Skip to main content

हलले "दु"कान

लेखक नाखु यांनी शुक्रवार, 11/09/2015 09:29 या दिवशी प्रकाशित केले.

हलले "दु"कान

गर्धभरास नवतज्ञाची फक्क्ड खाशी, वरवर करू रंग-रंगोटी ! राजदरबारी अन शासन्काठी जातीवीण का मिळे लंगोटी ?!! सुग्रासान्नाची मिळता थाळी, लाथाळू करंटे सत्वर ! मिरवावी ओकारी त्रिकाळी, नको दाद नको ढेकर ! द्वादशबुद्धी जाणता मर्दा! बाकी फुटकळ चिल्लर खुर्दा! दुष्काळाची साधून संधी! पित्यांची भरपूर चांदी ! जलशिवाराची येता उग्वण, मारूया मुजोर चौका आपुला व्याही त्यालाच ठेका ! द्वाड देव्याची अजब शिकवण, अड्वा फकस्त पाणी, कसली पोळी कसले शिकरण ! दिव्यमराठीची पळवून लाटी ! जिथे तिथे हळूच वाटी ! भाजे पापड कुर्रम्कुर्रम ! मिळता थापड भुर्रभुर्रम !

सोपी मसाला सुपारी

लेखक पद्मावति यांनी शुक्रवार, 11/09/2015 02:25 या दिवशी प्रकाशित केले.
साहित्य बडीशोप- ३ वाट्या ओवा- ३/४ वाटी लवंग-अर्धी वाटीच्या किंचित जास्तं वेलदोडे- अर्धी वाटीच्या किंचित जास्तं सुके खोबरे किसलेले ( किंवा डेसीकेटेड कोकोनट)- १ वाटी तीळ- १ वाटी ज्येष्ठ मध पावडर- दीड वाटी मीठ आणि साखर- चवीपुरते. . कृती शोप, ओवा, लवंगा, वेलदोडे, किसलेले खोबरे, आणि तीळ निरनिराळे अगदी खरपूस भाजून घ्यावे.

किती भाग्यवान आम्ही!

लेखक शिव कन्या यांनी शुक्रवार, 11/09/2015 00:15 या दिवशी प्रकाशित केले.
किती भाग्यवान आम्ही, आमचे देश आम्ही स्वखुशीने सोडले! किती गंडलो आम्ही! मायभूमीच्या आठवांचे गाणे आम्ही, 'चिट्ठी आयी है वतनसे' मध्ये ऐकले! उमाळे, उसासे विमानतळावरच विरतात बहुतेक! नव्या जगातल्या शांतसमृद्ध किनार्याचा मोह नसतोच, छातीठोकपणे सांगावेच कुणी! आठवणी तर येणारच...... अथपासून इतिपर्यंत सगळ्या... नव्या मातीवर मृगजळामागे धावले नाहीत, असे पाय दाखवावेतच कुणी! प्रेमामायेचे पाश कुणाला चुकलेत? 'सुटलो एकदाचा जंजाळातून' म्हणत अनोळख्या टापटिपीत स्वच्छंद शीळ घातलीच नाही असा त्रिशंकू भेटावाच कधी! किती भाग्यवान आम्ही, आमचे देश आम्ही स्वखुशीने सोडले!

वर्‍हाडी चिकन रस्सा

लेखक कैलासवासी सोन्याबापु यांनी गुरुवार, 10/09/2015 22:11 या दिवशी प्रकाशित केले.
(एकदम बेसिक वर्‍हाड़ी चिकन रस्सा) 1 लागणारे साहित्य: चिकन - अर्धा किलो, तेल - पाऊण मोठी वाटी, कांदा - १ मोठा चिरून (चमचाभर तेलावर भाजून बारीक पेस्ट केलेली), लसूण - १ मध्यम आकाराचा गड्डा, हिरव्या मिरच्या - २, आलं - बोटाच्या १ पेराइतका तुकडा, (आलं, लसूण आणि हिरव्या मिरच्यांची पेस्ट) सुक्या खोबऱ्याचा तुकडा - अर्ध्यापेक्षा थोडा कमी छोटे तुकडे भाजून बारीक केलेले, जिरे - १ चमचा, दालचीनी- अर्ध्या बोटा एवढा १ तुकडा , मिरे - ७ ते ८, लवंग - ४ ते ५, मसाला वेल्दोड़े- २, धने - एक चहाचा चमचा तेलात भाजून (+ मिरे

हैलो, ह्यलो.....

लेखक जव्हेरगंज यांनी गुरुवार, 10/09/2015 20:15 या दिवशी प्रकाशित केले.
१. "हैलो, रामराम ,काय चाललय?" "रामराम, काय नाय बरायं की" "जेवन झालं का?" "न्हाय अजुन, सैपाक हुतुय" "कदी आला कामावरनं?" "हि काय आत्ताच यीवुन बसलुयं" "काय म्हणतयं पौसपाणी" "चिरचिर हाय चालु, तिकडं कसायं?" "न्हाय काय, पाऊस न्हाय, कीळीचं अवघडायं, बोरचं* पण पानी आटलयं" "व्हय, यील की कुठं जातुयं?, आजुन दोन म्हैन हाईत." "कसला यीतुयन काय....

शब्द !!!

लेखक शीतल जोशी यांनी गुरुवार, 10/09/2015 17:40 या दिवशी प्रकाशित केले.
शब्द !!! शब्द कळतात मला, आणि म्हणूनच छळतात मला म्हणजे, त्रास नाही हा देत, मनात घोटाळत राहतात कधी एकदाचे, मनाच्या कोऱ्या पाटीवरून, अलगद उतरून एक अर्थपूर्ण गोफ गुंफतात , असे होवून जाते कधी ,कधी अगदीच निरर्थक पणे बाहेर पडायला धडपडत असतात सांगितले तरी ऐकतच नाहीत मग काय, वायफळ गप्पा होतात त्यांचाशी माझ्या, अगदी शिळोप्याच्या कधी कधी, हवे असतात न चपखल बसणारे शब्द, तेव्हा मात्र दडी मारून बसतात, जणू लपाछपिचा खेळ खेळतात कधी कधी न असे वाटते कि रुसून बसलेत काही काही शब्द, काय करणार बिचारे, आपण सतत दुसऱ्या भाषेच्या प्रेमात, आणि ते जणू पोटमाळ्यावर अडगळीत किंवा वृद्धाश्रमात, जर्जर आणि

पण लक्षात कोण घेतो ??

लेखक माम्लेदारचा पन्खा यांनी गुरुवार, 10/09/2015 16:35 या दिवशी प्रकाशित केले.
तो आला पण नेहमीप्रमाणे घुश्शातच होता …. तोंडाने नेहमीची बडबड चालली होती, हातवारे चालले होते …. आमचं भेटायचं ठरतं नेहमी… मी वेळेवर पोचतो पण ह्याचा उशीर कायम ठरलेला…कारण ह्याचे समाजकार्य ! त्याला काहीच वेळ काळ नसतो…सदानकदा कुठेतरी वाहिलेलाच…. जिथे कुठे काही चुकीचं चाललं असेल तिथे हा बरोब्बर पोचतो …. मला नेहमी कुतूहल वाटतं ह्याचं पण त्यावर त्याचं ठरलेलं उत्तर …"अरे, सध्या वेळच अशी आहे की कुठेतरी काहीतरी चाललेलं असतंच… इतरांनी झापडं लावून घेतली आहेत , फक्त माझे डोळे उघडे असतात !" अरे पण तू कशाला तुझा जीव धोक्यात घालतोस नाहक ?? आपण बरं आणि आपलं काम बरं….

चावडीवरच्या गप्पा – अकलेचा दुष्काळ

लेखक सोत्रि यांनी गुरुवार, 10/09/2015 15:45 या दिवशी प्रकाशित केले.
chawadee "आयजीच्या जीवावर बायजी कशी उदार झालीय बघितलेत का?”, भुजबळकाका हसत चावडीवर प्रवेश करत. “अहो बहुजनहृदयसम्राट, कोण आयजी कोण बायजी, काही स्पष्ट बोलाल का?”, नारुतात्या प्रश्नार्थक सुरात. “अहो नारूतात्या, पेपर वाचायला घेता की सुरनळ्या करायला?”, बारामतीकर खोचकपणे. "बारामातीकर आणि भुजबळकाका, तुम्ही नुसते टीकाच करा”, चिंतोपंत हताशपणे. "अहो तो राज आणि त्याची मनसे काही करते आहे तर ते कोणालाही बघवत नाहीयेय!”, घारुअण्णा

विसराळू नाना

लेखक सत्य धर्म यांनी गुरुवार, 10/09/2015 11:18 या दिवशी प्रकाशित केले.
विसराळू .. वा काय शब्द आहे ना, याचे किस्से पण खूप आहेत बर तर असेच काही किस्से इथे सांगतो.......... आमच्या गावचे नाना म्हणजे एक नंबर विसराळू माणूस. बाजारात गेला तर मोकळी पिशवी घरी आणि बायको बाजारात एवढा विसराळू. बरं असं पण नाही की हा काम करत नाही. चांगला साखर कारखान्यात कामाला आहे, पण कसल हो! कामावर जाताना डबा घेऊन बस थांब्यावर आला तर जेवणाचा डबा हलवून लक्षात ठेवतो, कामावरून आलो आहे की जायचं आहे ते; आणि हो, कारखान्याकडे जाणा-या आणि येणाऱ्या दोन्ही गाड्यांना हात करतात.