✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

आमचेही कांदेपोहे – कि दारू चकणा ? एक सत्य अनुभव भाग १

ह
हेमन्त वाघे यांनी
Mon, 03/09/2015 - 01:18  ·  लेख
लेख
इथे अनेकजण आपले “कांदे पोह्यांचे “ अनुभव सांगताना बघून मला हि २००३-२००४ सालाची आठवण झाली ..... मुली बघण्याचे काही अजब , काही विचित्र आणि काही ठीक अनुभव घेत होतो. कितीही शिकलो असलो तरी तिशीपर्यंत आल्याने स्वताची लग्न बाजारातली किंमत हि कळत होतीच. त्यात अजस्त्र देह आणि थोडी कमी उंची (५’९.५” ) आणि काळा वर्ण नसलेल्या सौंदर्यात भरच घालत होता !! माझे सर्व प्रकारचे कार्यक्रम चालू होते – म्हणजे मुली घरी येणे / जाणे . “सर्वांनी “ बाहेर भेटणे आणि मला सर्वात आवडायचे ते म्हणजे बाहेर फक्त दोघानीच भेटणे त्यात येक मेकाला समझता तरी येते. आशाच येका मुली ला भेटायला मी अंधेरी लिंकिंग रोड वर संध्याकाळी गेलो होतो. Profile तर बरी वाट होती. मुलगी इंजिनीअर असून एका चांगल्या इंजिनीअरिंग कॉलेज मध्ये प्राध्यापक होती. अंधेरी लिंकिंग रोड वर मी त्यावेळी गोरेगावात राहत असून २-३ वर्षांनी जात असल्याने तो मला बराच बदललेला आणि चकचकीत वाटता होता. इतक्यात ती मुलगी आली – नव्हे तिला तिच्या घरच्यांनी गाडीतून सोडले.माझ्याकडे त्यावेळी गाडी नसल्याने बरे वाटले. सुरुवातीचे हाय हलो झाल्यावर तिच्या सूचनेनुसार आम्ही येका posh restaurant मध्ये गेलो . डेकोर फारच सुन्दर होता आणि ...........संद्याकाळी ७ वाजता आम्ही दोघे सोडून कोणी नव्हतो. आमची सर्वसाधारण चर्चा चालू होती . आणि इतक्यात वेटर आला... सभ्य संस्कारानुसार ( Manners ) मी मेनू तिचाकडे दिला. “ Dont want to eat .” कोठल्याही शिकलेल्या मुलीप्रमाणे ती मध्ये मध्ये विन्ग्रेजी फडत होती. तिने झटकन मेनू बघितला. “Screwdriver please !” ती शांत पणे म्हणाली . आणि माझी धडधड वाढली.... आता थोडे माझ्या पिण्या बद्दल ..त्यावेळी मी माझ्या वयाचा जेव्हडा पितो तेवडा प्यायचो ..झेपेल तेवडी आणि कोणाला पत्ता न लागता घरी जायचो. तसे मी लग्नाच्या बायो डाटा मध्ये “ Enjoy ड्रिंकिंग” लिहिले होते आणि माताजींचा प्रचंड ओरडा खाला होता . ( तिला मी पितो हे माहित नवते – होल्स झिंदाबाद!) ..त्यामुळे काही मित्र गमतीने बोलायचे कि सर्वसाधारण कांदे पोहे चहा पेक्षा दारू चकणा झाले पाहिजे म्हणजे सर्व कसे ओपन होतील... पण इकडे मुलगी कडक cocktail मागत होती आणि माझ्या .......... मी गोंधळलो .... येक मन सांगत होते कि मुलगी “तयारीची” आहे आणि खूष झालो. दुसरे सांगत होते कि ती माझी परीक्षा घेतेय. तिसरे सांगत होते कि काहीतरी गडबड आहे.अजून एकदा वाटले कि हिला मला नापसंद करायचे आही आणि म्हणून अति stylish वागतेय ( होय हा हि अनुभव आला होता.) मी काय मागवावे – व्हीस्की कि cocktail ?? आणि व्यवहारी मन दारूचे दर बघून घाबरत होते .........
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
संस्कृती
लेखनप्रकार (Writing Type)
अनुभव

प्रतिक्रिया द्या
7043 वाचन

💬 प्रतिसाद (28)

प्रतिक्रिया

रोचक सुरुवात

श्रीरंग_जोशी
Mon, 03/09/2015 - 01:57 नवीन
प्रसंगवर्णन रंगात येत आहे असे वाटू लागताच लेख संपला. खाली क्रमशः लिहिले नसले तरी पुढील भागाच्या प्रतिक्षेत.
  • Log in or register to post comments

+१

स्रुजा
Mon, 03/09/2015 - 03:37 नवीन
असेच म्हणते.लवकर सांगा कितीचं बिल फाडलं त्या दिवशी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीरंग_जोशी

जबरी! पुढे काय झालं?

आदूबाळ
Mon, 03/09/2015 - 04:00 नवीन
जबरी! पुढे काय झालं? होल्सचा उल्लेख वाचून क्षणभर डचमळलं...
  • Log in or register to post comments

अल्कोहोलभरल्या पोटात

आदूबाळ
Mon, 03/09/2015 - 04:09 नवीन
अल्कोहोलभरल्या पोटात कोणत्याही प्रकारचं मिंट गेलं की जे काय रसायन तयार होतं ते लै ड्यांजर.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आदूबाळ

लिहा हो पुढे काय झालं ते!

रेवती
Mon, 03/09/2015 - 07:30 नवीन
लिहा हो पुढे काय झालं ते!
  • Log in or register to post comments

पटकन आटोपलात लेख अन मग पुढे?

इशा१२३
Mon, 03/09/2015 - 08:28 नवीन
पटकन आटोपलात लेख अन मग पुढे? लिहा लवकर..
  • Log in or register to post comments

पुढे काय झाल याची उत्सुकता

ज्योति अळवणी
Mon, 03/09/2015 - 08:34 नवीन
पुढे काय झाल याची उत्सुकता आहे. नक्की पुढे लिहा
  • Log in or register to post comments

मग पुढे?

अजया
Mon, 03/09/2015 - 09:16 नवीन
मग पुढे? खरं तर वरपरीक्षेला स्क्रुड्रायव्हर आड्डर करणारी आवडल्या गेली आहे.तिच्या आॅर्डरनंतर समोरच्याचा चेहेरा कस्ला प्रेक्षणीय झाला असेल या कल्पनेने गुदगुल्या झाल्या!!!
  • Log in or register to post comments

पुढे?

स्नेहल महेश
Mon, 03/09/2015 - 09:43 नवीन
पुढील भागाच्या प्रतिक्षेत.
  • Log in or register to post comments

स्क्र्यु ड्रायव्हर आणि होल्स

असंका
Mon, 03/09/2015 - 10:37 नवीन
स्क्र्यु ड्रायव्हर आणि होल्स हे नक्की काय आहे? दारूबद्द्ल काहीतरी असावे हे तर उघडच आहे...पण थोडे डीट्टेल मध्ये कुणी सांगेल का?
  • Log in or register to post comments

ते होल्स नसून हॉल्स (च्या

अनुप ढेरे
Mon, 03/09/2015 - 10:53 नवीन
ते होल्स नसून हॉल्स (च्या गोळ्या) आहे. दारूचा वास येऊ नये म्हणून घेतलेल्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: असंका

असा अंदाज आहे. हॉल्सनी दारूचा

अनुप ढेरे
Mon, 03/09/2015 - 10:54 नवीन
असा अंदाज आहे. हॉल्सनी दारूचा वास जाईल असं वाटत नाही खर तर. त्यापेक्षा पान खाणं हे बेष्ट...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनुप ढेरे

हां...हे बरूबर वाट्टंय...पन

असंका
Mon, 03/09/2015 - 10:56 नवीन
हां...हे बरूबर वाट्टंय...पन ते स्क्र्युड्रायव्हर? गंगा जमना किंवा मारामारी सार्ख काय आहे का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनुप ढेरे

गंगा-जमनाच एका प्रकारचं. फक्त

अनुप ढेरे
Mon, 03/09/2015 - 10:59 नवीन
गंगा-जमनाच एका प्रकारचं. फक्त मोसंबी ज्युस ऐवजी वोडका असते. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: असंका

कॉकटेल

अन्या दातार
Mon, 03/09/2015 - 11:07 नवीन
http://en.wikipedia.org/wiki/Screwdriver_%28cocktail%29
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: असंका

ठँक्यु बरं का अन्या दातार शेठ

असंका
Mon, 03/09/2015 - 11:15 नवीन
ठँक्यु बरं का अन्या दातार शेठ....!! _/\_
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अन्या दातार

Halls च.

आदूबाळ
Mon, 03/09/2015 - 11:58 नवीन
Halls च. उमेदवारीच्या काळातलं तीथरूपांचं वाक्य आठवलं, "दारूचा वास घालावणारी कोणतीही गोळी नसते. तुला सापडली की मला सांग." प्रस्तुत प्रसंगाच्या वेळी मी "पुदीन हरा" खाऊन आलो होतो. बट द वडील फाउंड औट.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनुप ढेरे

या कांटेक्स्टमध्ये 'तीर्थ'रूप

अनुप ढेरे
Mon, 03/09/2015 - 14:46 नवीन
या कांटेक्स्टमध्ये 'तीर्थ'रूप हा शब्द मजेशीर वाटतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आदूबाळ

:))

आदूबाळ
Mon, 03/09/2015 - 15:29 नवीन
:))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनुप ढेरे

हायला ध्यानमेचं नै आया....

कॅप्टन जॅक स्पॅरो
Mon, 03/09/2015 - 16:25 नवीन
हायला ध्यानमेचं नै आया...."तीर्थ"रुप =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनुप ढेरे

ओ हे काय?

भिंगरी
Mon, 03/09/2015 - 11:24 नवीन
ही कसली नविन 'इष्टाईल' सगळ्यांना ताणायची?
  • Log in or register to post comments

पुढे काय?

सुनील
Mon, 03/09/2015 - 11:28 नवीन
छान. पण पुढे काय झालं? क्रमशःदेखिल दिसलं नाही!! अवांतर ढकलपत्रांच्या काळातील एक इनोद आठवला. असाच एक 'पाहण्याचा' कार्यक्रम - मुलगा - इंग्लिश जमते का? मुलगी - होऽऽ पण फक्त सोड्याबरोबर!
  • Log in or register to post comments

सहीच! स्क्रूड्रायव्हरची

बॅटमॅन
Mon, 03/09/2015 - 12:51 नवीन
सहीच! स्क्रूड्रायव्हरची परिभाषा माहिती नव्हती.
  • Log in or register to post comments

आहे... अजून २ ते ३ भाग बाकि आहेत

हेमन्त वाघे
Mon, 03/09/2015 - 14:05 नवीन
...लिहित आहे ..पहिलाच संगणकावर लिहायचा प्रयत्न असल्याने हा प्रयत्न गोड मानून (किंवा cocktail करून ) घ्या .हि विनंती.. हेमंत वाघे.
  • Log in or register to post comments

चायला बघण्याच्या कार्यक्रमाला

साधा मुलगा
Mon, 03/09/2015 - 19:31 नवीन
चायला बघण्याच्या कार्यक्रमाला तीर्थपान करतात हे पहिल्यांदाच ऐकले! मला वाटलं फक्त कॉफीपान होते बाहेर भेटतात तेव्हा.
  • Log in or register to post comments

हा हा हा मजेशीर अनुभव !

वेल्लाभट
Mon, 03/09/2015 - 20:07 नवीन
हा हा हा मजेशीर अनुभव !
  • Log in or register to post comments

काटा किर्र!

पॉइंट ब्लँक
Tue, 03/10/2015 - 00:07 नवीन
काटा किर्र!
  • Log in or register to post comments

.

सांगलीचा भडंग
Tue, 03/10/2015 - 03:23 नवीन
कथेची सुरुवात बघून तरी काल्पनिक आहे असे वाटत आहे नाही तर पुढच्या भागात कुणाचा तरी पोपट तरी झाला आहे असे दाखवलेले असणार ( म्हणजे टेबल च्या पायाचा सैल झालेला स्क्रू अवळायाला स्क्रू ड्रैव्हर मागितला असायचा आणि कथा लेखकाने १ जेडी लार्ज ची ओरडर दिलेली असायची )
  • Log in or register to post comments

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा