Skip to main content

अपेक्षा

Published on गुरुवार, 24/01/2008 प्रकाशित मुखपृष्ठ
तुझ्यातल्या कवीला डोळे हवे ट्पोरेच हात सुकोमलच हवेत केस काळेभोर सुगन्धी कुरळेच हवे; फुलाबिलानी सजलेले. वस्त्र नेटकीच हवीत अंगासरशी तुझ्या कवितेत सामील व्हायला अन तू उगाळ्लेल्या माझ्या भावना, अन मी ही हवी विवस्त्र. तु़झ्या घराचे घर करायला, हसतमुख घराचे दार उघडायला, जेवणाचे सुगन्ध दरवळावयाला, रडत्या मुलाला शान्तवायला जबाबदारीची ओझी वाहायला. समारम्भात मिरवायला, मी तर हवी दक्ष, सावध, तुझाच घ्यायला पक्ष. तुझ्यातल्या कवीला माझ्या सारखी कोणीही चालते पैसे मोजून गप्प बसणारी, न मोजता मिळाली तर भीतीनी मूग गिळ्णारी. तुझ्या विश्रान्तीला माझी शान्तता हवी माझ्या विश्रान्तीला, फक्त तुझ थोड ह्र दय हव थोडी कद
लेखनविषय:

याद्या 3874

अंदाज तारखांचा, चुकला जरा असावा

Published on गुरुवार, 24/01/2008 प्रकाशित मुखपृष्ठ
आमची प्रेरणा इलाही जमादार ह्यांची नितांतसुंदर गज़ल अंदाज तारखांचा, चुकला जरा असावा बहुतेक बायकोचा, होरा खरा असावा येतोय वास मजला अजुनी कसा सुगंधी हातात बांधलेला, तो मोगरा असावा लपवून तोंड अपुले का घेतले तुम्ही हो? की वाटले तुम्हाला, तो सासरा असावा!
लेखनविषय:

याद्या 14852

वाच पुस्तके

Published on बुधवार, 23/01/2008 प्रकाशित मुखपृष्ठ
वाच पुस्तके जगण्याचे जर भान पाहिजे, वाच पुस्तके! जगती जर सन्मान पाहिजे, वाच पुस्तके! साहित्याविण अर्थहीन हे अवघे जीवन जिंदगीत जर जान पाहिजे, वाच पुस्तके संस्कारांनी घडतो माणूस... मोठा होतो मानाचे जर पान पाहिजे, वाच पुस्तके सहा रिपूंच्या हल्ल्यापासून वाचवणारा हृदयी जर भगवान पाहिजे, वाच पुस्तके आयुष्याच्या रुक्ष कोरड्या वाटेवरती हिरवे जर तुज रान पाहिजे, वाच पुस्तके स्वत्व संस्कृती माय मराठी हवी जपाया मातीचा अभिमान पाहिजे, वाच पुस्तके ----अविनाश ओगले
लेखनविषय:

याद्या 5724
Taxonomy upgrade extras

दारोळ्या आणि चषक माझा... आता वाचा ओरि"जिन"ल.

Published on बुधवार, 23/01/2008 प्रकाशित मुखपृष्ठ
मिसळपाव या संकेतस्थळावर छोटा डॉन यांनी नेट वरुन घेतलेल्या दारोळ्या माझ्या "चषक माझा" या विडंबनातील आहेत. त्या मिसळपावच्या सदस्यांना पाजवल्याबद्दल आभार. ऑर्कूटवर हे पुस्तक खालील पत्त्यावर ऊपलब्ध आहे. http://www.orkut.com/Community.aspx?cmm=30757858 ..अविनाश ओगले

याद्या 4242

इंग्रजीचा वापर करावा की नाही?

Published on बुधवार, 23/01/2008 प्रकाशित मुखपृष्ठ
"अस्सल मराठीतून अभिव्यक्तीसाठी , सहज सोपं आणि मराठमोळं असं हे संकेतस्थळ" मिसळपावचे हे ब्रिदवाक्य. मिसळपाव लोकप्रिय होत आहे,आणि दिवसेंदिवस नवनविन सदस्यांची भर पडते आहे. आजकाल येणार्‍या नव्या सदस्यांच्या नावामधे मात्र इंग्रजीचा वापर अधिक दिसतो आहे. त्यातीलच एका सदस्याने तर इंग्रजीतूनच चारोळ्या आणि कविता टाकल्या होत्या. मराठीचा वापर करण्यासाठी इतकी सोपी सोय असताना देखील इंग्रजीचा वापर करणे योग्य आहे का?

याद्या 6631

ईमेल पाठवण्यात अडचण?

Published on बुधवार, 23/01/2008 प्रकाशित मुखपृष्ठ
मिसळपाव वर नोंदणी केल्यावर संकेताक्षर ईमेल द्वारे पाठवल्या जातो. सध्या काही सदस्यांना अशी ईमेल पोहोचलेली नाही अशी तक्रार आलेली आहे. ज्यांनी अशी तक्रार केली आहे त्यांची अडचण सोडवण्यात आलेली आहे. आणि कुणाला अशीच अडचण आहे का? असल्यास sarpanch.misalpav@gmail.com वर ईमेल पाठवून कळवावे. यापुढे मिसळपाव वर नोंदणी करतांना आपण स्वतःला हवा तो संकेताक्षर निवडण्याची मुभा देण्यात आली आहे. ईमेल पत्ता देणे मात्र बंधनकारक आहे. धन्यवाद.
लेखनविषय:
लेखनप्रकार

याद्या 2601

मिसळ पाव

Published on बुधवार, 23/01/2008 प्रकाशित मुखपृष्ठ
पोटात कावळे काव काव, नकोस आणू उगीच आव. मिळेल शहरी अन गावोगाव, मस्त चव आणि स्वस्त भाव. पावमिसळ कुणा नाही ठाव ? मिसळ पाव, मिसळ पाव.
लेखनविषय:
लेखनप्रकार

याद्या 8111

नामवंत कवी प्रवीण दवणे यांचा एक आशयगर्भ लेख

Published on बुधवार, 23/01/2008 प्रकाशित मुखपृष्ठ
बर्‍याच दिवसांपूर्वी वाचनात आला होता. फारा दिवसांनी काही कारणाने त्याची आठवण जागी झाली. मि.पा.करांनाही त्याचा आस्वाद घेता यावा ह्या कारणाने तो लेख येथे देत आहे.
लेखनविषय:
लेखनप्रकार

याद्या 14813

माझी नवी मैत्रेण

Published on बुधवार, 23/01/2008 प्रकाशित मुखपृष्ठ
गजर झाला आणि झोपमोड झाली. मस्त गुबगुबित बिछान्यात रज‌ईत गुरफटलेला देह बाहेर पडायला राजी नव्हता. पाठोपाठ दूरध्वनी किणकीणू लागला आणि उठणे भाग पडले. दहाचे उड्डाण म्हणजे न‌ऊला हजेरी, म्हणजे साधारण आठला बाहेर पडणे आले. म्हणजे सातला उठलेले बरे. जरा आळसावायचे, एक चहा, जरा टंगळमंगळ, पुन्हा चहा, मग दाढी, तुषारस्नान, मग सामानाचा ताळेबंद एवढे सगळे जमवयला तास तरी हवाच. आठ दिवसाच्या दौर्‍यात पाच गावे पालथी घालायची तर ’विंचवाचे बिर्‍हाड पाठीवर’ अशी स्थिती. रोज नवे गाव, नवे हॉटेल, रोज सामान उघडा आणि दुसर्‍या दिवशी पुन्हा बांधा. चालायचेच!

याद्या 12454