मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

३१ डिसेंबरला तुम्ही काय पिनार ?

आनंद कवठेकर ·

In reply to by स्पा

प्रसाद_डी 31/12/2010 - 12:50
या मधिल काहीच का नहि दिले हो या धागा कर्त्या ने.. आमच्या सरख्याना थोडे कष्ट(ईथे जरा जास्तच) पडता राव.

In reply to by गणपा

अवलिया 31/12/2010 - 13:24
चर्चा ऐकायला मी येईन म्हणतो.. बोलणार काही नाही...फक्त ऐकेन आणि तोंड वेगळ्या कामात गुंतवुन ठेवेन

In reply to by अवलिया

५० फक्त 31/12/2010 - 13:55
दुपारी उन्हाच्या वेळी, जरासं आंबट ताक घ्या, त्यात लाल कमी आणि काळा जास्त अश्या रंगाचा गुळ घाला , हे मिश्रण काळ्या कपड्याने झाकुन ठेवा २-३ तास. नंतर ४-५ कांदे चिरुन त्याला मिठ लावुन ठेवा, त्या कांद्याला सुटलेलं पाणि ताकात घाला. पुन्हा हे सगळे १ तास भर काळ्या कपड्याने झाकुन ठेवा. नंतर सावकाश या वर जे पाणि आलेलं असेल ते वेगळं करुन प्या. आयचा घो व्हिस्की, रम, बँडी नाही न काय नाही, याच्या पेक्षा भारी किक फक्त शुद्ध गांजाच देउ शकतो. सदर प्रयोग आपल्या आपल्या जबाबदारीवर करावेत. आम्ही हे उद्योग कालेजात असताना केले होते, त्याची नशा आज पर्यंत उतर्लेली नाही, म्हणुन आता काही पित नाही. हर्षद.

In reply to by आत्मशून्य

पिवळा डांबिस 02/01/2011 - 15:16
तुम्ही पाजाल ते!!! (सॉरी, आत्मशून्य! नवीन प्रतिसाद द्यायची (*$%&*)बंदी केली गेल्यामुळे तुमच्या प्रतिसादाला तिरपा छाट द्यायला लागत आहे!!!!)

In reply to by Nile

परिकथेतील राजकुमार 31/12/2010 - 17:16
ड्रॉपरवरुन इंजेक्शनवर आलात का? प्रगती आहे. बाटली केव्हा घेणार?
निळोपंत अभ्यास वाढवा. जाणकाराकडून 'इंजेक्शन मारणे' म्हणजे काय हे आधी समजावुन घ्या बरं.

In reply to by अवलिया

आनंद कवठेकर 31/12/2010 - 13:02
माझ्या महीती प्रमाने शिवम्बु औषध म्हणून घेतात आनी गॉमुत्र पाप कमी करण्यासाठी.... घेतात / शिम्प्द्तात.

In reply to by परिकथेतील राजकुमार

आनंद कवठेकर 31/12/2010 - 13:05
तुम्हि हैदराबाद ल येनर असाल तर तुम्ही मनाल ते .......नाहीतर हा नुसता प्रश्न सम्जा.... :-)

In reply to by आनंद कवठेकर

परिकथेतील राजकुमार 31/12/2010 - 13:09
तिकडून पैसे आणि स्वतःचा फोटो पाठवा. तुमच्या पैशानी दारु घेउ आणि तुमचा फोटो समोर ठेवुन पिउ.

गवि 31/12/2010 - 13:18
"इतर काही" ला मत दिले आहे. कारण आम्ही जे पितो त्यावर व्हिस्की असे लिहिलेले असले तरी ती दारु नव्हे. "व्हॉट इस लाईफ विदाउट रॉयल च्यालेंज" असे एक संतवचन ऐकल्यापासून आम्ही आयुष्याला अर्थ असावा म्हणून थोडे आचमन करतो.

चिंतामणी 31/12/2010 - 13:47
१) व्हिस्कीचे वर्गीकरण दिलेले नाही. याच प्रमाणे वोडका, बिअर, जीन, रम यांचेसुद्धा वर्गीकरण नाही. काय उपलब्ध असणारे हे कळल्याशीवाय प्रतिक्रीया कशी देणार. २)कॅकटेल (कॉकटेल) चे डिटेल्स दिले नाहीत. ३)कोड्रिंक (कोल्ड्रींग)- काय काय देणार याचा तपशील नाही. सर्वात महत्वाचे ४) ठिकाण, वेळ आणि दाता कोण याचा तपशील नसल्याने प्रतिक्रीया देत नाही.

धमाल मुलगा 31/12/2010 - 15:19
ग्राईप वॉटर. धन्यवाद. विषय संपला.

ज्ञानोबाचे पैजार 31/12/2010 - 15:41
तुम्हाला शोधुन काढुन तुमचे गरम गरम रक्त पिणार आहोत. म्हणजे परत असले कौल निघणार नाहीत. (उलट्या पायांचा) (आणि उलट्या खोपडीचा)

In reply to by ज्ञानोबाचे पैजार

धमाल मुलगा 31/12/2010 - 15:45
सोड्यात घेणार की पाण्यासोबत? :D

आनंद कवठेकर 31/12/2010 - 18:00
माझ्या मिपावरच्या पहिल्याच आणि शेवटच्या लेखनाला सर्व जुन्या सभासदानी इतका छान प्रतिसादाबद्दल धन्यवाद.

नुसतेच !

विश्वेश ·
लेखनविषय:
काल रात्री उशिरापर्यंत काम करत असताना, माजघरातून अचानक कुजबुज ऐकू आली .... पाहिलं तर जुने कोपरे, कोनाडे स्वताशीच काहीतरी कुजबुजत होते ... कान देऊन ऐकल ... देत होते मला शिव्या काढत होते खोट ... गेली बरीच वर्ष त्यांना विसरून नुसतेच भरतोय खिसे, नुसतेच भरतोय पोट ... मला म्हणाले ... आठवतंय का तुझ रुसून कोपर्यात बसण ... आणि आई ने कान धरले कि गालात खुदकन हसण ... आता फार मोठा झालास ... घरातही वावरतोस साहेब म्हणून ... रुसलास कि काय बुआ...

कडेलोट !

विश्वेश ·
लेखनविषय:
आज वाटले इतक्या लवकर रात सरली ... आभाळ निळावले पण कुशीतून तुझ्या मोकळे होण्यास मन आळसावले ... सांगत होते अगतिक मन अजून फिटली नाही हौस झेलूदे चार हाताच्या ओंजळीत हा दवाचा पाउस झटकून मोकळे केस उठून लगबगीने कुठे जासी ? झालो आहे ह्या मोहरानात मी वनवासी ... शोधात होत्या अनंत काळ तुला माझ्या चुरगळलेल्या नजरा .. हातात उरला होता तुझ्या सुगंधाने घमघमणारा गजरा ... समजावले मनाला .. चला भरायचे आहे पोट ... पुन्हा एकदा ........ मी माझाच केला कडेलोट ...

अल्कोहोलिक कॅलोरीस

खादाड अमिता ·
लेखनविषय:
डिस्क्लेमर १: मद्यपान आपल्या स्वास्थ्या साठी हानिकारक असते. ह्या लेखाचा हेतू - 'कुठली ड्रिंक घेतलेली चांगली' हे सांगायचा नसून, 'कुठली ड्रिंक प्यायलात तर किती कॅलोरीस शरीरात वाढतील?' हे सांगण्याचा आहे. धन्यवाद. ३१ डिसेंबर ची पार्टी. 'अरे आज मस्त बसू या.. उद्या काय हापिसात सुट्टी. उगीच लवकर उठायचे टेन्शन नाही!' 'आज आम्ही के. पी. ला जाणार आहोत. हार्ड रॉक कॅफे ला. फुल धमाल.' 'आम्ही सगळे मित्र मंडळी नेहमीच त्या बीच रिसोर्ट ला जातो.' असे आज बहुतेक लोकांचे पार्टी प्लान्स असतील... म्हणजे आमच्या सारखे नसाल तर. आमच्या ह्यांना प्लानिंग करायला खूप आवडत.

नव्या वर्षांच्या शुभेच्छा

विजुभाऊ ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
मित्रानो. दरवर्षी नेमाने येणारा क्षण आज पुन्हा येतोय या वर्षाला निरोप देवून नव्या वर्षात प्रवेश कराण्याचा क्षण. नवी नवरी माहेराहून सासरी जाताना तिच्या मनात असते तशी हुरहुर आणि आनन्द अशा सम्मिश्र भवना घेवून आपण हे क्षण जगत असतो. सरत्या वर्षात काय गमावले /काय कमावले याचे जमाखर्च मांडत आपण नव्या वर्षात काय करणार याचे मनसुबे रचत असतो. लहानपणी १ जानेवारीला मी गेल्या वर्षी झोपलो ते एकदम थेट्या वर्षीच उठलो असे सांगायचो. ते खरे देखील होते. ३१ दिसेंबरला टीव्हीवर फारतर रात्री ११ पर्यन्त कार्यक्रम असायचे. गावात एखादा गाण्याचा कार्यक्रम वगैरे असायचा. ३१ डिसेंबर हा इवेन्ट झालेला नव्हता.

लाखाचा असो वा कोटीचा, तुमचे आमचे सेम असते..........

अमोल देशमुख ·
लेखनविषय:
आदर्श म्हणॆ लवासाला तु किती लाखाचा तर टु-जी म्हणे सी.डब्ल्यु.जी ला तु किती कोटीचा एक घोटाळा म्हणे दुस-याला काडीने खाल्ले काय अन हाताने खाल्ले काय शेण म्हणजे शेण असते लाखाचा असो वा कोटीचा तुमचे आमचे सेम असते अनंत घोटाळ्यांनी गाजलेल्या सरत्या वर्षाला निरोप देताना खरव आनंद होतो आहे, २०१० हे वर्षच मुळी महाघोटाळ्यांचे वर्ष म्हणुन गणले जाते की काय इतके मोठे घोटाळे या सरत्या वर्षात झाले. कॉमनवेल्थ घोटाळा काय अव टु-जी स्पेक्ट्र्म घोटाळा काय यांनी मागील सर्व घोटाळ्यांचे विक्रम मोडीस काढले, भारताचा अर्थव्यवस्था खिळखीळी होती की काय अशी परीस्थीती या घोटाळ्यांनी निर्माण केली.

२०१०: एक उत्तम वर्ष

ऋषिकेश ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
२०१० ला बाय बाय करायची वेळ आली आहे. अश्यावेळी वाटेवर थांबून जरा मागे सरलेल्या २०१०कडे बघताना काय वाटतं? मला तरी हे सरतं वर्ष भारताच्या दृष्टीकोनातून एक उत्तम वर्ष वाटतं. एक धावता आढावा: क्रिडा: क्रिडा क्षेत्राकडे बघता हे वर्ष भारतासाठी अप्रतिम गेलं यात वादच नाही. राष्ट्रकुल खेळांच्या (शेवटच्या क्षणापर्यंत श्वास रोखायला लाऊन नंतर) केलेल्या दैदिप्यमान प्रदर्शनाबरोबरच त्यात भारतीय खेळाडूंनी केलेली पदकांची लयलूट, मिळवलेलं दुसरं स्थान सारंच स्वप्नवत होतं. आशियायी खेळातही आतापर्यंत सर्वाधिक मिळालेली पदके क्रिडाक्षेत्रातील भारताच्या वाढत्या परिघाची ग्वाही देत होती.

कागद

नगरीनिरंजन ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
आज लवकरच ती कामाला लागली. पोराला काखोटीला मारून आणि नायलॉनचं मळकट पोतं घेऊन ती नेहमीप्रमाणे त्या रस्त्यावर आली तेव्हा सगळीकडे कागदांचा खच पडला होता. काल संध्याकाळी तिथून गेलेल्या भव्य मोर्चात उधळलेल्या हँडबिलांनी इतरवेळी सुबक नेटका वाटणारा तो रस्ता आता मातीत खेळून आलेल्या वांड पोरासारखा दिसत होता. पोराला रोजच्यासारखं नंदूच्या टपरीच्या वळचणीला ठेवून ती भराभरा कागद गोळा करायला लागली. नेहमीपेक्षा निम्म्या वेळातच तिचं पोतं कागदांनी गच्च भरून गेलं आणि रस्ताही बर्‍यापैकी मूळ स्वरुपात आला. सगळे कागद आता संपले होते तरी ती शोधकपणे थोडा वेळ इकडे तिकडे पाहत हिंडत राहिली.

आजी-माजी संमेलनाध्यक्षांची ग्रंथनगरीकडे पाठ..

अजय जोशी ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
आजपर्यंत मराठी साहित्यिकाच्याच बाबतीत जे विधान केले जात होते ते आता संमेलनाध्यक्षांच्या बाबतीतही करावेसे वाटते. दिनांक २४ डिसेंबर रोजी संध्याकाळी ६:३०वाजता ग्रंथदिंडी दादोजी कोंडदेव स्टेडियममध्ये वेळेवर पोहोचली. त्यावेळी सपट परिवार लोकमानसचा चर्चेचा कार्यक्रम मुख्य मंडपात नुकताच संपला होता. चर्चेत डॉ. द.भि. कुलकर्णी हेही सहभागी होते. त्यामुळे ते त्याच मंडपात होते. ते ग्रंथप्रदर्शनासाठी येणार आहेत काय हे पहायला मी गेलो. तोपर्यंत त्यांना कोणी चहा दिला नव्हता. म्हणून चहाची ऑर्डर द्यायला मी मंडपाच्या बाहेर आलो खरा...! पण त्याचवेळेस श्री. उत्तम कांबळेसाहेब ग्रंथदिंडी घेऊन पोहोचले सुद्धा. द.भि.

संकल्प करावा नेटका...

समीरसूर ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
यावर्षअखेरीस पुन्हा संकल्पांची जत्रा भरेल. सगळे उत्साहात नवनवीन संकल्प करतील. दिनांक १-जानेवारी-२०११ पासून काहीतरी खास नवीन करायला सुरुवात करायची असे मनाशी खूणगाठ मारून ठरवले जाईल. थोडा विचार करता आपल्या लक्षात असे येईल की संकल्प हे तीन प्रकारचे असतात. कुठल्याही गोष्टीचा, घटनेचा, समस्येचा तीन भागात विचार केल्यास आकलन नीट होऊन प्रश्न मार्गी लागतात असे काही व्यवस्थापन क्षेत्रातल्या तज्ञांचे मत आहे. म्हणजे "याचा विचार आपल्याला तीन मार्गांनी करावा लागेल..." अशी सुरुवात केली की आपली छाप पडलीच म्हणून समजा. खोटं नाही सांगत मी, खात्रीसाठी 'द मॅकन्सी वे' हे पुस्तक वाचा. असो.