Skip to main content

मंत्रालयात 'आग'-बाई

लेखक माहितगार यांनी बुधवार, 21/05/2014 15:25 या दिवशी प्रकाशित केले.
कवितेचे पहिले नाव मंत्रालयात भूलाबाई भूलाबाईच्या माहेरी विरोधी नणंदा, सत्तेतल्या भावजया घरात नव्हतं मुनीमाशिवाय तिसरं कोणी मंत्रालयातबसून लोणी, खाल्लं कोणी खाल्लं कोणी तेच खाल्ल वहिनींनी वहिनींनी.... आता माझा दादा येईलग येईलग दादासोबत सभागृहात बसीनग/बसेनग दादा तुझी बायको चोरटी चोरटी असू दे माझी चोरटी चोरटी कायद्याचे हात आहेत लाबं मत्रांलयातलयात फायलींना लागलेली आग पाहून येतो थांब भूलाबाई गेल्या काढाया सासरची रुष्टी पाठी विसरल्या भूलाबाई माहेरच्या गोष्टी

नेमके काय चुकते आहे?

लेखक vikramaditya यांनी मंगळवार, 20/05/2014 21:40 या दिवशी प्रकाशित केले.
मिपावर विविध विषयांवर चर्चा होत असते. अशाच एका वेगळ्या विषयावरील हा धागा. दररोज बातमीपत्रात येण्यार्‍या व्यवसाय जगतातील बातम्‍या वाचताना एक बाब लक्षात येते कि बहुराष्ट्रीय अथवा भारतीय प्रथीतयश कॉर्पोरेटस मध्ये अती उच्च पदांवर मराठी माणसांचे प्रमाण फ़ारच कमी आढळते. कृपया लक्षात घ्या कि इथे कर्तुत्व किंवा आर्थिक यश हा विषय नसुन एखाद्या फ़ार मोठ्या कॉर्पोरेट संस्थांमध्ये अती उच्च पदावर पोहोचण्यासाठी लागणारे "खास कौशल्य" मराठी माणसाकडे कमी पडते आहे का, असा प्रश्न आहे. "मोडेन पण वाकणार नाही" हा मराठी बाणा तर ह्या आड येत नाही ना?

विकास--एक लोकचळवळ

लेखक राही यांनी मंगळवार, 20/05/2014 19:04 या दिवशी प्रकाशित केले.
दि.१६ मेच्या सायंकाळी बडोद्यातल्या विजयसभेत मोदींचे भाषण झाले. त्यातला एक मुद्दा महत्त्वाचा वाटला. विकास हा फक्त सरकारी योजनांच्या आराखड्यात न रहाता ती एक लोकचळवळ (जनअभियान) व्हावी. प्रत्येक भारतीयाला विकासात सहभागी होता यावे आणि आपण राष्ट्राच्या विकासाला हातभार लावतो आहोत याचा अभिमान त्याच्यात रुजावा, असा काहीसा तो मुद्दा होता. प्रत्येक नागरिक कशाप्रकारे विकासात भाग घेऊ शकेल याची त्यांनी दोन उदाहरणे दिली. एक म्हणजे रस्त्यांवर कचरा न फेकणे आणि दुसरे, चुकीच्या मार्गिकेतून वाहन न घुसवणे.

उन्हाळी उद्योग : भाग १ उद्योजक व्हा, आपले स्वतःचे दुकान उघडा

लेखक शेखरमोघे यांनी मंगळवार, 20/05/2014 17:03 या दिवशी प्रकाशित केले.
(मागील उन्हाळ्यात - अमेरिकेत - नातवंडांबरोबर सुट्टीत केलेल्या उद्योगांवर आधारित) प्रयोगाचे उद्दिष्ट: घरी (खेळातले आणि म्हणूनच बरेचसे काल्पनिक) "आपले स्वतःचे" दुकान उघडणे, ते उभारण्याच्या प्रक्रियेत "दुकान" म्हणजे काय, त्यात काय काय हवे/ठेवता येईल, ते कसे तयार करता येईल या वर विचार करताना आजी/आजोबांना नातवंडांच्या कल्पनाशक्तीला बरीच चालना देता येईल स्थळ: घरातील कुठलेही, जिथे पसारा करण्यास नातवंडांच्या आई वडिलांचा फारसा विरोध नसेल काळ: आळसावलेली दुपार, आजी/आजोबांबरोबर घालवण्याकरता नातवंडांच्या हातात पुरेसा वेळ, काही तरी नवीन करण्याचा इरादा, "आपण काय बरे आता करूया" असा बराच उहापोह झाल्या

सौदी क्षणचित्रे : ०३ : महाकंपनी सौदी आराम्को आणि मरजान बेट

लेखक डॉ सुहास म्हात्रे यांनी मंगळवार, 20/05/2014 15:22 या दिवशी प्रकाशित केले.
=================================================================== सौदी क्षणचित्रे : ०१... ०२... ०३... ०४... ०५... ०६... ०७... ०८...

चोकलेट रोल

लेखक इशा१२३ यांनी मंगळवार, 20/05/2014 13:00 या दिवशी प्रकाशित केले.
उन्हाळ्याची सुट्टी लागली तशी चार दिवस आईकडे रहायला गेले.बरोबर मुल होतीच.मग काय मुलांसाठी रोज एक नविन पदार्थ करण्याची आई आणि मामीची लगबग सुरु झाली.त्यातले मुलांना खूप आवडले ते त्यांच्या मामीने केलेले चोकलेट रोल.

संग्रह

लेखक आशु जोग यांनी मंगळवार, 20/05/2014 12:58 या दिवशी प्रकाशित केले.
कोण कसला संग्रह करेल सांगता येत नाही पण निवडणूक प्रचार साहित्याचा संग्रह करण्याचा प्रयत्न केला होता... आपण तो पहावा आणि आपल्याही याबाबतच्या आठवणी असतील तर इथे लिहाव्यात १५ फेब १९९० . अण्णा जोशींची विधानसभा निवडणूक . कसबा विधानसभा... . अण्णांची यशस्वी लोकस

पहिला पाऊस...

लेखक nasatiuthathev यांनी मंगळवार, 20/05/2014 12:08 या दिवशी प्रकाशित केले.
पहिला पाऊस !!!!
पहिला पाऊस खूप जणांना वेड लावतो म्हणे ????? वेड ???? पण कुठले वेड ???? आनंदाचे , उत्साहाचे ,प्रेमाचे चैतन्याचे कि काही आठवणींनी आपल्याला वेड करतो ???कि विरहाने ??? पण मला तर नेहमी एक नवचैतन्य ,नव आशा दाखवत असतो . पहिला पाऊस म्हणजे प्रेम कवींचा हक्काचा विषय !!!! आणि त्या विषयावर प्रत्येक नव्या -जुन्या , उमलणाऱ्या ,विझाणाऱ्या कवीची एक तरी कविता !!!!!!!! पहिला पाऊस आणि विरह यांचे एक अतूट नात आहे.

जादूगर तू जादूगर, दाढीवाला तू जादूगर

लेखक पगला गजोधर यांनी मंगळवार, 20/05/2014 10:50 या दिवशी प्रकाशित केले.
चाल: बाझीगर ओ बाझीगर चित्रपट : बाझीगर (सदर चित्रपटात शारूक पूर्वार्धात खून करतो… वैगरे वैगरे , तरी पब्लिक त्याला हिरो मानते … या चित्रपटा नंतरच हिरो व विलेन दोघा मधली रेषा पुसट व्हायला लागली . . चू भू दे घे असो तरी या चित्रपटाचा इथे काही संबंध नाही) वो किसन, झालता थकेला, तू खेल अस्सा केला, कोमात गेले पार्टीतले सगले उपवर. जादूगर तू जादूगर, दाढीवाला तू जादूगर ।।ध्रु ।। ओ ग्रोथ बोलके, मत लिया है, वादा अच्छेदिनोका, किया है, दिल्लीकी बाझी जिता, राजधर्मको भूलाकर ।।ध्रु ।। चुपकेसे आंटीलाके हस्ते, तू मेरे टीवीमें समाया, मेहेन्गाईकि चाय पिलाके, सबको दिवाना बनाया .