तुला आपलेसे करावे किती ?...
तुला आपलेसे करावे किती ?
जगावे किती ? मी ! मरावे किती ?
किनाराच मी ! भरती ओहटिचा
बुडावे किती ? मी ! तरावे किती ?
तू जवळून जाता ! मनी बाग फुलते
तू खुडावे ! मी ! मोहरावे किती ?
तुझी याद येते ! तसा तोल जातो
सावरून मी ! वावरावे किती ?
ते "कुबेरास- लक्ष्मीस" घेऊन आले
लिलावात माझ्या ! हरावे किती ?
चांदणे सारखे आज जाळू पहाते
तुझे आज नसणे स्मरावे किती ?
मिठी दे युगांची ! धुके दूर सारु
फुलांनीच दव पांघरावे किती ?
तुला "मी "- मला "तू" - मला "तू" - तूला "मी"
परक्या परी -हे झुरावे किती ?
मयुरेश साने...दि.०५-डिसेंबर-१०
लेखनविषय:
याद्या
1341
काव्यरस
मिसळपाव