घनचक्कर घोरींचे घनघोर-चक्र
‘सईमावशी, तू, आदिमामा, संतोषकाका आणि ती प्रतिगामी शिल्पा असे बूर्झ्वा लोक्स माझ्या डिसीजनला बिलकुल धक्का लावू शकत नाहीत !’ स्वराने त्वेषाने हातातला काटा समोरच्या प्लेटमधल्या इडलीत खुपसला आणि दुसऱ्या हातातल्या चमच्याने झटक्यासरशी तिचे दोन तुकडे केले !
इडलीच्या जागी तिला प्रतिगामी शिल्पा, तिची साक्षात जन्मदात्री दिसत असावी की काय अशी मला शंका आली.
‘अगं, आमची काय बिशाद तुला धक्का लावायची ! ..आय मीन, तुझ्या डिसीजनला..
मिसळपाव