रवा ढोकळा
गेल्यावेळेस बेसनचा ढोकळा केला तेव्हा माझ्या नवर्याचं म्हणणं पडलं की त्याला पांढरा ढोकळा जास्त आवडतो, मग म्हटलं याच पद्धतीनं रव्याचा ढोकळाही बनवायला हरकत नाहीये...रवा ढोकळा बनवायचा हा तसा माझा पहीलाच प्रयोग पण छान लागतो हा ही ढोकळा...आणि बेसन ढोकळ्यापेक्षा तसा जास्त पैष्टिकही असेल असं म्हणायला हरकत नाहीये :)
साहीत्यः
ढोकळा
१ कप बारिक रवा (जाड + बारिक रवा असं ही घेता येइल...)
३/४ कप दही (आंबट असेल तर उत्तम...)
१.५ टीस्पून इनो
१ टेस्पून तेल
२ चमचे लिंबाचा रस किंवा १/२ चमचा सायट्रीक अॅसिड पाण्यात विरघळुन घेणे.
चवीनुसार मीठ
१ टेस्पून साखर (ऐच्छिक)
२ चमचे आले-मिरची पेस्ट
थोडेसे पाणी (कधी कधी लागतही नाही, रवा आणि दह्यावर अवलंबुन असते...)
चिमुटभर हिंग
फोडणी:
तेल
मोहरी
मिरची
हिंग
काळे तीळ (ऐच्छिक)
२ चमचे पाणी
कढीपत्ता
कोथिंबीर
कृती:
१) एका खोल पातेलीत रवा घ्या.
२) रव्यात दही+तेल + मीठ् + लिंबाचा रस + आले-मिरची + हिंग नीट मिसळुन घेणे.
३) गरज असल्यास हळुहळू पाणी घालावे, अंदाजे इडलीच्या मिश्रणासारखे झाले पाहीजे.
४) ज्यात ढोकळा वाफवावा लागेल अश्या पातेल्यात पाणी उकळत ठेवावे ...
५) पाण्याला उकळी फुटली की वरिल मिश्रणात इनो मिसळावे आणि एकाच बाजुने हलक्या हाताने गोल-गोल ढवळावे, १/२ - १ मिनीटात हे मिश्रण फुगून येइल...जर नाही आले तर अजुन थोडेसे इनो टाकावे किंवा चिमुटभर सोडा टाकावा...हे अगदी वाफवण्याआधीच करावे... खुप आधी करुन ठेवल्यास ढोकळा नीट फुगणार नाही.
६) एका तेल लावलेल्या खोलगट थाळीत मिश्रण टाकुन २५-३० मि. मध्यम आंचेवर वाफवावे..
७) ढोकळा वाफवुन झाला की त्याचे चौकोनी तुकडे करावेत. ढोकळा थोडा थंड झाल्यावरच कापावा...
८) आता फोडणीसाठी तेल तापवत ठेवावे...तेल तापले की मोहरी टाकावी. मोहरी तडतडल्यावर तीळ्,कढीपत्ता,मिरची आणि हिंग टाकावा.
९) आंच बंद करुन २ चमचे पाणी टाकुन हे लगेचच ढोकळ्यांवर ओतावे...
१०) कोथिंबीर घालून सजवा... आणि खायच्या कामाला लागा...
वाचन
21757
प्रतिक्रिया
0