Skip to main content

वनराणी..

Published on 15/01/2011 - 03:36 प्रकाशित मुखपृष्ठ
आज पहिल्या प्रहरीच जाग आली. आज माझा विवाह आहे. पण मनांत कुठेतरी काहीतरी चुकतेय असंच वाटतं आहे. का? समजत नाहिये. भोरा खूप आनंदी आहे आज. किती दिवसापासून चाललं होतं आमच्या दोघांच्या घरच्यांचं. शेवटी ठरवलंच सगळ्यांनी. मला विचारलं. बेठकीत 'हो' म्हणून गेले. पण आज.. ?? आज असं वाटतंय की माझा जन्म हा विवाह करून भोरा चा संसार करण्यासाठी नाहिये. पाडित राहून, बांबूच्या वस्तू विणायच्या, जनावरं सांभाळयची, डोंगरात, अरण्यात जाऊन कंद जमवायची.. आणि भोरा ला सुखी करायचं?? मी का करू? भोरा मला आवडतो.. पण मला संसार नाहीये करायचा. संसार नाहीये करायचा की भोराशी संसार नाहीये करायचा?? नाही....
लेखनविषय:
लेखनप्रकार

याद्या 5627

'मी पणशीकर बोलतोय' (चित्ररुप स्मृति)

Published on 15/01/2011 - 01:47 प्रकाशित मुखपृष्ठ
२००६ च्या दिवळीला पहिल्याच पहाटे ठाण्याच्या गडकरी रंगायतन मध्ये पंतांचा खास असा 'मी पणशीकर बोलतोय' हा अभिनव कार्यक्रम ठेवण्यात आला होता. पंतांच्या पंच्याहत्तरीचे औचित्य साधुन त्यांचा सत्कारही आयोजित केला होता.

याद्या 3367

याला काय म्हणावे? धांधरटपणा की व्यसन?

Published on 15/01/2011 - 00:51 प्रकाशित मुखपृष्ठ
मी अफ़्रिकेत असताना आलेला एक प्रसंग सांगून तुमचे मनोरंजन करण्याचा प्रयत्न करतो. जुलै २००८ ची गोष्ट. मी डिसेंबर २००७ मध्येच रवांडा या छोट्या देशात नोकरी पत्करली सहा महीने काढल्यावर पत्नीला घेउन परत येण्यासाठी मी पुण्यातून निघालो. किगाली मधल्या एका मित्राच्या नुकतेच लग्न झालेल्या सुनेला पण घेउन यायचे होते, तर आम्ही तिघेही मुंबई अंतरराष्टीय विमानतळावर हजर झालो. केनया एयरवेज च्या लाइनीत उभे राहून सगळे सोपस्कार पूर्ण करून विमानात बसलॊ. रवांडाला जाण्यासाठी प्रथम नैरोबी (केनया) इथे जावे लागते आणि विमान बदलून नंतर किगाली ला जावे लागते.

याद्या 4490

' नववर्षी-संकल्प ' जाणता ...

Published on 14/01/2011 - 23:43 प्रकाशित मुखपृष्ठ
तिळगुळ देता-घेता नेते गोड-गोड बोलणार , सर्वच पक्षांचे नेते ना तोडफोड करणार शहरामधले मंत्री आता खेडयातच राहणार वाढदिवस ना आता कुणाचे फलकावर दिसणार - देशामध्ये ना कसलाही घोटाळा करणार शासन भ्रष्टाचार-प्रदूषणमुक्त अम्हा दिसणार - आमदार नि खासदार ते भत्ते ना घेणार ! सूत्रसंचालिका अंगभर कपडयातुन दिसणार 'अभिनयाच्या अंगा'स्तव 'तो' 'स्त्री-वेषी' न होणार 'जज्ज ' मराठी 'चॅनल'चे मराठीत बोलणार निकाल 'एसेमेस' विना ते स्पर्धेचे ठरणार 'नववर्षी-संकल्प'जाणता करमणूक होणार !!
लेखनविषय:

याद्या 1036
काव्यरस

नाती

Published on 14/01/2011 - 22:46 प्रकाशित मुखपृष्ठ
नाती नाती नाती नाती........... जुळ्लेली, जोडलेली, लादलेली...... खरच हवी असतात का आपल्याला ही नाती ? वाटत', बरेच वेळा आपल्याला ग्रुहितच धरतात ही नाती....! नाती....काही प्रेमाची, काही मैत्रीची, काही कर्तव्याचीही, दमछाकच होते मात्र निभावताना ही नाती...! नाही तोडून टाकता येत त्याच्यापासून आपल्याला..... मग वह
लेखनविषय:

याद्या 1326
काव्यरस

मकर संक्रांतीच्या शुभेच्छा.

Published on 14/01/2011 - 22:19 प्रकाशित मुखपृष्ठ
सर्व मिपाकरांना २०११ मकर संक्रांतिच्या हार्दिक शुभेच्छा. या निमित्त्त आमच्याकडे आमच्या सॉ. नि आज बाजरीच्या भाकरी व भाजी असा बेत केला होता. आपल्या तोंडाला पाणी सुटण्यासाठी / जळजळ होण्यासाठी खाली काही फोटो देत आहे. पहिला फोटो बाजरीची भाकरी व लोणि आणि या फोटोत त्याबरोबर भाजी पण आहे, असो संक्रांतीचं स्पेशल स्लोगन काय तर - तिळगुळ घ्या गोड गोड बोला, आणि त्याची पण सोय केलेली आहे.

याद्या 8961

मन माझं गोगलगाय !

Published on 14/01/2011 - 17:07 प्रकाशित मुखपृष्ठ
मन माझं गोगलगाय खुट्टं वाजता शंखात जाय प्राजक्ताचा दरवळ घेऊन रांगत पहाटवारा आला शिंका येतील ! आल्या शिंका !! नाक हाती शंखात पाय ! मन माझं गोगलगाय । खुट्टं होताच शंखात जाय खुणावताना हिरव्या वाटा मनास दिसतो केवळ काटा काटा टोचेल ! टोचला काटा !! मान फिरवून शंखात जाय मन माझं गोगलगाय । खुट्टं होताच शंखात जाय समोर फुटती लाट अनावर सरसरून ये नभ धरणीवर थेंब उडतिल ! कपडे भिजतिल भिजेल डोकं !
लेखनविषय:

याद्या 6026

आम्ही कविता करतो

Published on 14/01/2011 - 15:14 प्रकाशित मुखपृष्ठ
हल्ली सरळ काही सुचत नाही एक वाक्य धड लिहीता येत नाही पण व्याकरणावर रण माजवतो सध्या आम्ही कविता करतो चार ओळी इकडून उचलून चार ओळी तिकडून उचलून तरीही वामनाचे आम्हीच वारस आम्हीदेखील कविता करतो कुणी वाचो, अथवा न वाचो कुणी निंदो, कुणी वंदो घंटा कुणाला फरक पडतो म्हणूनच आम्ही कविता करतो मदत, कौल, काथ्याकुटाचा आता जरी का कंटाळा आला वाचनीय तरी हल्ली कोण वाचतो त्यासाठीच तर आम्ही कविता करतो कुणा काही बोलणे त्याज्य, कुणा काही सांगणे त्याज्य बोर्डावरच्या खेळातही आपल्यावरच राज्य 'हे राज्य व्हावे ही तो श्रींची इच्छा' समजतो बोर्ड भरवण्यासाठी आम्ही कविता करतो कवितेच्या खेळात या लेख जगती, लेख मरती चांगल्या

याद्या 2198
काव्यरस

[ज्योतिष] दिलगीरी

Published on 14/01/2011 - 14:16 प्रकाशित मुखपृष्ठ
माझ्या अमावस्येवरील लेखात अनवधानाने अमावस्या सायन मिथुन राशीत आहे असा उल्लेख झाला आहे. कट न पेस्ट केलेला मजकूर नजरचूकीने पूर्ण संपादित झाला नाही. त्याबद्दल दिलगीर आहे. कुंभ रास बरोबर आहे. मिपा च्या नवीन अवतारात लेख संपादित कसा करायचा हे माहित नसल्याने ती चूक दूरूस्त करता आली नाही. त्याबद्दल क्षमस्व!
लेखनविषय:

याद्या 1813