Skip to main content

श्रीगणेश लेखमाला २०१७!

लेखक साहित्य संपादक यांनी गुरुवार, 27/07/2017 00:20 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मिपाकरहो, म्हणता म्हणता बाप्पांचे आगमन अवघ्या एका महिन्यावर येऊन धडकलंय. त्यांच्या स्वागतासाठी सजावटीचा थाटमाट, आरत्यांचा दणदणाट, मोदकांची रास याचबरोबर अजुन एक गोष्ट असतेच ती म्हणजे आपली श्रीगणेश लेखमाला!!! यावर्षी श्रीगणेश लेखमाला सुरू होतेय अर्थातच गणेश चतुर्थीच्या दिवशी २५ ऑगस्टला. या लेखमालेत नेहमीप्रमाणेच दर्जेदार लेखांची रेलचेल असणार आहे. तर मिपाकरहो बाप्पाचे नाव घ्या आणि येऊ द्या तुमच्याकडून एक से एक उत्तम लेख. आम्ही वाट पाहतोय या मेजवानीची. केवळ 'मी' ह्या विषयावर माजलेल्या तुंबळ रणाच्या पार्श्वभुमीला देऊ आता ऑफिशिअल स्वरुप.

नवकवीस्तोत्र

लेखक माम्लेदारचा पन्खा यांनी बुधवार, 26/07/2017 22:10 या दिवशी प्रकाशित केले.
काही करण्या उरले नसता । आपली पाटी कोरी असता । काही बकांची ध्यानस्थ स्तब्धता । मत्स्यमारीकारणे ।। दिसता कोणीही नवखा । लबाड साधिती मोका । त्याची बुडवती नौका । लागलीच ।। पाडावी भोके यथेच्छ । भाषा तरी वापरावी स्वच्छ । भासवावे तयाते तुच्छ । आत्मक्लेशे ।। कवीचे उडवावे शिरस्त्राण । मागाहुनि करावे शिरकाण । मनसोक्त मारावे पादत्राण । कवितेवरी ।। आपण गाडिले कुठे झेंडे । आपल्या कापसा किती बोंडे । सगळे विसरून फेकती अंडे । अशावेळी ।। अशाने होते तरी काय । कवी हतोत्साही होऊन जाय । परि अंतरी लागते हाय । कायमची ।। सांगे कवी अशा लोका । दिसताक्षणी तिथेच ठोका । असे जरी प्रसंग बाका । विजयीभव ।।

वारा...पाऊस...गोरखगड..!

लेखक इरसाल कार्टं यांनी बुधवार, 26/07/2017 21:45 या दिवशी प्रकाशित केले.
कोहोज नंतर लोहोपे तलावाची एक छोटीशी सहल केली होती ग्रुपने, आता पावसाळ्यात काय हा प्रश्न विचारून सगळ्यांनी मला पिडलं होतं. याआधी नाणेघाट आणि मागच्या वर्षी ब्रह्मगिरी असे दोन पावसाळी ट्रेक झाले होते जवळचे त्यामुळे आता हे दोन पर्याय सोडून इतर पर्यायांचा विचार करत होतो. या वर्षीच्या यादीत हरिहरगड, कलावंतीण दुर्ग आणि गोरखगड अग्रस्थानी होते. खरेतर तीनही एकाच पठडीतले वाटावे असे, सुळक्यासारखे आकाशाला भिडणारे आणि कठीण. यातील जवळ असणारा आणि तुलनेने सोपा गड निवडावा असे ठरवले आणि गोरखगड ट्रेकचा ठराव ग्रुपात मांडला.

हॅरी पॉटर’: कास्टिन्ग (भाग २)

लेखक अनिरुद्ध प्रभू यांनी बुधवार, 26/07/2017 16:28 या दिवशी प्रकाशित केले.
जेनेट कडून हक्क विकत घेतल्यानंतर पुढच्या काही काळात जवळजवळ ८० टक्के कलाकारांची निवड झाली होती.. दिग्दर्शक म्हणून ख्रिस आणि त्याची टीम एकाच चिंतेत होती.....कथा सुरु होते तेव्हा हि सगळी मध्यवर्ती आणि त्यांच्या आजूबाजूला वावरणारी पात्र ११-१२ या वयातली असतात.. एवढी सगळी मुलं तेही अभिनय करू शकणारी आणायची कुठून असा तो प्रश्न होता. मग प्रवास सुरु झाला...वेगवेगळ्या शाळांना, ड्रामा स्कूल्सना डेविड आणि ख्रिस भेटी देऊ लागले, मुलांना ओडीशनला बोलावू लागले.. जवळपास २२०० मुलांची ओडीशन घेण्यात आली आणि काही चेहरे सापडले. त्यातलाच एक म्हणजे रुपर्ट ग्रींत अर्थातच 'द विझली' रोनाल्ड ...!!

समाधानाचे मुखवटे भाग - १

लेखक निशांत_खाडे यांनी बुधवार, 26/07/2017 15:21 या दिवशी प्रकाशित केले.
सलग दोन दिवस आणि रात्री झालेल्या अखंड जागरणामुळे त्याला कसलीतरी धुंदी आल्यासारखे वाटत होते, पूर्णपणे नशेत असल्यासारखी भावना. डोळेही भयंकर जळजळ करत होते. तो पूर्णपणे गोंधळून गेला होता, जरा वेळ इकडे तिकडे केले कि त्याला प्रचंड उत्साह येई, मग अचानक आजूबाजूचे लोक, घटना हास्यास्पद वाटत. आणि मग अचानक थकवा. सखोल थकवा.. आता एकदाची गाडी आली म्हणजे दहा बारा तास ह्या अवजड पिशव्यांपासून सुटका होईल आणि निवांत झोपता येईल. असा विचार करत तो बसस्थानकावर कसा बस वेळ काढत होता.

चंद्रासारखी गोल भाकरी आणि हरभर्‍याच्या पाल्याची भाजी

लेखक रुपी यांनी बुधवार, 26/07/2017 02:15 या दिवशी प्रकाशित केले.
आजकाल मेन बोर्ड म्हणा, ख.फ. म्हणा, ख.व. म्हणा, सगळीकडे भाकरीपे चर्चा चालूये. तवा तापलेलाच आहे तर म्हटलं आपणही आपल्या भाकर्‍या भाजून घ्याव्यात. तर 'पत्रावळीआधी द्रोणा'च्या चालीवर मी चपातीआधी भाकरी शिकून घेतली. पुढेमागे कधी चंद्रावर जावे लागलेच तर त्यात अडथळा नको.. असा काही विचार त्यामागे नव्हता. तर स्वतःला खायला आवडतं ते शिकून घ्यावं एवढीच माझ्या विचारांची मजल होती. लहानपणी रात्री पोळी खायला मला जाम कंटाळा यायचा. मग कधी बाजरीची भाकरी आणि तव्यावरचं पिठलं हा आईचा आणि माझा आवडता बेत असायचा.

रश्दी अबाझा

लेखक खडूस काका यांनी मंगळवार, 25/07/2017 18:00 या दिवशी प्रकाशित केले.
रश्दी अबाझाचा जन्म तेरेझा लुईगी, जी इटालियन होती आणि सैद अबाझा, जो जन्माने इजिप्तीयन होता या दांपत्याच्या पोटी ३ ऑगस्ट १९२६ ला झाला. रश्दी अबाझाचे कुटुंब खूप श्रीमंत होते आणि इजिप्तच्या राजकारणात मोठे स्थान होते. रश्दी च्या कुटुंबात बरेच लोक राजकारण, वकिली, पत्रकार, लेखक होते, पण त्याला शरीर सौष्ठव मध्ये रस होता. त्याचे अरबी सोबत इंग्रजी, स्पॅनिश, इटालियन, फ्रेंच या भाषांन्वर प्रभुत्व होते. १९४८ मध्ये रश्दी एका कॅसिनो मध्ये बिलियर्ड्स खेळत असताना त्याला कमाल बरकत नावाच्या दिग्दर्शकाने पाहिले, त्याला पाहून कमाल इतका प्रभावित झाला कि आपल्या चित्रपटात प्रमुख भमिका दिली.

नम्मू तुला भारतावर भरोसा नाय काय?

लेखक शब्दबम्बाळ यांनी मंगळवार, 25/07/2017 13:35 या दिवशी प्रकाशित केले.
प्रेरणा : इथे आणि इकडे तिकडे... नम्मू तुला भारतावर भरोसा नाय काय? नम्मूचे विमान किती भारी... भारी फिरतंय तेही दुनिया सारी... सारी दुनियेचा आकार कसा गोल गोल नम्मू तू भारताशी गोड बोल! नम्मू तुला भारतावर भरोसा नाय काय? नम्मूनी बंद केल्या नोटा... नोटा आरबीआयच्या हाती आला गोटा... गोटा गोट्याचा आकार कसा गोल गोल नम्मू तू भारताशी गोड बोल! नम्मू तुला भारतावर भरोसा नाय काय? नम्मूला आवडे पुरण पोळी... पोळी पण भलत्याच महाग झाल्या डाळी...

पाऊस...

लेखक माधुरी विनायक यांनी मंगळवार, 25/07/2017 05:58 या दिवशी प्रकाशित केले.
मला पाऊस आवडतो, मला पाऊस आवडत नाही... मी शांत आहे, संयमी आहे... पण तो अंत बघतो माझा... वाट बघायला लावतो... आला नाही तो की बिथरत जाते मी.. माझ्याही नकळत.. अवचित येतो मग तो.. कोसळतो... मी भानावर येईतो कोसळून झालेलं असतं त्याचं... निथळत राहतो मग तो, पागोळ्यांमधून.. आर्त बघतो... मी तुटून जाते... हरवते धुक्यात.. आणि तो पुन्हा बरसतो, चिंब भिजवतो, कुशीत घेतो अलगद.. मी विरघळत राहते.. संयमाचं बोट सुटलेलं...
काव्यरस

फुंकिले मी प्राण माझे...

लेखक सत्यजित... यांनी मंगळवार, 25/07/2017 01:15 या दिवशी प्रकाशित केले.
फुंकिले मी प्राण माझे,बासुरीचा सूर झाले गायचे तू टाळलेले..गीत मग मशहूर झाले! हे बरे झाले खरे तर..मी तुला मंजूर नव्हते जाहले नाही तुझी पण,या जगा मंजूर झाले! चालले होते कुठे मी? मज कुठे रस्ते कळाले? पाय जेथे थांबले ते,गाव ही निष्ठूर झाले! सांगतो आहेस आता,खूण माझ्या आठवांची पास मी होते तुझ्या तर,कोण होते दूर झाले! काजवे घेवून हाती,शोध माझ्या सावल्या तू घेवुनी हाती उन्हे मी,चांदण्याचा धूर झाले! जीवना बघ..मी तुझाही,साजरा मधुमास केला तू विखारी दंश करता,अमृताचा पूर झाले! —सत्यजित
काव्यरस