समजा एक केक दोन व्यक्तींमध्ये-अ आणि ब मध्ये समान वाटायचा आहे तर कसा वाटता येईल?
नेहमी वापरली जाणारी पद्धत-
१)तिसर्या व्यक्तीने(समजा क ने) एक छेद देवून केकचे दोन भाग करणे.
२)अ(किंवा ब ने ) ने प्रथम त्याच्या आवडीचा तुकडा उचलणे.
३)ब(किंवा अ ने) ने दुसरा तुकडा उचलणे.
वरील पद्धत fair(न्याय्य) म्हणता येईल का? क च्या द्रुष्टिकोनातून अर्थातच ती आहे पण अ किंवा ब च्या नजरेतून ती असेलच असे नाही.म्हणजे ब ला ही विभागणी ७०%-३०% ही वाटु शकेल व तो ही विभागणी अन्याय्य म्हणेल. म्हणजे इकडे समान वाटणी ही सापेक्ष आहे.
दुसरी पद्धत जी आपण नेहमी वापरतो-
१) अ ने छेद देवून केकचे दोन भाग करणे.
२)ब ने त्याच्या पसंतीचा तुकडा निवडणे.
३)अ ने दुसरा तुकडा घेणे.
अ च्या नजरेतून दोन्ही भाग ५०% आहेत.म्हणून त्याची कुठ्च्याही तुकड्यास पसंती असेल. ब ने प्रथम निवड केल्याने तो ही त्याच्या आवडीचा तुकडा(म्हणजे कमीत कमी ५०%) निवडू शकेल. दोघांच्याही नजरेतून विभागणी न्याय्य असल्याने ही विभागणीला(cut and choose) fair division म्हणतात.
१९४०च्या दशकात स्टीनहॉस्,बनाक्,नॅस्टर ह्या पोलिश गणितींनी न्याय्य विभागणीचा(simple fair division) हा प्रश्न वॉशिंग्टनमध्ये गणित आणि सामाजिक विज्ञान परिषदेत मांडला आणि तो सोडवण्यासाठी काही प्रणाली(algorithms) सुचवल्या. वरील पद्धतीत केवळ दोन व्यक्ती आहेत आणि विभागणी ५०% आहे. गणिताच्या द्रुष्टिकोनातून काही challenging प्रश्न तयार होतात.
१)केक तीन (किंवा अधिक व्यक्तींमध्ये) समान वाटायचा असेल तर कसा वाटायचा?
२)केक दोन किंवा अधिक व्यक्तींमध्ये वेगवेगळ्या प्रमाणात वाटायचा आहे.उ.दा.केक अ आणि ब मध्ये ८:५ ह्या गुणोत्तरात वाटायचा आहे.
३)कमीत कमी छेद देवून केक अनेक व्यक्तींमध्ये सर्वसमान कसा वाटायचा?
पहिल्या प्रश्नाचे उत्तर सोपे नसले तरी स्टीनहॉसनी सुचवलेली प्रणाली समजायला सोपी आहे. समजायला सोपे आणि गणिताची कमीत कमी पार्श्वभूमी लागणारे हे cake cutting problems गेल्या काही वर्षात गणिती वर्तुळांत लोकप्रिय झाले.
सध्या पहिल्या प्रश्नावर विचार करा आणि काही सुचते का सांगा.
भेंडी
वाचने
5875
प्रतिक्रिया
18
मिसळपाव
प्रतिक्रिया
छ्या...
- इतका डोक्याला खुराक असेल तर आपण तर तो केक फक्त आपलाच खुराक आहे असे समजून वागू!!! एरवी, "ए, केलेत हे तुकडे. हवं तर खा नाही तर चपला घालून चालू पड..." :)
- माणसांबाबतच असले प्रश्न येत असतील. प्राणीच फक्त एकमेकांना ओरबाडत अन्नही ओरबाडून घेत असावेत.
- पहिल्या उदाहरणात एका व्यक्तीने केक कापताना मोजपट्टी वापरली होती का? नसेल तर, तिथं फेअरनेस वगैरे हे केवळ काल्पनिक आहे. त्यामुळं पुढचे सिद्धांत वगैरे गारद होतात.
- एवीतेवी, गणिताची कमीतकमी पार्श्वभूमीच ना? मग होऊ द्या की थोडं - ए, तू मोठा तुकडा घेतलास, मलाच का छोटा? (या कमीतकमी पार्श्वभूमीवर, "चवीपुरतं मीठ", "हिंगाची चिमूट", "मूठभर..." हेच अंतिम सत्य असतं. कल्पना नव्हे).
... म्हणजेच मुद्देही मोजता येणार नाहीत. हे हलकेच घ्यावे. बाकी गणिती खेळ्या चालू द्या... गणिताशी दुश्मनी करण्याचा अजिबात इरादा नाहीये.तीन साठी प्रणाली द्या बॉस
१)केक
मेंदूला केकचा खुराक!
निव्वळ
तेच
In reply to निव्वळ by विजुभाऊ
काही ग्रुहतिके
In reply to तेच by पाषाणभेद
ह्यावरुन
केक काहि वाटून खायची गोष्ट आहे का??
दोन केक
पण मी
चुचु
गोष्टीतील
च्या मारी !
हे पहा भेन्डी बाजार
जमल्यास
केकचा आकार
म्हणूनच
In reply to केकचा आकार by पक्या