Skip to main content

[ज्योतिष] एबर्टीन तंत्राने जन्मपत्रिकेचे मोफत विश्लेषण

Published on 30/11/2010 - 09:36 प्रकाशित मुखपृष्ठ
मिसळपावच्या वाचकाना त्यांच्या जन्मपत्रिकेचे एबर्टीन तंत्राने मोफत इंग्लिश्मध्ये विश्लेषण पुढील काही दिवस नि:शुल्क करून मिळेल. इच्छुकानी खालिल माहिती मला इमेलने (upadhye.rajeev@gmail.com) कळवावी. नाव जन्म तारीख जन्मस्थळ जन्मवेळ एका इच्छुकास एकाच जन्मतारखेचे विश्लेषण करून मिळेल याची कृपया नोंद घ्यावी. अधिक व्यक्तींसाठी हे विष्लेषण हवे असेल किंवा विशिष्ट समस्ये साठी मार्गदर्शन हवे असल्यास त्यासाठी शुल्क भरावे लागेल. ज्यांना हे विश्लेषण कसे असते याचा अंदाज घ्यायचा आहेत्यांनी या (http://yuyutsu.webs.com/Sample%20Report.pdf) लिंकवर टिचकी मारून नमूना विश्लेषण उतरवून घ्यावे.
लेखनविषय:

याद्या 2749

अवचट आणि मी

Published on 30/11/2010 - 09:04 प्रकाशित मुखपृष्ठ
सर्व मिपाकरांना सूचित करण्यात येते आहे की, श्री अनिल अवचट आणि आम्ही ह्यांचा काहीही संबंध नाही. आदरणीय नंदन ह्यांनी आम्हाला प्रदान केलेले एक अवचटांचे पुस्तक आम्ही वाचलेले आहे, ते आम्हाला आवडले देखील. पण त्याव्यतिरीक्त आम्ही समाजाची कुठलीही सेवा केलेली नाही. आम्ही मध्यमवर्गीय असे स्वतःला समजत असलो, तरी साबुदाण्याची खिचडी खाणे आम्हाला नेहमी जमतेच असे नाही, आणि गरम पाण्याची बादली गेली सतरा वर्षे पाहण्याची पाळी देखील आमच्यावर आलेली नाही. असो.

याद्या 5414

विकीलीक्समुळे उघडकीला आलेली खळबळजनक माहिती.

Published on 30/11/2010 - 07:15 प्रकाशित मुखपृष्ठ
वॉशिंग्टन - नुकत्याच विकीलीक्सवर गोपनीय कागदपत्रांच्या प्रसिद्धीमुळे अमेरिकेत खळबळ उडालेली आहे. अमेरिकेच्या गृहखात्याने या घटनेचा धिक्कार केलेला असून राष्ट्रीय सुरक्षा धोक्यात आणल्याचा दावा केला आहे. तर विकीलीक्सच्या मते अमेरिकन सरकारने महत्त्वाच्या बातम्या गोपनीयतेची सबब सांगून जनतेपासून लपवून ठेवल्या होत्या. या एकमेकांवरच्या चिखलफेकीच्या वातावरणात त्या कागदपत्रांमधून बाहेर येणाऱ्या सत्यांमुळे अमेरिकन सरकारची परिस्थिती अधिकच बिकट झालेली आहे. आमच्या वार्ताहराने या कागदपत्रांचा अभ्यास केल्यावर एक सनसनाटी बातमी हाती लागली. ती म्हणजे ३_१४ विक्षिप्त अदिती ऊर्फ श्री. श्री. सौ. सौ.

याद्या 15453

शब्द मागती ते - लिहिण्या अजून शाई...

Published on 29/11/2010 - 22:45 प्रकाशित मुखपृष्ठ
फोडून बांध मनीचा - झालो जसा प्रवाही ! अश्रु बनुन गेला - मग शब्द अर्थवाही तोडून तसबीरिला - ती एकसंध राही ऐना कसा कळेना - जपतो तिला मला ही मागुन ही सुखाला - आले न हाती काही दुःख हेंच मजला - देते अजून ग्वाही सांगुन ही कुणाला - कळले न गुज मनीचे कुसुमास कागदी त्या - कुठला सुवास येई? कळवून ही तुला - मी कळलो कधीच नाही तोच उम्बरा अन - तीच ठेच पाई छापून ही स्वतः ला - मी ऊमट्लोच नाही शब्द मागती ते - लिहिण्या अजून शाई जाळुन ही मला - मी उरलो दिशांत दही वारा धुरास माझ्या - चघळुन रोज पाही टाळुन ही मला तू - मी टळलोच नाही जरी चन्द्र मी आता - मी सूर्य उद्याचा ही माझी कविता ...मयुरेश साने...दि १६-औग-10
लेखनविषय:

याद्या 2764
काव्यरस

समाजाच प्रबोधन करण्याची गरज.....

अज्ञात
Published on 29/11/2010 - 21:17 प्रकाशित मुखपृष्ठ
आपल्या समाजात एकीकडे बर्‍याच वैचारीक चर्चा होतात. तर त्याच वेळी दूसरीकडे जुन्या विचारसरणीचा पगडा दिसतो. आपल्या समाजात पैसे खाणारा, गुंडगीरी करणारा, दारु पिऊन गटारात लोळाणारा, स्त्रीयांवर बलात्कार करणारा माणुस एकवेळ उजळ माथ्यानी फ़िरु शकतो तसच एखादा वेश्येकडे नेमानी जाणारा माणुससुद्धा समाजात उघडपणे वावरु शकतो पण जोरजबरदस्तीनी वेश्याव्यवसायात ढकलल्या गेलेली एखादी वेश्या, तीची मुलं, तीला सहानुभुती दाखवणारी मंडळी ही मात्र समाजाच्या दृष्टीनी नालायक ठरतात. वेश्या, त्यांची मुलं व HIV बाधीत व्यक्तींबाबत समाजाची दृष्टी इतकी कलुषीत असते की आपण कल्पनाच करु शकत नाही.

याद्या 5004

विकी लिक्स विरूद्ध (अमेरिकन) सरकारः तुम्ही कोणत्या बाजुला?

Published on 29/11/2010 - 18:51 प्रकाशित मुखपृष्ठ
विकी लिक्सने उघडलेल्या २५०,००० गोपनीय कागदपत्रांमुळे उठलेले वादळ शमण्याचे लक्षण दिसत नाही. यात केवळ अमेरिकाच नाही तर जगातील अनेक राष्ट्रांची/त्यांच्याबद्दलची माहिती थेट/संदर्भाने उघड होते आहे / झाली आहे. त्याच बरोबर अमेरिकेचे दुटप्पी धोरणही दिसत आहे. मात्र अमेरिकेनेआशी कागदपत्रे उघड करणे राष्ट्रीय सुरक्षेच्या विरुद्ध मानले आहे. विकी लिक्स मुळे अमेरिकन सरकारचे दुटप्पी धोरण, "ग्राहक राष्ट्रांसाठी" गुंडाळलेले/बदललेले/वाकवलेले नियम, त्रयस्थ राष्ट्रांबरोबरचे गुप्त समझौते / व्यापार / व्यवहार, प्रसंगी शत्रु राष्ट्राबरोबरचे व्यावारी संबंध वगैरे माहिती उघड झाली आहे.

याद्या 7188

सोवळ्यात सुतावर पाय?

Published on 29/11/2010 - 17:38 प्रकाशित मुखपृष्ठ
सोवळ्यात असताना सुतावर पाय देता येत नाही का? ते का? यामागचा काही संदर्भ किंवा माहिती मिळाली तर हवी आहे. श्रीपाद कृष्ण कोल्हटकरांच्या 'पांडुतात्यांची निर्जळी एकादशी' या लेखात त्याचा संदर्भ आहे. लेख इथे वाचता येईल.

याद्या 8216

एक होता विदूषक

Published on 29/11/2010 - 12:21 प्रकाशित मुखपृष्ठ
एक आटपाट नगर होते. नगर तसे संपन्न, नगराला लक्ष्मीचा आणि सरस्वतीचा वरदहस्त लाभला होता. खरेतर सरस्वतीने जरा सढळ हातानेच इथे खर्च केला होता. नगरात मोठा मोठे थोर कलाकार, वादक, लेखक, कवी, गायक, नकलाकार निवास करत होते. ह्या हरहुन्नरी लोकांना त्यांच्या राज्याबरोबरच बाहेरच्या राज्यात देखील मोठे नाव होते, सन्मान होता. ह्या अशा नगरात काही नगरकंटक देखील होते पण ते सुग्रास जेवणात मेथीचा खडा यावा इतपतच, आणि खरेतर आरोग्याला गरजेचे. ह्या नगरात एक विदूषक राहायचा. आपली कामे सांभाळून झाली की मग नगराच्या मुख्य चौकात यावे आणि खेळाला सुरुवात करावी हा त्याचा नेहमीचा उद्योग.
लेखनविषय:
लेखनप्रकार

याद्या 18540