेलं असत, रातराणीच्या सुगंधाने दरवळलेलं असत, गार गार वार्‍याच्या झुळूकेने शहारलेलं असत, कधी चंद्रदीपात तेवत असत तर कधी चांदण्यांचं शीतल पांघरूण घेऊन शांत पहुडलेलं असत. हल्ली वाढत चाललेल्या बिल्डिंगमुळे अंगणं लोप पावत चालली आहेत व आधुनिक घर/बंगल्यांच्या रचनेतील अंगणांचे स्वरूप बदलले आहे. आमच्या उरणमध्ये अजून काही पारंपरिक तर काही बदलत्या स्वरूपातली अंगण संस्कृती कुठे कुठे जपली आहे ह्याच समाधान वाटत.

अश्वत्थामा

लेखक ज्ञानोबाचे पैजार यांनी सोमवार, 06/11/2017 10:13 या दिवशी प्रकाशित केले.
मनाच्या एका खोलवर अंधार्‍या कप्प्यामधे कुठेतरी दडपून टाकलेली तूझी आठवण,.... कधीतरी उफाळून बाहेर येतेच अचानक, मला नकळत...... आणि मग कोरड्या पडलेल्या जखमा परत भळभळू लागतात मनावर मोठा दगड ठेवून तूला लिहिलेले ते शेवटचे पत्र इतक्या वर्षां नंतरही....

इंगळी

लेखक जव्हेरगंज यांनी रविवार, 05/11/2017 23:11 या दिवशी प्रकाशित केले.
चुलीतलं लाकूड तापून लालबुंद झालं होतं. निखारा तप्त होता. आग भडकली होती. छकुलीनं साडी वर करून पिंडरीला उगाचच एक चटका दिला. "आईSss गं.." "काय झालं वैनी.." मास्तरानं भुरका भरत विचारलं. "काय नाय जी... इस्तू लागला जरा.." चुलकांडातली लाकडं तिनं बाहेर काढली. "हिकडंच येत जावा की जेवायला... त्या डब्यातलं कसं खाव रोज.." "सवय झालीय आता... परगावातली नोकरी म्हटलं की अडचणी या आल्याच..." मास्तरनं भातात अजून थोडं वरण ओतलं. अन पुन्हा एक भुरका भरला. "मग बायकुच करावी की एकांदी.." छकुलीनं परातीत पाणी ओतलं. कंदिलाच्या अंधुक प्रकाशात मास्तर तिला लाजून गेल्यासारखा भासला.

नेणिवेला जाणिवेने छेदता...

लेखक अनन्त्_यात्री यांनी रविवार, 05/11/2017 18:11 या दिवशी प्रकाशित केले.
नेणिवेला जाणिवेने छेदता जे उरतसे ते पुरे समजून घेणे कधिच का सोपे नसे? या क्षणी ते स्तंभ भासे, शूर्प ते पुढच्या क्षणी पाहू मी गजरूप कैसे, नेत्र माझे झाकुनी कोणी त्या म्हणतात माया; वास्तवाचा विभ्रम कोणी त्या म्हणती अविद्या; सर्जनोद्भव संभ्रम वास्तवाचे रूप कैसे? कोण जाणे सर्वथा? ज्ञेय-ज्ञाता भेद फिटता शेष आदिम शांतता
काव्यरस

Making of photo and status : ५. गगनभरारी!

लेखक सचिन काळे यांनी रविवार, 05/11/2017 08:45 या दिवशी प्रकाशित केले.
प्रस्तावना : ज्यांची प्रस्तावना वाचायची राहून गेली असेल, त्यांनी ती वाचण्याकरिता कृपया खाली दिलेल्या लिंकवर हळुवारपणे टिचकी मारावी. http://www.misalpav.com/node/41232 तु नि:शंकपणे गगनात भरारी घे पिल्ला. घाबरू नकोस, आम्ही तुझ्या पाठीशी आहोत.....