Skip to main content

दिवस उजाडता.....

लेखक प्रभाकर पेठकर यांनी बुधवार, 13/12/2017 20:38 या दिवशी प्रकाशित केले.
सकाळच्या चालण्याने आरोग्यसंपन्न आयु लाभते असं म्हणतात. पण रात्रीच्या सुखासिन झोपेचे साखळदंड तोडणं फार कठीण असतं, हा अनुभव आहे. त्यातून पुन्हा ह्यात सातत्य राखण्याचे अवघड उद्दिष्ट. मोठ्या कष्टसाध्य यशानंतर अवतीभवतीचं जग मला नव्याने 'दिसू' लागलं. नोव्हेंबर महिन्यातही मुंबईत पावसाळी वातावरणाने हवेत, सुखदपेक्षा जास्त आणि बोचरा म्हणता येणार नाही असा आल्हाददायी गारवा अनुभवत होतो. दूरवरून जाणार्‍या गाडीच्या इंजिनाचा भोंगाही, शास्त्रीय संगीतातील पहाटेच्या भूप रागाइतकाच प्रसन्न वाटतो.

देव,धर्मादी संकल्पना-- एंटरटेनमेंट विथ लाईफटाईम वॅलिडीटी.

लेखक सिंथेटिक जिनियस यांनी मंगळवार, 12/12/2017 14:43 या दिवशी प्रकाशित केले.
देव आणि धर्म नावाची संकल्पना कशी अस्तित्वात आली आणि का याच्यावर बरेच मंथन झाले आहे.यावर बर्याच थेअरीज आहेत.पैकी उत्क्रांतीवादानुसार देव आणि धर्म यावर बर्याच लोकांचा विश्वास असतो याचं कारण माणुस उत्क्रांत होत असताना त्याला या गोष्टींचा नक्कीच फायदा झाला असणार.आदिमानवाच्या अविकसित बुद्धीला पडणारे प्रश्न त्याच्या क्षमते बाहेरचे असल्याने त्याने सतत असणार्या अनिश्चिततेवर ,त्यातून येणार्या भीतीवर मात करण्यासाठी काही मानसिक,बौद्धिक दरिद्री कल्पना विकसित केल्या त्यात देव आणि धर्म याचा क्रमांक सर्वात वरचा लागतो.पण ही पण एक थेअरी आहे,याला सर्वानुमते आधार नाही. मग मनुष्याने मानसिक स्वास्थ देऊ शकणार्या पण

(नोटा)

लेखक ज्ञानोबाचे पैजार यांनी मंगळवार, 12/12/2017 14:17 या दिवशी प्रकाशित केले.
पेरणा सांगायलाच पाहिजे का दर वेळी? चालः- गे मायभू तुझे मी नोटा नोटा कितीक असती हजार पाचशेच्या नाही कुणास मुल्य कागद वाटती साऱ्या दूरस्थ आयकर विभाग ठाऊक पाहतो मजला डोळ्यांत् कॅशियरच्या अनुकंप दाटलेला झालो विवश परंतु बोलणार काही नाही निःशब्द भावनांना होळीच साक्षी राही अत्यंत भित्रे 08112016 पैजारबुवा,

वाटा

लेखक पद्मश्री चित्रे यांनी मंगळवार, 12/12/2017 13:30 या दिवशी प्रकाशित केले.
वाटा वाटा कितीक असती येती तुझ्याकडे ज्या नाहीच एकही माझी परक्याच वाटती साऱ्या दूरस्थ तूही तेथे ठाऊक पाहसी मजला ओठांवरी तुझ्या ही वसलेला तोच अबोला वाटे परंतु तरीही बोलणार कुणीही नाही निःशब्द भावनांना आभाळ साक्षी राही पद्मश्री चित्रे 24102017
काव्यरस

आता ई-बुक मोडी लिपीतही! जाणून घ्या पहिल्या मोडी ई-बुक निर्मिती मागची धडपड

लेखक कौशिक लेले यांनी सोमवार, 11/12/2017 23:15 या दिवशी प्रकाशित केले.
नुकतेच मी मराठी भाषेतील पण मोडी लिपीतील जगातील पहिलेच ईबुक वाचले. जयसिंगराव पवार लिखित "राजर्षी शाहू छत्रपती महाराज" हे पुस्तक नवीनकुमार माळी यांनी मोडी लिपीत लिप्यंतरित करून ईबुक स्वरूपात सादर केले आहे. ई-बुक वाचून पूर्ण केले आणि नेहमीप्रमाणे माझ्या पुस्तक परिक्षणाच्या ब्लॉगवर त्याबद्दल लिहिले. नेहमी पुस्तक परीक्षणाबद्दल मिपावर लिहीत नाही पण नेहमीच्या पुस्तकांपेक्षा हे वेगळं आहे म्हणून म्हटलं चोखंदळ मिपाकरांना या बद्दल सांगावं.

माझी पहिली ४२.५ किलोमीटर सायकल राईड

लेखक ऋतु हिरवा यांनी सोमवार, 11/12/2017 19:53 या दिवशी प्रकाशित केले.
भिंतीवर लटकवलेली सायकल ..., तिच्यामुळे भिंतीवर पडलेले काळे डाग ...! मनातल्या मनात बडबडत ( आठवले ना...... whats app वरील विनोद ...) मी ते डाग पुसून भिंत स्वच्छ करण्याचा प्रयत्न करते. मग हा घेणार एक पसरट टब... त्यात पाणी .. सायकलचा टायर काढून त्यातील ट्यूब काढून पंक्चर शोधत बसणार. आजूबाजूला पसरलेले दुरुस्तीचे साहित्य! मग पाणी पुसायला, सायकल पुसायला काळी करायला जुनी फडकी मी शोधून देणार! आणि हा सगळा पसारा हॉल मध्ये मांडलेला. त्याच्या परीने नंतर सगळं तो साफ करणार, पण माझ्या मनाला येणार नाही. त्यामुळे मी पुन्हा स्वच्छ करणार. सायकल मध्ये हवा भर, तिची सीट वर-खाली कर, तिचे हँडल वर –खाली कर ...

आता, 'न्याय' ही संतापला..!

लेखक अँड. हरिदास उंबरकर यांनी सोमवार, 11/12/2017 16:35 या दिवशी प्रकाशित केले.
आता, 'न्याय' ही संतापला..! 'तपास सुरु आहे' असं ठरीव आणि ठाशीव उत्तर देणाऱ्या तपास यंत्रणांना गुरुवारी मुंबई उच्च न्यायालयाने चांगलेच फटकारले. चार वर्ष होतात तरी नरेंद्र दाभोलकर, कॉ पानसरे यांच्या खुनाचा तपास का लागत नाही? दोभोळ्कर, पानसरे यांचे मारेकरी अद्याप मोकाट कसे? असा सवाल विचारत या दोन्ही प्रकरणातील तपासाची सद्यस्थती न्यायालयात दाखल करण्याचा आदेश उच्च न्यायालयाने दिला आहे. दाभोळकर- पानसरे हत्येप्रकरणी एका याचिकेवर सुनावणी करत असताना देशातील सद्यस्थतीतवर चिंता व्यक्त करत न्यायालयाने आपला संताप व्यक्त केला.

( काल रातीला सपान पडलं )

लेखक गबाळ्या यांनी सोमवार, 11/12/2017 09:44 या दिवशी प्रकाशित केले.
हा ।। गुरु महिमा ।। चाच पुढील विस्तार आहे. ( बऱ्याच जणांच्या म्हणण्यानुसार विडंबन हि स्वतंत्र कविता आहे व ते स्वतंत्र धाग्यावर असावे म्हणून हा स्वतंत्र धागा. ) गेल्या काही दिवसांत मी काही कवींचे व त्यांच्या कवितांचे विडंबन केले. खरे तर एखाद्या कवीचे काव्य दुसऱ्या कोणाला नवनिर्मितीसाठी / विडंबनसाठी प्रोत्साहित करत असेल तर त्याचे श्रेय मूळ कविलाच जाते. त्यामुळे मूळ कवीचे श्रेष्ठत्व आणखीनच वाढते. मूळ कवीने विडंबन हे त्यांच्या कवितेचा अनादर आहे असे मुळीच समजू नये.

स्पर्धेसाठी नाही....

लेखक किल्लेदार यांनी सोमवार, 11/12/2017 04:06 या दिवशी प्रकाशित केले.
स्पर्धेसाठी नाही.... उगाच लोकांच्या भुका चाळवायला म्हणून. म्हणजे पटापट प्रवेशिका येतील पदार्थ कुठला ते आठवत नाही पण आधी ब्रँडी पेटवून हॉटेलवाल्याने पोट पेटवायचा प्रयत्न केला. IMG_0665