बोब्बी..एक लोककथा
बोब्बी..एक लोककथा
एका गावात एक ब्राह्मण रहात असतो..त्याला ३ सुंदर कन्या असतात.पण त्या तिघित पण वाचा दोष असतो म्हणजे तिघिहि बोबड्या बोलायच्या..
मुली लग्नाला आलेल्या असतात..
मुलाकडचे मुलिस पसंत करायचे पण ्ति बोबडे बोलायला लागली कि नकार द्यायचे.
नकार घंटा ऐकुन बिचारा पिता दुखी होत असे..
त्या गावात एक लग्नाळु ब्राह्मण येतो..
वधुपिता ब्राहमण त्याला हेरतो व त्याची आपुलकिने चौकशी करतो..
व त्याला सांगतो कि मला ३ लग्नाळु मुली आहेत ..दिसायला सुंदर ग्रुहकृत्य दक्ष आदी आहेत
तिघी पण पाठच्या आहेत आपणास जी पसंत असेल तिच्याशी मी आपले लग्न लाऊन देईल..
लग्नाळु ब्राह्मण त्या प्रस्तावाला होकार देतो...
आनंदित झालेला वधुपिता त्याला भोजनाचे निमंत्रण देतो..
घरी आल्यावर तो मुलिना ही वार्ता सांगतो..
व मुलिना तंबी भरतो की काहि झाले तरी तुम्हि बोलण्या साठी अजिबात तोंड उघडु नका..
मुली बडबड्या असतात..पण बाबा ना "अजिबात तोंड उघडणार नाहि" असे सांगतात....
पहाण्या च्या दिवशी तिनही कन्या छान स्वयंपाक बनवतात..
मुगाच्या डाळीची खिचडी,,पोळ्या .भरले वांगे ..गोळे घातलेली कढी शिरा आदी साग्र संगीत बेत असतो
जुजबी गप्पा झाल्यावर वधुपिता म्हणतो.." भुक लागली असेल ना?..आधी भोजन करु मग बाकिच्या गप्पा शांत पणे मारु..
जेवण तयारच होते मुलींनी पाने वाढली
लग्नाळु बेत पाहुन खुश होतो..त्याने "गोळ्याची आमटी" हा प्रकार प्रथमच चाखला असतो..
पित्या कडे बघत व मुलिना ऐकु जाइल अश्या स्वरात तो म्हणतो.."स्वयंपाक छान झाला आहे..खास करुन "कढी गोळे...कसे बनवतात हे कढी गोळे घरी ट्राय मारिन.."
हे ऐकताच पहिली कन्या म्हणाली
पोप्प हाय,,हिंग जीये मसाला ..कयी गोये कराया...(हिंग जीरे मसाला कढी गोळे कराया)
त्यावर २ नं कन्या म्हणाली..कय गे मी नाय बोय्यी तु का बोय्यी..(काय ग? मी नाहि बोलली तु का बोलली?)
त्यावर तिसरी कन्या म्हणाली..बग ना बोय्यी तर बोय्यी .वर बोब्ब बोय्यी.( बघ ना बोलली तर बोलली वर बोबड बोलली
तिघीं चे बोबडे बोल ऐकताच लग्नाळु च्या घशात कढी गोळे आडकतात.
जेेण संपल्वयावर व हात धुतल्यावर पित्याने लग्नाळुस विचारले..काय निर्णय झाला??
घाबरलेला लग्नाळु म्हणाला " १ महिन्या नंतर आइ बाबा येणार आहे त्यांच्याशी चर्चा झाली की कळवतो..असे सांगुन त्याने सु बाल्या करत आपली सुटका करुन घेतली
वाचने
5531
वाचनखूण
प्रतिक्रिया
12
अले व्वा. चान चान.
त्यापेक्षा कढी गोळ्यांची पाकृ
जबरदस्त कथा.
In reply to जबरदस्त कथा. by प्रसाद_१९८२
अगदी अगदी.. हेच लिहिणार होते.
काका. त्याला "कलाटणी मिळाली
कथेचे तात्पर्य . . . . .
काका, खरं सांगा एवढ्यात
कढी गोळे घरी ट्राय मारिन.
खर तर ब्राम्हणाला अजून एक
In reply to खर तर ब्राम्हणाला अजून एक by ज्योति अळवणी
गोष्ट इथेच संपत नाही
हीहीही ची स्मायली
थरारक... क्येसं उभी राह्यली..