Skip to main content

शशक- एका पायाचा कावळा

Published on 16/09/2025 - 13:11 प्रकाशित मुखपृष्ठ
वडील गेल्याने अचानक सुट्टी घेउन त्याला भारतात यावे लागले. चुलत भावांनी सुरुवातीचे विधी केले होते, पण "निदान पिंडदानाला तरी ये" म्हणुन त्याला गळ घातली होती. गुरुजी आले. त्यानी सगळे विधी समजावुन सांगितले. त्यावर तो आढ्यतेने म्हणाला" माझा या सगळ्यावर अजिबात विश्वास नाही. केवळ थोडक्यासाठी वाद नकोत म्हणुन मी हे सर्व करायला तयार झालोय." सगळे घाटावर पिंडदानाला जमले. बराच वेळाने एक कावळा पिंडावर उतरला आणि भाताची मूद चिवडु लागला. त्याला एकच पाय होता. याने काही वेळ पाहीले मात्र आणि धाय मोकलुन रडु लागला. गुरुजींना कळेना काय झाले?
लेखनविषय:
लेखनप्रकार

याद्या 2826

मित्रमंडळांची नावे

Published on 15/09/2025 - 18:13 प्रकाशित मुखपृष्ठ
ख फ वर एक मजेदार चर्चा वाचली. चर्चेची सुरवात अ बा नी सुरू मग गवि नी त्यात भर टाकली. त्यातली गम्मत इथे कळावी आणि त्या गमतीत आणखी भर पडावी म्हणून हा धागा. पुढचे शब्द गविं आहेत. मित्रमंडळांची नावे हा रोचक विषय आहे. माझ्या कॉलेज जीवनात, म्हणजे तीसेक वर्षे मागे जा.. तेव्हा रक्तपात, युद्ध, संघर्ष याला खूप सन्मान होता. संग्राम मित्र मंडळ, झुंजार मित्र मंडळ, क्रांती तरुण मंडळ, फायटर, तलवार, ... एका ठिकाणी तर ब्लड ग्रुप असे नाव वाचले होते.
लेखनविषय:
लेखनप्रकार

याद्या 4347

अमेझॉन प्राईम सीरियल आस्वाद- 4 मोअर शॉट्स प्लीज !

Published on 15/09/2025 - 15:54 प्रकाशित मुखपृष्ठ
#पुरोगामी सुधारणावादी लेखन #बहुजन हिताय बहुजन सुखाय ______ ४ मोअर शॉट्स प्लीज, स्त्रीत्वाचा मुक्त हुंकार !! ______ '४ मोअर शॉट्स प्लीज!' ही Amazon Prime Video वरील एक लोकप्रिय वेब सिरीज आहे जी नुकतीच पाहण्यात आली. ही सीरियल जी केवळ मनोरंजनापलीकडे जाऊन आधुनिक भारतीय महिलांच्या जीवनातील अनेक पैलूंचा वेध घेते. ही मालिका म्हणजे आजच्या स्त्रीच्या भावनांचा, तिच्या संघर्षाचा, तिच्या स्वप्नांचा आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे तिच्या 'मुक्त हुंकारा'चा आरसा आहे.
लेखनविषय:
लेखनप्रकार

याद्या 3339

छोटाच होता,काही कळायचं वय नव्हते.

Published on 15/09/2025 - 12:13 प्रकाशित मुखपृष्ठ
छोटाच होता,काही कळायचं वय नव्हते. तो-आई,तांदळाची खीर कर ना! "हात मेल्या दळभद्री कुठला!" वडील दुसर्‍या गावी नोकरीवर होते.सुट्टीवर येताना रातराणीचा अपघात झाला. मोठा मुलगा म्हणून जे काही सांगितलं ते करत गेला. "बाई,आज आमच्या घरी चौदावा आहे,मी शाळेत येवू शकणार नाही". न सांगता घरी राहीला असता तरी कुणी काही म्हणले नसते. तांदळाची खीर वाढताना आईचा बांध फुटला. भर पंक्तीत त्याला बदडला. लहान होता तरी मोठे व्हावे लागले. उद्ध्वस्त घडी बसवायला अर्धे आयुष्य गेले. अचानक,म्हातारी आई गेली. तेरावा झाला,कोपर्‍यात बसून होता.
लेखनविषय:
लेखनप्रकार

याद्या 4948

डोक्याला खुराक देणारा रंगतदार ‘ठोकळा’

Published on 15/09/2025 - 09:41 प्रकाशित मुखपृष्ठ
ही घटना सन 1974 ची . . . हंगेरीतील वास्तुरचनाशास्त्राचे प्राध्यापक एरनो रुबिक आपल्या विद्यार्थ्यांना त्रिमितीय रचना समजावून सांगायचे तेव्हा त्यांच्या लक्षात आले की, यासाठी निव्वळ तोंडी शिकवण्याबरोबर एखादे पूरक शैक्षणिक साधन निर्माण केल्यास विद्यार्थ्यांना ही संकल्पना समजायला सोपी जाईल. मग विचारांती त्यांनी विशिष्ट प्लास्टिकच्या घटकांचा वापर करून 3 X 3 X 3 रचनेत एक क्यूब तयार केला. त्यामध्ये त्याच्या सहा पृष्ठभागांवर सहा वेगळ्या प्रकारचे रंग दिसणार अशी ती रचना होती.
लेखनविषय:
लेखनप्रकार

याद्या 4496

चमकणारे आभास निळे

Published on 14/09/2025 - 14:06 प्रकाशित मुखपृष्ठ
जागं मन हे, अर्धवट मिटल्या डोळ्यांत देकार्तेच्या का शंकेचा पोकळ गोंधळ. 'मी विचार करतो, म्हणून मी आहे'? पण हे विचार कुणाचे?
लेखनविषय:

याद्या 821
काव्यरस

सारे काही एकाच जातीसाठी

Published on 14/09/2025 - 03:48 प्रकाशित मुखपृष्ठ
टीपः मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीचा विचार नक्कीच करता येऊ शकतो, त्यावर न्यायालयात अनेक खटलेही चालू आहेत. पण हा लेख मराठा समाजाविषयी शासनाचा दृष्टीकोन कसा आहे त्याविषयी आहे. आमची बरोबरी करायला तुमच्या सात पिढ्या जातील सप्टेंबर 2025 मध्ये ऐन गणेशोत्सवाच्या धामधुमीत मनोज जरांगे यांच्यासोबत हजारो मराठा आंदोलक आरक्षणाच्या मागणीसाठी मुंबईच्या आझाद मैदानात येऊन धडकले. जरांगे यांनी उपोषण आरंभले. सर्व वर्तमानपत्रे, टीव्ही चॅनल्स एक आणि एकच बातमी चालवू लागले ते म्हणजे मराठ्यांचे आंदोलन.
लेखनविषय:
लेखनप्रकार

याद्या 3839

शिक्षा.....

Published on 11/09/2025 - 16:24 प्रकाशित मुखपृष्ठ
टप्पी टप्पी टप्पी.... छोटा मन चेंडू खेळण्यात मग्न होता. खेळता खेळता त्याच्या हातून चेंडू निसटला आणि आईने कट्ट्यावर मांडून ठेवलेल्या काचेच्या कपला धडकला. कप खाली पडला आणि फुटला. सुमित्रा हे डोळ्याच्या कोपर्‍यातून पहात होती. तीला पहायचे होते की आता मन काय करतो. एक समजूतदार पालक म्हणून तीने यावर लगेच व्यक्त व्हायचे मुद्दामुनच टाळले. "मम्मा माझ्या कडून कप फुटला. मला शिक्षा सांग" . मनच्या वाक्याची सुमित्राला गम्मत वाटली. आणि मन खोटे बोलला नाही याचे बरेही वाटले. " कप फुटला ना मग शिक्षा ही हवीच.
लेखनविषय:
लेखनप्रकार

याद्या 2209

द्रष्टादृश्यदर्शन

Published on 11/09/2025 - 00:01 प्रकाशित मुखपृष्ठ
द्रष्टादृश्यदर्शन ________________________ #सनातनी मनुवादी लेखन अर्थात ज्या सनातन ज्ञानाच्या, आकलनाच्या रक्षणाकरिता , जतन करण्याकरिता वर्णाश्रम धर्माची व्यवस्था भगवंताने घडवली त्या विषयाशी संबंधित. # स्वान्तःसुखाय अर्थात इथे कोणालाही काहीही पटवुन देण्याचा उद्देश नाही. हे केवळ स्वतःच्या सुखाकरिता आहे , मजेकरिता आहे , आनंदाकरिता आहे. ________________________ साधारण संध्याकाळची सात साडेसातची वेळ असावी. सप्तर्षीगडावरुन खाली उतरत होतो . आज कसे कोण जाणे ध्यानाला बसलो ते इतके खोल गेलो कि स्थलकालाचे भानच राहिले नाही. आता मात्र अंधार पडायला लागला होता. काहीही स्पष्ट दिसेनासे झालेले होते.
लेखनविषय:
लेखनप्रकार

याद्या 1197

भिक

Published on 10/09/2025 - 15:52 प्रकाशित मुखपृष्ठ
भिक - शशक गणपती विसर्जनाचा दिवस. डीजेचा दणदणाट आसमंताला भिडलेला. एका मंडळापुढे पोरं तर्राट नाचत होती. एकजण खेळण्यातला हाडाचा सापळा घेऊन नाचत होता. बेभानपणे ! तशा गर्दीत एक लहान मुलगी घुसली. भिक मागायला. सापळावाला तिच्याकडे बघून हसला. त्याने तिला तो सापळा देऊन टाकला. भिक म्हणून . वारे औदार्य! ती घाबरली ; पण ते एक खेळणंच तर होतं. तो घेऊन ती एका मांडवाच्या मागे गेली. आडोशाला. तिथे तिची आई होती. झोपलेली. तिने आईकडे पाहिलं. मग त्या सापळयाकडे पाहिलं. आणि तिला एकदम हुंदकाच फुटला.
लेखनविषय:

याद्या 1161