Skip to main content

चा-वट पॉर्निमा!

Published on बुधवार, 11/06/2025 प्रकाशित मुखपृष्ठ
तिचे बोलणे खरे करते ती असे नखरे करते पिझ्झा बर्गर नेहेमीचे पण जेवण सुद्धा बरे करते राग नक्की झूठ असावा प्रेम बहुदा खरे करते मिठी मध्ये घेते आणिक हट्ट सारे पुरे करते
लेखनविषय:

याद्या 1664

महाजनस्य संसर्गः

Published on मंगळवार, 10/06/2025 प्रकाशित मुखपृष्ठ
महाजनस्य संसर्गः -राजीव उपाध्ये पूर्वप्रसिद्धी - महाराष्ट्र टाईम्स पञ्चतंत्रात एक श्लोक आहे : महाजनस्य संसर्गः कस्य नोन्नतिकारकः। पद्मपत्रस्थितं तोयं धत्ते मुक्ताफलश्रियम्॥ ‘मोठ्या लोकांचा सहवास कुणाला प्रगतीकारक नसतो? कारण कमळाच्या पानावर पडलेले पाणी मोत्यांची शोभा धारण करते,’ हा याचा अर्थ. अर्नोल्ड टॉयन्बी नावाचा एक इतिहासकार म्हणतो, की दोन संस्कृतीची जेव्हा टक्कर होते, तेव्हा बलिष्ठ संस्कृतीच्या चालीरीती कनिष्ठ संस्कृतीवर प्रभाव पाडतात आणि झिरपतात; आणि मानवी समाज उत्क्रांत होत राहतो. सध्या हे मानववंशशास्त्रीय वास्तव राजकीयदृष्ट्या गैरसोयीचे आहे.
लेखनविषय:
लेखनप्रकार

याद्या 9604

साहित्य, ललिता आणि "समोरच्या फ्लॅट मधल्या dog feeder बाई"

Published on मंगळवार, 10/06/2025 प्रकाशित मुखपृष्ठ
साहित्य तेव्हा जॉब करत होता, आणि ललिता सध्या फ्री लान्सिंग. त्यांची मुलगी लेखना आता ५ वर्षांची झाली होती. सध्या ती एका शाळेत सिनियर के जी मध्ये होती. एका उच्चभ्रू सोसायटीतील स्वतःच्या फ्लॅट मध्ये ते राहत होते. त्यांच्या फ्लॅटच्या लॉबीच्या समोरचा फ्लॅट नुकताच विकला गेला होता. पण अजून कोणी तेथे राहायला आले नव्हते. त्या फ्लॅटच्या जुन्या मालकांचे आणि साहित्य ललिता यांचे चांगले संबंध होते. आता कोण तिथे नवीन येणार याची साहित्य आणि ललिताला उत्सुकता होती. त्यांच्या सोसायटीच्या एंट्रन्स गेट च्या बाहेर बरीचशी कुत्री होती.
लेखनविषय:
लेखनप्रकार

याद्या 4692

शाळेचा पहिला दिवस...

Published on मंगळवार, 10/06/2025 प्रकाशित मुखपृष्ठ
उन्हाळ्याची सुट्टी संपली. शाळा सुरू झाल्या. वसंत ऋतूत जशी पालवी फुटते ,आनंदाचे वातावरण निर्माण होते तसाच उत्साह, उर्जा शाळेतल्या मुला मुलीं मधे असतो. आई बापाची लगबग,तगमग, व मुलांचा उत्साह बघताना काही पंक्ती सुचल्या.मोठी मुले आपापल्या मित्रांबरोबर पुनर्भेटीचा आनंद घेत होते तर पहिल्यांदाच जाणारी,छोटी आई बापाला बिलगुन होती. एकामागोमाग शाळेच्या बसेस आल्या,चौकात येवून थांबल्या. मुले आई-वडील पांगले. आपापल्या मुलांना बस मधे बसवले. सुचना थांबत नव्हत्या. बस भरली. ड्रायव्हरने निर्विकार पणे बस मार्गस्थ केली. आई-वडील आपापल्या घोळक्यात सामील झाले.

याद्या 1995

न्यायाधीश 'कॅश'वंत वर्मा...

Published on सोमवार, 09/06/2025 प्रकाशित मुखपृष्ठ
घ्या कविता... 'कॅश'वंत वर्मा, भोग आता कर्मा, महाभियोगधर्मा सामोरी जा || जर दिला राजीनामा, तर नाही काजीनामा, सांग तुझा कारनामा, निवृत्ती जा || न्यायाधीशाच्या घरी रोकड, आता तो शोधतो बोकड, जो घेईल खांद्यावर जोखड, वाचवण्या || संसदेत घेराव, मांडला ठराव, तरी हे राव, ढिम्म नाही || न्यायाधीश यशवंत पकडला गेला 'कॅश'वंत आता करणार बस वंत घरातच ||
लेखनविषय:

याद्या 1159

Ee Sala Cup Namde अखेर सत्यात उतरले..

Published on रवीवार, 08/06/2025 प्रकाशित मुखपृष्ठ
तुम्ही फक्त किडनी, लिव्हर आणि दिलच जिंकू शकता आयपीएल ट्रॉफी तुमच्या नशिबात नाही.. विराट कोहली आरसीबीसाठी पनौती आहे त्याच्यामुळे आरसीबी ट्रॉफी जिंकत नाहीये.. विराटने एकतर टीम बदलावी किंवा आयपीएल खेळणे सोडून द्यावे.. या आणि अशाच प्रकारे विराट, विराट फॅन्स आणि आरसीबीला ट्रोल केले गेले, मजाक उडवला गेला, सल्ले दिले गेले. १८ वर्षे, तब्बल १८ वर्षे आरसीबी एका आयपीएल ट्रॉफी साठी झगडत होती, चाहते तळमळत होते. यादरम्यान २- ४ वेळेस आरसीबी जेतेपदाच्या अगदी जवळ सुद्धा गेली पण कधी नशीब तर कधी समोरील संघाच्या चांगल्या कामगिरीमुळे त्यांना ट्रॉफीने हुलकावणी दिली.
लेखनविषय:
लेखनप्रकार

याद्या 943

बाजाराचा कल : ९ जूनचा आठवडा

Published on रवीवार, 08/06/2025 प्रकाशित मुखपृष्ठ
बाजाराचा कल : ९ जूनचा आठवडा ==================== मंडळी, मागील आठवड्यात केलेले भाकीत बरोबर ठरले आहे. बाजाराने दमदार रिकव्हरी केली आहे.
लेखनविषय:
लेखनप्रकार

याद्या 804