(किती लौकर आज उजाडलं बाई)............निकोलोडिऑन व्हर्शन
लेखनविषय:
काव्यरस
पाभेअंकलची सॉरी मागून हे लिहित आहे,
माफी असावी. वय पाहून दुर्लक्ष्य करावे.
.............................
किती लौकर आज उजाडलं बाई
स्कूलच्या होमवर्काला काळवेळ नाही
काल रात्री बघत बसलो छोटा भीम
एवढी नाय भारी त्याची सध्याची थीम
कंटाळून शेवटी रिमोट फेकून मारला
हाय....
बाबांनी टीव्ही बंद करुन उठवले
बेडवर टाकून लाइट बंद केले
अंधारातून तो भीम रोखूनी पाही
किती लौकर आज उजाडलं बाई
चौकडी चौकडी युनिफॉर्म घालून अंगा
चप्प तेल लावून आईने पाडले भांगा
पाठीशी लावली सॅक, वॉटरबॅग हातात
टिफीन गळतोय, रंगीत आयकार्ड गळ्यात
कमरी रंगीत पट्टा अन शूज पायी
इतके सारे घेऊन कुठे जाउच वाटत नाही
किती लौकर आज उजाडलं बाई
किती सांडावं किती पुसावं
गोड बिस्कीट गुपचूप कसं खावं
वाटे स्कूलबसचा आज ड्रायव्हर व्हावे
सगळ्यांना मागे टाकून पुढेच राहावे
पोलीसमामा मागे येता सायरन वाजवावी
कशी वाजते ते मात्र माहीतच न्हाई
किती लौकर आज उजाडलं बाई
- आभे
थड्ड स्ट्न्डर्ड, जास्मिन ग्रुप
लिटिल एंजल्स स्कूल.
(आमच्या स्कूलमध्ये निंजा हातोडी आणि डोरेमान हायेत)
वाचने
7598
वाचनखूण
प्रतिक्रिया
32
हम्म.
In reply to हम्म. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
कुणाला "फार छ्छान करता हो
In reply to कुणाला "फार छ्छान करता हो by अभ्या..
:(
In reply to :( by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
म्हणजे, आज मौन व्रत हाय
In reply to :( by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
'' खामोशिया हि बेहतर है
In reply to कुणाला "फार छ्छान करता हो by अभ्या..
=))
अगागागागा. =))
In reply to अगागागागा. =)) by प्रचेतस
ते निकोलोडिऑन म्हणजे काय नै
In reply to ते निकोलोडिऑन म्हणजे काय नै by सतिश गावडे
ओह्ह =))
In reply to ओह्ह =)) by प्रचेतस
निकलओडियनऐवजी
तिसरी च्या मानानं बरं जमलंय.
और ये हय विडम्बन करनेकी निंजा
डिंग डिंग=))
अग्गाग्गा =))
ह्ही ह्ही ह्ही!
खरे तर लवकर किती उजाडले आहे
:) एकदम क्यूट कविता. आवडली.
विडंबन जरी नसले असते तरी
कार्टुन चित्र कुssssठंsssय?
इतके सारे घेऊन कुठे जाउच वाटत
किती लौकर उजाडलं झाली घाई
In reply to किती लौकर उजाडलं झाली घाई by अत्रुप्त आत्मा
वावर, त्याची साईड आणि बसणे हा
In reply to वावर, त्याची साईड आणि बसणे हा by प्रचेतस
ह्या बाबतीत सदर प्रति क्रीयक
In reply to ह्या बाबतीत सदर प्रति क्रीयक by अत्रुप्त आत्मा
हो.
In reply to हो. by प्रचेतस
स्व-रूपाला दुजोरा दिल्याबड्डल
In reply to स्व-रूपाला दुजोरा दिल्याबड्डल by अत्रुप्त आत्मा
चालू दया अता निरर्थक
In reply to चालू दया अता निरर्थक by प्रचेतस
आभार माना
In reply to चालू दया अता निरर्थक by प्रचेतस
@चालू दया अता निरर्थक
In reply to स्व-रूपाला दुजोरा दिल्याबड्डल by अत्रुप्त आत्मा
हार्डिक
In reply to किती लौकर उजाडलं झाली घाई by अत्रुप्त आत्मा
वा, अत्यंत सामाजिक शिघ्र
अलेले
हायला