Skip to main content

हिरवीन

लेखक चांदणे संदीप यांनी मंगळवार, 24/05/2016 12:53 या दिवशी प्रकाशित केले.

नस्त्या उचापती- 2

लेखक अन्नू यांनी मंगळवार, 24/05/2016 11:40 या दिवशी प्रकाशित केले.
शनिवारचा दिवस. संध्याकाळी मी नुकताच बाहेरुन आलो होतो. इतक्यात आईने- ताईचा फोन आल्याची बातमी दिली आणि त्याचबरोबर भाईंदरला जाऊन दोघा मुलांचा रिझल्ट आणण्याची आठवण पुन्हा करुन दिली. ऐकून जरा आनंद वाटला पण त्याचबरोबर थोडासा मुडही ऑफ झाला. आनंद यासाठी कि दोघांचा रिझल्ट एकाच दिवशी नव्हता. दोन वेगवेगळ्या दिवशी होता. म्हणजे अठ्ठावीस आणि एकोणतीसला. कारण भाचा सिनिअरला होता, तर भाची ज्युनिअरला! साहजिकच मला दोन दिवस भाईंदरमध्ये राहावं लागणार होतं.

आम्ही मुळ्ळी रागावत नाही!

लेखक प्राची अश्विनी यांनी मंगळवार, 24/05/2016 11:03 या दिवशी प्रकाशित केले.
(अत्रन्गि पाउस यांच्या बाल संगोपनातील एक वास्तव या लेखावरून हे पूर्वी लिहिलेलं काही आठवलं. ) काय सांगू तुम्हाला! अशी एकेक विचित्र माणसं असतात ना. परवाचीच गोष्ट. आमच्या ह्यांच्या एका स्नेह्यांकडं गेलो होतो, आमच्या बंटीला घेऊन. बंटी? अहो आमचा सुपुत्र! वय वर्षे साडेतीन. पण इतका हुश्शार म्हणून सांगू, भाssरी चौकस! हं, तर त्यांच्या शोकेसमध्ये इतक्या वस्तू होत्या ना! स्वित्झर्लंडची घंटा, हॉलंडची पवनचक्की, युरोपातल्या काचेचा पेला, काय अन काय! आता लहान मूल म्हटल्यावर जिज्ञासा की काय म्हणतात ते असणारच नाही का?

वड्याचं तेल

लेखक सस्नेह यांनी सोमवार, 23/05/2016 12:44 या दिवशी प्रकाशित केले.
‘बोला परळकर, तुमचा कशानं सत्कार करायचा ? नुसती नोटीस चालेल का चार्जशीट पायजे ?’ ‘नाही साहेब,...’ ‘असं कसं, कायतरी घ्यावंच लागेल की !’ ‘साहेब या महिन्यात टार्गेट जरा कमी झालं.’ ‘जरा ? बारा लाख म्हणजे जरा ? कुठली गाडी वापरता ?’ ‘आं ? हां हां, आय टेन साहेब..’ ‘विकली तर येतील का बारा लाख ? नाय म्हणजे ‘जरा’ नुकसान होईल तुमचं ! चालतंय की ! काय ?’ ‘....’ ‘भ**हो, जरा लाज बाळगा. कंपनी पगार देते लाख लाख रुपये ते कुणाच्या **त घालायला ? पगाराचं जाउदे एक, निदान कंपनीच्या कृपेनं खाल्ल्या पैशाला तरी जागा ? **खाली गाडी दिलीय ना कंपनीनं ? फिरा लेको जरा फिल्डवर आणि पयशे आणा !

भारतीय आणि नग्नता

लेखक अनाहूत यांनी सोमवार, 23/05/2016 11:03 या दिवशी प्रकाशित केले.
आपल्याकडे नग्नता या शब्दाकडे आणि विषयाकडे अशा काही नजरेने पाहिले जाते कि अगदी काही गुन्हा किंवा पाप केलेले आहे . बाकी प्रत्येक जणच जन्माला येताना बिना कपड्यांचाच जन्माला येतो पण काही लोकांचा आक्षेप असू शकतो कि जन्माला येताना तर कुणाला बोलायला आणि चालायला आणि इतरही अनेक गोष्टी येत नाहीत पण त्या पुढे तो शिकतो ना मग या बाबतीतही तस का नाही . बाकी या बाबतीत कपडे नक्की का घालावे आणि का नाही हाही एक मुद्दा असू शकतो अगदी लज्जा रक्षण , injury पासून बचाव , ऊन थंडी यापासून बचाव आणि अशी अनेक कारणे दिली जाऊ शकतात .

महाराष्ट्राचे माहेरघर.....

लेखक हृषिकेश पांडकर यांनी सोमवार, 23/05/2016 10:45 या दिवशी प्रकाशित केले.
निसर्गाच्या झोळीतून पुण्याने गोष्टी ओरबाडून घेतल्या आहेत.पाटीवर दोन थेंब टाकून पाटी तिरकी केल्यावर जसे थेंब ओघळतात त्याप्रमाणे संपूर्ण शहरभर वाहणाऱ्या मुळा-मुठा,पेन्शनर पुणेकरांच्या तब्ब्येतीची काळजी घेणाऱ्या टेकड्या,तक्क्याला टेकून बसावे तसे डाव्या बाजूला पसरलेला सह्याद्री,हवामानाच्या जमून आलेल्या भट्टीमुळे दिसत असलेली हिरवळ आणि मोजून मापून असलेल्या पुणेकरांना पचेल आणि रुचेल असे मोजून मापून उन,वारा,पाऊस देखील.

देशी पद्धतीचा मसाला पास्ता

लेखक विद्यार्थी यांनी सोमवार, 23/05/2016 06:19 या दिवशी प्रकाशित केले.
देशी पद्धतीचा मसाला पास्ता मुलांना सुट्ट्या लागून बरेच दिवस झाले असल्यामुळे ही पाककृती मिपावर टाकायला अंमळ उशीरच झाला आहे. रोज संध्याकाळी खायला मुलांना वेगवेगळे पदार्थ करून देऊन आया खरंच थकून जातात. हा देशी पद्धतीचा मसाला पास्ता अजून एक पर्याय म्हणून नक्की उपयोगी पडेल अशी अपेक्षा आहे. बहुतेक सर्व मुलांना पास्ता आवडतो त्यामुळे इतरवेळी भाज्या न खाणाऱ्या मुलांना पास्त्याच्या निमित्ताने थोड्या भाज्या खाऊ घालण्याची सुद्धा ही नामी संधी ठरू शकते. सूचना: सध्या अमेरिकेत असल्याने इथे उपलब्ध असणाऱ्या भाज्यांचा मी उपयोग केला आहे.

शिट्टी

लेखक जव्हेरगंज यांनी रविवार, 22/05/2016 23:45 या दिवशी प्रकाशित केले.
भानू कुत्रं आज तळ्याकाठी एकटंच बसलं होतं. बाभळीच्या झाडाखाली आज त्याला निवांत झोप लागली होती. तसंही करण्यासारखं काही नव्हतं. दिवसभर रानावनात उंडारल्यावर तळ्याकाठी येऊन शांत पडण्याचा त्याचा दिनक्रमच होता. बरेच दिवस जवानीचा हिसका न दाखवल्यानं खरंतर तो तुंबला होता. सोय म्हणून त्यानं डोंगरपायथ्याच्या चार-पाच कुत्र्या बघून ठेवल्या होत्या. पण सुगीचा हंगाम नसल्याने त्या याला विशेष दाद देत नसत. उन्हाची तिरीप डोळ्यावर आली तसं भानू कुत्रं उलथापालथा होत जागं झालं.

सरदार दिठेरीकरांची गढी - भाग ३ ----- कथा ------ काल्पनीक

लेखक सिरुसेरि यांनी रविवार, 22/05/2016 19:58 या दिवशी प्रकाशित केले.
सरदार दिठेरीकरांची गढी ---- भाग १ ---- कथा ---- काल्पनीक सरदार दिठेरीकरांची गढी ----- भाग २ ----- कथा ------ काल्पनीक सरदार दिठेरीकरांची गढी - भाग ३ ----- कथा ------ काल्पनीक -- पुढे चालु - रविकांतराव यांनी त्या हॉलच्या टोकाला असलेल्या एका उंच आसनावरील बैठकीकडे निर्देश केला आणी ते पुढील माहिती सांगु लागले . "या दिवाणखान्यामधे एकेकाळी न्यायदानाचे काम चालत असे . दिठेरी गाव आणी बाजुचा मुलुख इथल्या जनतेचे न्याय निवाडे इथे होत असत . खुद्द सरदार दिठेरीकर हे न्याय निवाड्याचे काम बघत असत .

आई नव्हे, ओल्ड मेड...-बेटी डेविस

लेखक महामाया यांनी रविवार, 22/05/2016 17:54 या दिवशी प्रकाशित केले.
गेल्या शतकांत बॉलीवुड प्रमाणेच हॉलीवुड मधे देखील अविस्मरणीय चित्रपट आले. पैकी काही चित्रपट बघतांना वाटलं की आपण हिंदी चित्रपट इंग्रजीत बघताेय की काय...अंतर होता तो सादरीकरणाचा. इथे अशाच काही इंग्रजी चित्रपटांमधील तो अविस्मरणीय प्रसंग, जो त्या इंग्रजी चित्रपटाला आपल्या बाॅलीवुडच्या चित्रपटाहून वेगळा ठरवतो... अाठवणीतला हॉलीवुड/ एक- ‘दि ओल्ड मेड’ एकाच नायकावर प्रेम करणारया दोघी बहिणी. पैकी एकीपासून झालेलं मूल दूसरीच्या कुशीत वाढतंय. हे गुपित फक्त नायक आणि बाळाच्या आईलाच माहित.