सोबत
[शतशब्द कथांबद्दल एक धागा दिसला. आपणही प्रयत्न करावा असं वाटलं. अर्थात ते मला जमलं नाही पण त्या प्रयत्नात ही कथा जमेल तितकी छोटी ठेवली आहे. अधिक काट-छाट करणे ठीक वाटले नाही , तेव्हा ३३४ (मायक्रोसॉप्फ्ट वर्डनुसार) शब्दांची ही कथा खास मिपाकरांसाठी]
रात्री बाराच्या सुमारास विमानतळावरुन नीता बाहेर आली. राजेश नक्की येणारच याची तिला खात्री होतीच त्यामुळे तिने पर्स मधून फोन बाहेर काढला नाही.
नऊ वाजता "फ्लाईट उशिराने आहे" हे सांगायला तिने त्याला फोन केला होता तेव्हा त्याच्या आवाजात थकवा स्पष्ट जाणवत होता , शिवाय त्याचं डोकंही दुखत होतं. आपल्या प्रिय नवर्याला आपण त्रास देत आहोत असं तिला वाटून गेलं.
मिसळपाव
निळ्याभोर उंच नभी
सावळे काळे विखुरलेले मेघ
त्याखाली अथांगशा धरणीवर
हिरवेगार एक छोटेसे शेत
-जसे माझे स्वप्नातील सुंदर जग-
शेताच्या मधूनच जाते लांबडी
पायवाट एक हिरवट तांबडी
एक रेषा जशी आडवी तिडवी
छेदीत त्या शेताला वाकडीतिकडी
-करीत जणू माझिया स्वप्नांचा भंग-
वात जिथे संपते तिथेच जवळ
खूण म्हणोन उभी एक बाभळ
फांदीवरी तिच्या कृमींची दाटण
विणुनी जाळी कोळ्यांन
.