मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

काळजी करण्यासारखे काय आहे त्यात ???

छोटा डॉन · · जनातलं, मनातलं
आधीच जाहीर करतो, इंटरनेट वरून साभार............... आज फक्त २ गोष्टी काळजी करण्यासारख्या आहेत ...... एक म्हणजे तुमची तब्येत चांगली आहे का तुम्ही आजारी आहेत ? जर तुमची तब्येत ठणठणीत असेल तर मग काळजी कशाची करता, मस्त जीवनाचा आनंद घ्या ....... पण जर तुमची तब्येत बरी नाही, तुम्ही आजारी आहात तर तुम्हाला २ गोष्टींची काळजी करायला हवी..... एक तर तुम्ही बरे व्हाल का आजारपणातच मरून जाल ? जर तुम्ही बरे होणार असाल तर काळजी करण्यासारखे काही नाही......... पण जर तुम्ही आजारपणातच मरण्याची शक्यता असल्यास तुम्हाला काळजी करण्यासारख्या २ गोष्टी आहेत..... त्या म्हणजे तुम्ही स्वर्गात जाल की नरकात ? जर स्वर्गात गेलात तर त्यासारखे उत्तम काहीच नाही ........ आणि समजा चुकून नरकात गेलात [ जातालच ना ....] तर तुम्ही तुमच्या जुन्या मित्रांना भेटण्यात येवढे मग्न व्हाल की तुमच्याकडे काळजी करण्यासाठी वेळच ऊरणार नाही......... तेव्हा काळजी सोडा आणि मस्त जीवनाचा आनंद घ्या !!!!!!!

वाचने 4426 वाचनखूण प्रतिक्रिया 2

विसोबा खेचर Mon, 12/03/2007 - 16:08
आणि समजा चुकून नरकात गेलात [ जातालच ना ....] तर तुम्ही तुमच्या जुन्या मित्रांना भेटण्यात येवढे मग्न व्हाल की तुमच्याकडे काळजी करण्यासाठी वेळच ऊरणार नाही......... हे बाकी खरं आहे! :) आपला, (निष्काळजी) तात्या.