Skip to main content

हैलो, ह्यलो.....

लेखक जव्हेरगंज यांनी गुरुवार, 10/09/2015 20:15 या दिवशी प्रकाशित केले.
१. "हैलो, रामराम ,काय चाललय?" "रामराम, काय नाय बरायं की" "जेवन झालं का?" "न्हाय अजुन, सैपाक हुतुय" "कदी आला कामावरनं?" "हि काय आत्ताच यीवुन बसलुयं" "काय म्हणतयं पौसपाणी" "चिरचिर हाय चालु, तिकडं कसायं?" "न्हाय काय, पाऊस न्हाय, कीळीचं अवघडायं, बोरचं* पण पानी आटलयं" "व्हय, यील की कुठं जातुयं?, आजुन दोन म्हैन हाईत." "कसला यीतुयन काय.... हीत भिकला लागायची येळ आली " २. "ह्यलो, कोन भावड्या का?" "हा मीच बुलतुय, बोलाकी नाना," "आरं काय चाललयं, तिकडं जावुन ईसरला का काय आमाला, कंपनी काय म्हणतीय?" "आसा कसा ईसरीन, कंपनी काय रूच्चीच ओ, लय दिवसांनी फोन केला?" "पिंट्याला काम बघकी लका, कंपनीत बग कुनाला तर इचरून" "जागा न्हायत्या राव कंपनीत बी, बगतु तरी ईचारून सायबाला" "बग बग लका, नुस्ता घरी बसुन लुळतुय, शीतीला बी पानी न्हाय, काय पैकाच जवळ राह्यना." "ते बी खरच हाय मना" "पाऊस हाय कारं तिकडं?" "........" ३. "ह्यलो" "हा बोल" "काय भावड्या शेरात जावुन लय मोटा सायब झाला काय?, कदितरी फोन करत जा लगा" "आरं न्हाय, हित कामात काय कळत नाय, तु तर करत जाकी." "वाट्सँप कराय बरा येळ मिळतु रं?, फुटु, बिटु, जोरातच हाय म्हन की" "तेवडाच आपला टायमपास, बर काय इशेश?" "लगा आयट्या झालायं, कुटतरी नुकरी बघकी तुज्या वळकीन" 'नुकरी काय घरी बसुन लागती वय? फिर की भाईर जरा' "बास का राव, मन्लं तु तर काय करचील, आरं म्हाताऱ्यानं भाईर काडायचचं बाकी ठीवलयं. नळाला* बी आजुन पानी सुट्ल न्हाय, गावात तर कुत्र बी दिसना" "यील यील पाऊस, कशाला काळजी करतुयं?" "कस्ला यीतुय आयघालीचा* दोन म्हैन झालं, टिपका न्हाय" "........" टिपा: बोर- कुपनलिका नळ- कँनॉल आयघालीचा- ग्रामीण शिवी - © जव्हेरगंज
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 2625
प्रतिक्रिया 4

प्रतिक्रिया

छान लिहिले आहे, खरं, पाऊस आल्यावर लेख आला की हो तुमचा! :) हिवसाळ्याच्या प्रतिक्षेत असलेला Sandy

In reply to by चांदणे संदीप

हो संदीपजी, रोज त्या बातम्या पाहुन आतुन ढवळुन जायचं. पाऊस आलाय हि आनंदाची गोष्ट आहे. हिवसाळा शब्दप्रयोग छान आहे.