दिवेआगार / मोडलेली कंबर / दोन निर्मनुष्य समुद्रकिनारे
दिनांक २२ जानेवारी २०१६
रात्रीचे सव्वा दहा वाजलेत, केदार, श्रीहास, अमोल आणि विशाल पुण्याला पोहचत आहेत. मी सुद्धा दुकान वाढवून घरी पोहोचलोय. इतक्यात केदारचा फोन आलेला,
केडी :- निघालास का रे?
मी :- आत्ताच घरी पोहोचलोय, जेवनार आणि निघणार.
आणि ..........
धप्प. धडाम.
केडी :- का रे कसला आवाज येतोय?
मी :- काही नाही. बारा वाजता निघेन, सकाळी ६ वाजेच्या आसपास शिवाजीनगरला घ्यायला या.
फोन बंद.
च्यामारी असा कसा पडलो? दिवे लावून बघितल, पायात मोज़े आणि गुळगुळीत फरशीवर पडलेल्या कपड्या वरुण पाय सटकला आणि जोरात पडलो. ठीक आहे, पडलो आणि उठलो. काय झाल?
मिसळपाव