Skip to main content

प्रतीक्षा

लेखक मयुरMK यांनी शुक्रवार, 29/01/2016 15:29 या दिवशी प्रकाशित केले.
निळ्याभोर उंच नभी सावळे काळे विखुरलेले मेघ त्याखाली अथांगशा धरणीवर हिरवेगार एक छोटेसे शेत -जसे माझे स्वप्नातील सुंदर जग- शेताच्या मधूनच जाते लांबडी पायवाट एक हिरवट तांबडी एक रेषा जशी आडवी तिडवी छेदीत त्या शेताला वाकडीतिकडी -करीत जणू माझिया स्वप्नांचा भंग- वात जिथे संपते तिथेच जवळ खूण म्हणोन उभी एक बाभळ फांदीवरी तिच्या कृमींची दाटण विणुनी जाळी कोळ्यांनी चाळण - सांगती जणू ते मन्मनीचीच गुंत- त्या काटेरी बाभळीच्या काटेरी सावलीत निर्जनशा दूर एकांतात ............. भोगतो आहे मी एक असह्य शिक्षा- करतो आहे अखंड ...... फक्त तुझीच- प्रतीक्षा.......!
काव्यरस
लेखनविषय:

वाचने 977
प्रतिक्रिया 2

प्रतिक्रिया

मस्त...