Skip to main content

केक कापायच्या विविध पद्धती

लेखक चिरोटा यांनी मंगळवार, 22/09/2009 00:11 या दिवशी प्रकाशित केले.
समजा एक केक दोन व्यक्तींमध्ये- आणि मध्ये समान वाटायचा आहे तर कसा वाटता येईल? नेहमी वापरली जाणारी पद्धत- १)तिसर्‍या व्यक्तीने(समजा ने) एक छेद देवून केकचे दोन भाग करणे. २)अ(किंवा ब ने ) ने प्रथम त्याच्या आवडीचा तुकडा उचलणे. ३)ब(किंवा अ ने) ने दुसरा तुकडा उचलणे. वरील पद्धत fair(न्याय्य) म्हणता येईल का? क च्या द्रुष्टिकोनातून अर्थातच ती आहे पण अ किंवा ब च्या नजरेतून ती असेलच असे नाही.म्हणजे ब ला ही विभागणी ७०%-३०% ही वाटु शकेल व तो ही विभागणी अन्याय्य म्हणेल.

रवा ढोकळा

लेखक दिपाली पाटिल यांनी सोमवार, 21/09/2009 21:12 या दिवशी प्रकाशित केले.
गेल्यावेळेस बेसनचा ढोकळा केला तेव्हा माझ्या नवर्‍याचं म्हणणं पडलं की त्याला पांढरा ढोकळा जास्त आवडतो, मग म्हटलं याच पद्धतीनं रव्याचा ढोकळाही बनवायला हरकत नाहीये...रवा ढोकळा बनवायचा हा तसा माझा पहीलाच प्रयोग पण छान लागतो हा ही ढोकळा...आणि बेसन ढोकळ्यापेक्षा तसा जास्त पैष्टिकही असेल असं म्हणायला हरकत नाहीये :) साहीत्यः ढोकळा १ कप बारिक रवा (जाड + बारिक रवा असं ही घेता येइल...) ३/४ कप दही (आंबट असेल तर उत्तम...) १.५ टीस्पून इनो १ टेस्पून तेल २ चमचे लिंबाचा रस किंवा १/२ चमचा सायट्रीक अ‍ॅसिड प

साडेसाती

लेखक अविनाश ओगले यांनी सोमवार, 21/09/2009 21:06 या दिवशी प्रकाशित केले.
देईल का मज कुणी दिलासा साडेसातीत हवाहवासा म्हणती साडेसातीमध्ये फिरते घर अन् फिरतो वासा नुसती तडफड साडेसाती जळावाचूनी जैसा मासा सहजासहजी होते गोची उच्छ्‌वासांचा होई उसासा साडेसातीनंतर तरी का मनासारखा पडेल फासा? -अविनाश ओगले

चकोल्या

लेखक विशाखा बहुलेकर यांनी सोमवार, 21/09/2009 17:34 या दिवशी प्रकाशित केले.
चकोल्या हा फार जुना पदार्थ आहे. साहीत्य- कणीक,तेल,तूरडाळ,सुके खोबरे,मेथी दाणे,जिरे, लाल तिखट,मीठ,गूळ,हळद,हिंग,चींच, क्रुती - कणीकेच्या चपात्या लाटून (भाजू नये) सुरीने १ इंच आकाराचे तुकडे कापावेत. तुरीची डाळ शिजवून घ्यावी.ती पळीने थोडी बारीक करून घ्यावी. कढईत तेल घालून त्यात मेथीदाणे,हिंग,ह्ळदीची फोड्णी करून्,त्यात डाळ,लाल तिखट ,मीठ,थोडा गूळ,चींच,भाजलेले जिरे खोबरे घालून उकळी आणावी.व कणकेचे तुकडॅ त्यात घालून शिजवावे. खाताना तूप घालावे.

डॉ. खान यांचे शास्त्रीय गायन कीं जगाला गुमराह करण्याचा कट?

लेखक सुधीर काळे यांनी सोमवार, 21/09/2009 15:56 या दिवशी प्रकाशित केले.
प्रख्यात पाकिस्तानी शास्त्रज्ञ (व पाकिस्तानच्या अणू बॉम्बचे पिताश्री) डॉ. अब्दुल कादीर खान यांचे स्वत:च्या पत्नीला लिहिलेले पत्र प्रसिद्ध झाल्यापासून ते सध्या एकाद्या मैनेप्रमाणे गात आहेत (ज्याला आंग्लभाषेत singing like a canary असे म्हणतात)! कारण ’जब चिडियाही चुग गयी खेत’, गपा बसून काय फायदा? पण ते जे सांगत आहेत ते खरे आहे का?

स्पर्श केनियम

लेखक विनायक प्रभू यांनी सोमवार, 21/09/2009 15:11 या दिवशी प्रकाशित केले.
'स्पर्श के नियम 'ह्या पुस्तिकेचे प्रसारण करणार्‍या न्यायमुर्ती ना माझा सलाम. ओंगळवाणे आणि नको असलेले स्पर्श फक्त मुलींच्याच वाट्याला येतात हा एक मोठा गैरसमज. __________________________________________________________ साल १९७० वय १७ स॑काळची ६.१५ ची अंबरनाथ वरुन येणारी लोकल. खच्चुन भरलेली. आधी ओझरता. नंतर थोड्या दिवसांनी जवळीक साधणारा. काही दिवसांनी थेट किळसवाणा, ओकारी आणणारा. कुणाला सांगायचे. गोंधळ. मित्राला सांगायची हिंमत नाही. हे फक्त आपल्यालाच होते आहे का? कसे विचारु? माझ्यातच काही कमी आहे का? बर, प्रश्न स्वःत सोडवायची हिंमत नाही. आडदांड दिसणारा ४० वर्षाचा पुरुष डबा बदलला. पण पाठलाग सुरुच.

CPU ची गोष्ट

लेखक फ्रॅक्चर बंड्या यांनी सोमवार, 21/09/2009 15:08 या दिवशी प्रकाशित केले.
माझ्या बायका वेळ आणि मेमरी साठी भांडतात भांडणात गुंगतात अन स्वता:चे काम विसरतात वेळेची कमतरता , मेमरीची कमतरता बायकांची मागणी , मला जरा वेळ देता एकाच आईच्या ह्या पोरी, पण भांडतात किती अन सासुबाईंनीही समजुत घालायची तरी किती Restart झाल्याशिवाय ह्यांना कळणार नाही सासुबाईंनी वाटणी केल्याशिवाय जमणार नाही कधी कधी मी स्वता:चा गजनी करुन घेतो Restart होतो अन सगळं विसरुन जातो मग सगळ्या बायका बसतात , परत एकदा बोंबलत अन सासुबाई मरतात , मेमरीची मांडवली करत आता ही नवी कोण आयुष्यात आली माझा वेळ अन मेमरी घेउन गेली मी तिच्या प्रेमात अडकत चाललोय का वायरस मध्ये फसत चाललोय ह्या बायका अन पोरांना वेळ देता देत

खरडवही कशी वापरावी?

लेखक अभिजा यांनी सोमवार, 21/09/2009 11:26 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मिसळखाऊ! मी इथे नवीन आहे. मला खरडवहीत काही निरोप आले आहेत, जे मी आत्ताच पाहिले. तसे ते ईमेल मधून आले होते, आणि मी रिप्लाय देखिल केला होता. पण ती उत्तरे एका विवक्षित आयडीलाच गेली असण्याची शंका आहे. दुस-याच्या खरडवहीत जाऊन उत्तर कसे द्यावे ह्याचे कृपया कोणी मार्गदर्शन करेल काय? दुस-याच्या खरडवहीत गेल्यावर उत्तर लिहिण्यासाठी टेक्स्ट बॉक्स दिसत नाही. पराकोटीच्या अडाणी प्रश्नाबद्दल माफी चाहतो. :-( धन्यवाद!

(आता नाही ...! )

लेखक मराठमोळा यांनी सोमवार, 21/09/2009 11:11 या दिवशी प्रकाशित केले.
आमची जाज्ज्वल्य प्रेरणा स्वैराचाराचा जुना आड आता नाही अन कवितांचे तसे लाड पण आता नाही ! लिहिला मी असा काथ्याकुट पुन्हा कंपुबाजीच्या भुता 'झाड' आता नाही ! चांदण्यांची खरी जाहली मज सोबत पण प्रतिसादांचा पहाड आता नाही ! संपाकदांचा मला लाभला आधार नि... टवाळखोरीची तशी धाड आता नाही ! झेलले घाव सारे सदा टीकांचे पण नव्याने कविताप्रसव चाड.... आता नाही ! चु.भु.दे.घे. (कविता न समजल्यास प्रेषक जबाबदार नाही. ;) ) आपला मराठमोळा, विडंबन क्लब प्रा. लि.
काव्यरस