‘बोला परळकर, तुमचा कशानं सत्कार करायचा ? नुसती नोटीस चालेल का चार्जशीट पायजे ?’
‘नाही साहेब,...’
‘असं कसं, कायतरी घ्यावंच लागेल की !’
‘साहेब या महिन्यात टार्गेट जरा कमी झालं.’
‘जरा ? बारा लाख म्हणजे जरा ? कुठली गाडी वापरता ?’
‘आं ? हां हां, आय टेन साहेब..’
‘विकली तर येतील का बारा लाख ? नाय म्हणजे ‘जरा’ नुकसान होईल तुमचं ! चालतंय की ! काय ?’
‘....’
‘भ**हो, जरा लाज बाळगा. कंपनी पगार देते लाख लाख रुपये ते कुणाच्या **त घालायला ? पगाराचं जाउदे एक, निदान कंपनीच्या कृपेनं खाल्ल्या पैशाला तरी जागा ? **खाली गाडी दिलीय ना कंपनीनं ? फिरा लेको जरा फिल्डवर आणि पयशे आणा ! कामं चुकवून बसून खायला काय तुमच्या बापाची जहागिरी हाय काय कंपनी म्हंजे ?’
‘होय साहेब !’
‘आं ...?’
‘नाही साहेब, म्हंजे होय, पुढल्या महिन्यात ही सगळी बाकी भरून काढतो.’
‘हं...शाणे बना ! चला निघा आता, खुर्ची खोळंबली असेल तुमची. घ्या बोलवून ज्युनिअर्सना आणि घाला चार लाथा ***वर ! कामं करा म्हणावं ***हो !’
‘यस्सर ! गुड डे सर !’
‘^&*/$#..!’
------------------------------------
‘आयला लैच खवळलाय आज खवीस ! जाम खिंकाळतोय. धामणे, बोलवा सगळ्या फिल्डवाल्यांना ! बसतो एकेकाच्या मानगुटीला !’
‘पण आज काय झालंय साहेब ? नेहमी तर सीईओ साहेब चांगले बोलतात.’
‘अहो पालकमंत्र्यांची मिटिंग नाय का झाली काल ? मिनिष्टरसायबानी लै तासलं म्हणे ! मग काय हाण हिकडं डाऊनलोड !’
‘अर्रर्र, मग बराबर ! वड्याचं तेल वांग्यावर ! ....आत्ता फोन लावतो सगळ्यांना !’
-----------------------------------
‘काय गं, मी कधीपासून थांबलोय इथं. कुठं गेली होतीस ? घराची किल्ली तरी ठेवशील का नाही ?’
‘अहो पण तुम्ही आज इतक्या लौकर कसे घरी ? हापिसातल्या लोकांनी हाकललं का काय ?’
‘कळली अक्कल ! हापिसात बसून काय आम्ही टवाळक्या करतो होय ? ते काय आराम घरात बसून टीव्ही बघायचं काम नाय ! डोकं लागतं डोकं. उद्या माझ्या जागी जाऊन बसा हापिसात, मग समजतंय कसं लाथा खाव्या लागतात ते ! मला शिकवतेय अक्कल ..’
‘अहो पण मी कुठं काय शिकवतेय ? एवढं चिडायला काय झालं ?’
‘घोड्याला गाढव झालं ! शॉपिंग करत नुसतं बोंबलत फिरायचं सोडून कामं करा कामं !’
‘अहो, घरातली कामं आवरूनच गेले होते ना शॉपिंगला ?’
‘गप्प बसा ! माहितीय मोठ्या विद्वान आहात तुम्ही. चला घाला आता काहीतरी गिळायला.’
‘.....’
-----------------------------------
‘ए आई, हे बघ मी काय बनवलंय, कागदाचं विमान ! झुईईईई sss’
‘निलेश अभ्यास सोडून कागदं काय फाडत बसलाहेस ? होमवर्क कधी करायचं ?’
‘आई, मघाशीच केलं....’
‘मग स्पेलिंग्ज म्हणत का बसला नाहीस ? काल टीचर ओरडल्या लक्षात आहे ना ?’
‘अगं केलीयेत मी स्पेलिंग्ज कालच.’
‘मग आणि एकदा कर. सारखं खेळ खेळ काय ते ? एवढा मोठ्ठा घोडा झालास तरी समजत नाही ? अभ्यास मागं आहे तुझा. तो अनिल बघ, तुझ्यामागून येऊन फर्स्ट आलाय आता. ‘
‘आई घोडा म्हणजे हॉर्स ना ?’
‘हो आणि गाढव म्हंजे अॅस ? तुझ्यासारखं ?’
‘अँ अँ sss, मी नाई गाढव, तूच गाढव, जा !’
‘द्यू का एक दणका आता ? आगाऊपणा करतोस ? चल बघू बस अभ्यासाला. नाहीतर उद्या तुला बाल्कनीत झोपवणार बघ.’
‘अँ अँ sss..’
-----------------------------------
‘डोरेमॉन, तुला अक्कल नाही, तू गाढव आहेस ‘
‘....’
‘समजतंय का काही मी बोलतोय ते ? एवढा मोठ्ठा घोडा झालास तरी जरापन समजत नाही बघ तुला.’
‘....’
‘आणि होमवर्क केलस का नाही अजून ? तो किटरेत्सु बघ किती हुशार आहे ? तुझ्यासारखा गाढव नाही.’
‘.....’
‘तुला केमिस्ट्रीचं स्पेलिंग येतं काय ? दाखव बघू म्हणून ?’
‘....’
'करशील का ? आगाऊपणा करशील ? थडाक !'
'.....'
‘बघू नको माझ्याकडे, जा अभ्यासाला बस, शाणा बन जरा. नायतर तुझं काय खरं नाय. उद्याच तुला अंगणात फेकून देणार बघ !’
‘.....’
-----------------------------------
| लेखनविषय: | |
|---|---|
| लेखनप्रकार |
वाचने
10598
प्रतिक्रिया
41
मिसळपाव
प्रतिक्रिया
हायला ... धमाल एकदम
अंहं
In reply to हायला ... धमाल एकदम by संजय पाटिल
म्हणजे मिनिस्टरने सुद्धा
In reply to अंहं by सस्नेह
हे खरंतर ओबामांपासून सुरु
In reply to अंहं by सस्नेह
ओबामामाची मामी राहिली. मिशेल
In reply to हे खरंतर ओबामांपासून सुरु by जव्हेरगंज
अर्र.. मी पयला हे रायलंच..
हम्म!
=))
तुझा हातखंडा आहे ग टिपीकल
अरे मधला एक पार्ट राह्यला.
चांगले लिहिले आहे . :)
मस्तच ग
:) :(
छान लिहिलय!
बिच्चारा
:)
:) मस्तं!
काय म्हन्जे कायच कळळ नाय.
नको उगा जव्हेरभाऊ.
In reply to काय म्हन्जे कायच कळळ नाय. by जव्हेरगंज
हाहाहा!!
In reply to नको उगा जव्हेरभाऊ. by अभ्या..
धमाल!
वा! फारच आवडला लेख. वांग पार
लेख भारी!
झकास... आवडली वांग्यावरची
यावरून एक विनोद आठवला...
In reply to झकास... आवडली वांग्यावरची by डोमकावळा
बाल्कनी मध्ये झोपवणं म्हणजे शिक्षेपेक्षा मजाच की हो.खिक्क! मज्जा म्हणजे दोघांचीही ! बालकांची आणि पालकांचीही ;)मस्तच. बाकी सरकारी
कथा आवडली...
आवडले
मस्त!
ह्म्म.. शेवट मस्त आणि
आवडली....
लोल :)
मस्त लिहिलंय!
कथा छान आहे पण एक प्रश्न पडला
अहो, ती गवर्न्मेंट कंपनी आहे
In reply to कथा छान आहे पण एक प्रश्न पडला by अमित भोकरकर
आवल्डं
हम्म........
आवडली पण शेवटाला काळजात थोडी
ह्म्म.. आजच आमच्या पिल्लाने
In reply to आवडली पण शेवटाला काळजात थोडी by कानडाऊ योगेशु
शेवटी पोरांवरच सगळेजण उखडतात
बाल्कनीमधे झोपायला लावणं ही