Skip to main content

रोशनी ४

Published on 03/12/2007 - 16:35 प्रकाशित मुखपृष्ठ
तात्या रोशनी ४ भाग प्रकाशित केल्याबद्दल धन्यवाद!

याद्या 5455

काळजी करण्यासारखे काय आहे त्यात ???

Published on 03/12/2007 - 15:26 प्रकाशित मुखपृष्ठ
आधीच जाहीर करतो, इंटरनेट वरून साभार............... आज फक्त २ गोष्टी काळजी करण्यासारख्या आहेत ...... एक म्हणजे तुमची तब्येत चांगली आहे का तुम्ही आजारी आहेत ? जर तुमची तब्येत ठणठणीत असेल तर मग काळजी कशाची करता, मस्त जीवनाचा आनंद घ्या ....... पण जर तुमची तब्येत बरी नाही, तुम्ही आजारी आहात तर तुम्हाला २ गोष्टींची काळजी करायला हवी..... एक तर तुम्ही बरे व्हाल का आजारपणातच मरून जाल ? जर तुम्ही बरे होणार असाल तर काळजी करण्यासारखे काही नाही......... पण जर तुम्ही आजारपणातच मरण्याची शक्यता असल्यास तुम्हाला काळजी करण्यासारख्या २ गोष्टी आहेत.....

याद्या 4429

नव्हाळी

Published on 03/12/2007 - 12:10 प्रकाशित मुखपृष्ठ
नव्हाळी प्रीत ही जुनी जरी, रीत ही नवी नवी जोड हा जुना जरी, ओढ ही नवी नवी खेळ हा जुना जरी, डाव हा नवा नवा वाद हा जुना जरी, संवाद हा नवा नवा शब्द हे जुने जरी, वेध हे नवे नवे गूढ हे जुने जरी, उकलणे नवे नवे गीत हे जुने जरी, संगीत हे नवे नवे गुंतणे जुने जरी, सावरणे नवे नवे गोडवा जुना जरी, स्वाद हा नवा नवा वेग हा जुना जरी, आवेग हा नवा नवा ताटवा जुना जरी, गंध हा नवा नवा तोच चांदवा जरी, गारवा नवा नवा बरसणे जुने जरी, भिजणे नवे नवे बहर तो जुना जरी, फ़ुलणे नवे नवे साद ही जुनी जरी, गवसणे नवे नवे समजणे जुने जरी, उमजणे नवे नवे जयश्री
लेखनविषय:

याद्या 5981
Taxonomy upgrade extras

एक ढासळलेली अर्थव्यवस्था

Published on 03/12/2007 - 00:01 प्रकाशित मुखपृष्ठ
अर्थव्यवस्था म्हटले की समोर येते शेअर बाजार, सेन्सेक्स,विदेशी गुंतवणूक, चलनाचे दर, कर्ज, भाववाढ वगैरे वगैरे. पण ह्यात मी ह्याबद्दल काही लिहिणार नाही. इथे आहेत ते फक्त मी एक कॉलेज विद्यार्थी म्हणून माझे अनुभव. आता त्यात पैसे कमावण्याचा संबंध फारच कमी लोकांचा येतो. असतो तो फक्त खर्च. आईवडिलांनी दिलेल्या पैशांचा. कधीतरी लिहिल्याप्रमाणे, आज काल जेव्हापासून नोकरी करतोय तेव्हापासून पैसे हातात असतात. स्वत:चा/घराचा खर्च करू शकतो. अर्थात त्यामुळे उगाच उधळणे करत नाही. पण कधीही पैसे खर्च करताना कमी पडले की वसतीगृहातील अनुभव आठवतात. आजकाल ते दिवस आठवले मन भरून येते.

याद्या 7547

सिद्धहस्त कवी, लेखक ,समीक्षक : प्रा. केशव मेश्राम

Published on 01/12/2007 - 20:24 प्रकाशित मुखपृष्ठ

                     प्रा. केशव मेश्राम यांची काही व्याख्याने ऐकण्याचा योग प्रबोधन वर्गाच्या निमित्ताने आम्हास आलेला आहे. अतिशय साधा माणूस. आपण मोठे साहित्यिक आहोत असा आव कधी दिसला नाही. दलित साहित्य, दलित चळवळ, आणि नवलेखकांना प्रेरणा देणारा साहित्यिक म्हणजे, प्रा. केशव मेश्राम. साठोत्तरी साहित्यानंतर ज्या विविध साहित्यप्रकारांनी जन्म घेतला आणि दलित साहित्याकडे वाचक जेव्हा कुतुहलाने पाहू लागला तेव्हा चळवळीला आणि दलित साहित्याला दिशा आणि गती देणारे जे साहित्यिक होते.


याद्या 8314

बिननावाची कथा - १

Published on 29/11/2007 - 11:24 प्रकाशित मुखपृष्ठ
नॅशनल जिओग्राफिकच्या बहुधा नोव्हेंबरच्या अंकात मानवी स्मरणशक्तीवर एक अप्रतिम लेख आला होता. त्यापूर्वी सायंटिफिक अमेरिकन मासिकाच्या जुलै मधील अंकात "द मेमरी कोड" नावाने एक सुंदर लेख आला होता. हे लेख वाचून एक कथा सुचली. अद्याप अपूर्ण आहे. अर्थातच जीएंची भ्रष्ट नक्कल करण्याचा प्रयत्न केला आहे. वेळेअभावी अद्यापि पूर्ण करणे जमले नाही. मात्र कथा कशी विकसित होत आहे हे हॉटेलातील मंडळींकडून ऐकायला आवडेल. शिवाय कथेला नावही अजून दिलेले नाही. एक नाव मनामध्ये आहे. पण ते देण्यापूर्वी तुम्ही याला काय नाव द्याल?
लेखनविषय:
लेखनप्रकार

याद्या 11890

उन्हाळ्यातले थेंब (हायकू)

Published on 29/11/2007 - 09:33 प्रकाशित मुखपृष्ठ
उन्हाळ्यातले थेंब (तिहेरी तिहाई)
* तापली धूळ बसून पानावर नक्षी दिसते सुकल्या दवाची * * *
* * लाल धूळकण वाहातायत सैरभैर खार तुषार * *
* * * ऊन धुळीत थेंब कोळपली पालवी वाफवून मलूल करतात *
* दवाचा एक बिंदू पानाला लोंबतो तसा जड नाही तो * * *
* * मागे ठिबक ठिबक समोर
लेखनविषय:

याद्या 23252
Taxonomy upgrade extras

...बरसात

Published on 28/11/2007 - 23:08 प्रकाशित मुखपृष्ठ
स स्टॉपवर येऊन थांबली, आणि घाईघाईनं रांगेतली गर्दी पुढंपुढं सरकू लागली. रांगेबाहेरच्या त्या काहीश्या वयस्कर इसमाशी बोलणार्‍या तिला बहुधा गर्दीची ही घाई कळलीच नव्हती. मागून दोनचार जणांनी आवाज दिल्यावर तिची पावलं जडपणे पुढं सरकली. तो इसमही तिच्याइतक्याच जडपणानं बाजूनं पुढेपुढे सरकत चालत होता. रांगेबरोबर तीदेखील एखाद्या यंत्रासारखी बसमध्ये चढली आणि रिकाम्या राहिलेल्या एकमेव बाकावर चक्क विंडो मिळाल्यानं तिचा चेहेरा खुलला. तो इसमही मग बसबाहेर विंडोजवळ येऊन उभा राहिला. आता बस जवळपास भरली होती. पुढचा सिग्नल बंद होता म्हणून ती स्टॉपवर उभी होती.
लेखनविषय:
लेखनप्रकार

याद्या 6998

पांढरपेशी विडंबने

Published on 28/11/2007 - 11:42 प्रकाशित मुखपृष्ठ
आमची प्रेरणा नीलहंस यांची अप्रतिम कविता पांढरपेशी कविता अवळेचिंचा कुरतडताना तिला पाहुनी कच्च्या समजू नका हो झाला आहे भलता सलता लोच्च्या किरकिरणारा बाप तिचा हा जागा चोवीस तास खिडकीमधूनी गेलोतरी ही त्यास लागतो वास गंध मारतो किती तुझ्या रे ह्या कपड्यांना साल्या तुमान बुरसट, सदरा कळकट धू कधीतर मेल्या डेलिकसीच्या नावाखाली समोर झुरळे आली खारवलेल्या मिळती इथल्या हॉटेलातुनी पाली चादर ओढून आता पडतो लोळत घोरत गादी (तशी जराशी गारच होती तुरुंगातली लादी) शौचकूपांच्यासभोवताली फुलल्या दरवळ बागा कविता सुचण्या शांत नसे पण या सम दुसरी जागा अंगावरचे ठसे सांगती गतकाळाचे काही मार लपावा इतकी ही अमुची पुण्य
लेखनविषय:

याद्या 6048