Skip to main content

एक गाणे दूरवरुनी

लेखक अनन्त्_यात्री यांनी सोमवार, 19/03/2018 11:46 या दिवशी प्रकाशित केले.
एक गाणे दूरवरुनी, निशिदिनी झंकारते पैलतीरावरुनी काही ऐलतीरी आणते हृदयस्पंदी ताल त्याचा, राग त्याचा अनवट भिनत जातो नाद, मग अनुनाद येतो गर्जत लय अशी अलवार मजवर प्राणफुंकर घालते रोमरोमातून काही तरल मग ओसंडते मुक्तछंदी शब्द, त्यांच्या सावल्या धूसर जरी अर्थ उलगडती नवेसे ऐकले कितिही तरी
काव्यरस

.... बाकी तुमचं चालू द्या।

लेखक जे.पी.मॉर्गन यांनी सोमवार, 19/03/2018 08:20 या दिवशी प्रकाशित केले.
काल एक मेसेज आला.... गुढीपाडवा साजरा करू नका... कलश म्हणजे राजाचं शिर... वगैरे वगैरे. काल मुद्दाम डेक्कनवर गेलो... आमच्या राजाला नमस्कार केला. आज गुढी उभारली... कडुनिंबाची पानं खाल्ली... श्रीखंड केलं.... बाकी तुमचं चालूद्या! काही लोकांनी दीपिका पदुकोणचं नाक - शिर उडवण्याची मागणी केली म्हणे. तिने भारतीय संस्कृतीचा अपमान... वगैरे वगैरे... चित्रपट बघितला नाही पण ती पोरगी दृष्ट लागण्याइतकी सुंदर दिसते. तिचे काही चित्रपट आवर्जून पुन्हा पुन्हा बघतो... छान वाटतं....बाकी तुमचं चालूद्या! फेसबुकवर पोस्ट वाचली....मुसलमानांनी नेहेमीच हिंदूंना.... वगैरे वगैरे.

काॅपी,शाळा,पोलिस अाणि सुंदर मुली वगैरे

लेखक परशुराम सोंडगे यांनी सोमवार, 19/03/2018 03:27 या दिवशी प्रकाशित केले.
दहावी बारावीच्या परीक्षा सुरू झाल्या.आता एका मागून एक परीक्षा सुरू होणार.हे एक दोन महीने परीक्षाचे दिवसच …. पूर्वी परीक्षा ही एक शैक्षणीक प्रक्रीया होती.अध्यनं अध्यापना सारखीच साधी आणि निंरतर चालणारी प्रक्रीया. आता मात्र या परीक्षानां फार महत्व आलयं कारण या परीक्षाचे अधारे मुलांचे वर्गीकरण करण्यात येऊ लागले.त्या प्रमाणे गुणवत्ता यादया तयार करण्यात येऊ लागल्या. अती हुशार, हूशार, मध्यमं,साधारण आणि` ढ`असे मुलांचे प्रकार करण्यात येऊ लागले.मेरीट नावाची एक फुलपटटी तयार करण्यात आली. त्याने त्यांच्या बुदधीची मापे घेण्यात येऊ लागले.एकाच तराजूत सा-याना मोजले जाऊ लागले.

चतुरभ्रमणध्वनीच्या (स्मार्टफोन) कॅमेर्‍याचे नाविन्यपूर्ण उपयोग

लेखक डॉ सुहास म्हात्रे यांनी रविवार, 18/03/2018 14:34 या दिवशी प्रकाशित केले.
आजच्या घडीला चतुरभ्रमणध्वनी (स्मार्टफोन) बाळगणे ही नेहमिची गोष्ट झाली आहे. यात संभाषण आणि संदेश पाठवणे या सर्वसामान्य सोईबरोबर फोटो काढण्यासाठी कॅमेरा ही एक आकर्षक सोय असते, हे सांगायची गरज नाहीच. किंबहुना, जेथे जातो तिथला फोटो आणि सेल्फी फेबुवर टाकली नाही तर तो अक्षम्य अपराध असावा असा हल्ली फोनकॅमेर्‍याचा उपयोग होऊ लागला आहे.

भानुमामी

लेखक चुकलामाकला यांनी रविवार, 18/03/2018 06:57 या दिवशी प्रकाशित केले.
"बेबी डॉल मैं सोने दी"..... मोबाईलचा गजर वाजू लागतो आणि भानुमामीला जाग येते. गाणं पूर्ण होईपर्यंत ती तशीच पडून राहते. गेल्या महिन्यात तिच्या नातीने, रमेने मोबाईलमध्ये हे गाणं टाकलेलं असतं. भानुमामीला तो प्रसंग आठवतो आणि खुद्कन हसू येतं. "भानुमामी, कुठली गाणी टाकू तुझ्या फोनमध्ये?" रमा तिला नवा फोन वापरायला शिकवत असते. भानुमामीला तिचं आजी न म्हणता भानुमामी म्हणणं काही आवडत नसतं. रमेला ती तसं अनेकदा सुचवून बघते. मग एकदा रमा तिला म्हणते "आई रागवेल मला. तिनं सांगितलय आज्जी नाय म्हणायचं.

ती पहाट ओली(झालेली! ;) )

लेखक अत्रुप्त आत्मा यांनी शनिवार, 17/03/2018 13:28 या दिवशी प्रकाशित केले.
पेर्ना:- 1) आणि 2) सांज काळी ती येते का हळूच तांब्या घेऊन गुपचूप एकटी जाते येडी घरामागील वावरातून मधूनच कुत्रा मागे लागता सांडे तांब्या हातीचा हातानेच गच्च धरावा पाचोळा आजू बाजूचा टोचती अशी गवता गवतातूनी ती हुळहुळती पाने ओली वरून गवताच्या काडया वैतागली ती साली कधी एकदा उठू म्हणुनी उभी राहिली पहा छपून बसलेले कुत्रे करी अचानक भॉ भॉ फेकुनी मारी दगड त्याला नुकताची टाकले

शून्याची महती

लेखक खिलजि यांनी शुक्रवार, 16/03/2018 13:49 या दिवशी प्रकाशित केले.
शून्याची महती भारी या भूवरी शून्यावरी शून्य बैसे शून्यापरी शून्यात असे दुनिया सारी शून्यात देखता शून्य भासे शून्य शून्यात हासे शून्यात अनन्य अर्थ असे शून्यासम दुजा कुणी नसे शून्यात बेरीज शून्य शून्यात वजा शून्य शून्य गुणिले शून्य शून्य भागिले शून्य धन्य धन्य तो शून्य ज्याने शोधिला ते त्याचे पुण्य शून्यात सुरु सारे शून्यात मिळे सारे का वाढावी उगा रे ? दुःखाचे हे पसारे उगा धावीशी तू अनन्य जाण कर्म मर्म शून्य सुरुवात तुझी शून्य अंतही तो शून्य तिमिरतेज जो खाई परमात्मा तोही शून्य धन्य धन्य केवळ शून्य दुजा नसे कुणी अन्य सिद्धेश्वर विलास पाटणकर
काव्यरस