Skip to main content

....तेव्हा तू मला फार फार आवडतेस....प्रवास ५

लेखक कानडाऊ योगेशु यांनी शनिवार, 21/05/2016 16:42 या दिवशी प्रकाशित केले.
....तेव्हा तू मला फार फार आवडतेस....प्रवास ५ अशाच एका कमपॉप्युलर हिल स्टेशनच्या कमविख्यात्/कमकुविख्यात सुसाईड पॉईंटवर आपण दोघेच असताना त्याच्या अगदी टोकावरुन भणाणत्या वार्यात खाली वाकुन बघत असताना मी मस्करीने तुझा केसांचा विळखा तुला नकळत नाजुकपणे सोडवतो..अलगद.. तू चपापतेस... तुझे केस अगदी चोहोदिशांनी उधाणलेल्या लाटांसारखे उसळी घेतात. तु वळुन प्रथम व्याकुळ व मग क्रुध्द नजरेन माझ्याकडे पाहतेस! मला समजते अब तो मै गया.!!!

गोंदेश्वराच्या शिवपंचायतनात

लेखक प्रचेतस यांनी शनिवार, 21/05/2016 14:08 या दिवशी प्रकाशित केले.
सिन्नरचं आयेश्वर मंदिर पाहण्याच्या आधीच जवळपास दोनेक तास गोंदेश्वर मंदिरात थांबलो होतो. माध्यान्ह संपून नुकतीच कुठे मावळतीला सुरुवात होत होती. भर एप्रिलचाच काळ असल्याने उन्ह मात्र अगदी रणरणत होतं. सिन्नर हा दुष्काळी भाग, सगळं कसं रखरखीत, कोरडं, रुक्ष. उन्ह अक्षरशः भाजून काढत होतं. मात्र त्या उन्हातही मंदिर सोन्यासारखं झळकत होतं. गोंदेश्वराचं आवार विस्तीर्ण. भलं प्रशस्त. तटबंदीयुक्त. तटबंदीतच यात्रेकरुंसाठी देवड्या बांधलेल्या. तटबंदीच्या आत पटांगण, इतकं मोठं की क्रिकेटची मॅच सहज खेळता यावी. पटांगण मोकळं ठेवूनही मध्यभागी भलं थोरलं अधिष्ठान.

<मी टाकलेल्या एकूण (धागा)पिंका>

लेखक नाखु यांनी शनिवार, 21/05/2016 09:37 या दिवशी प्रकाशित केले.
मी टाकलेल्या एकूण (धागा)पिंका एकोणवीस शोधण्यात खूप वेळ जातो काथ्याकुटात एक धागा हुकला आहे त्याच्या जरासं खाली एक किडा वळवळतोय दुर्लक्षण्यात खूप वेळ जातो टंकाळा आल्यावर मी एखादा प्रतिसाद लिहायला घेतो अर्थ? समजण्यात खूप वेळ जातो तोल सुटलाय मिपावरचाही रोज उठून कोण साव्ररणार त्याला? सल्ला, मागण्यातही तूचभेळ खातो मिपा ! ही तर एक रिक्षाच आहे वाट पाहण्यात (चांगल्या धाग्याची) खरंच खूप वेळ जातो -नजरबंद

रेस...सिंहगड ते आयएटी पर्यंत...!

लेखक महामाया यांनी शनिवार, 21/05/2016 08:56 या दिवशी प्रकाशित केले.
माझा पहिला मुंबई प्रवास-एक हाईस्कूल मधे असतांना मी शेजारच्या मुलांसोबत रोज पहाटे जॉगिंग करितां जायचो खरा...! तेव्हां कल्पना देखील नव्हती की पुढे मला सिंहगडापासून रेस करावी लागेल. बिलासपुरला वडील रेलवेत असल्यामुळे आम्ही रेलवे कालोनीत राहायचो. शहरात माझे काका होते-व्यंकटेश शंकर तेलंग. त्यांच्या खासगी लायब्ररीत कपाट भरून पुस्तकं होती (1970 च्या दशकात). लहानपणी मला त्या पुस्तकांचं भारी कौतुक वाटे. पण वाचण्याकरितां पुस्तक मागण्याची हिंमत होत नसे. कारण एक तर मराठी वाचनात गती नव्हती आणी दूसरं महत्वाचं कारण म्हणजे या काकांकडे सगळेच कसे जणूं जिराफच्या कुटुंबातले होते-ऊंचच ऊंच.

फक्त तुझ्यामुळेच

लेखक bond यांनी शनिवार, 21/05/2016 05:47 या दिवशी प्रकाशित केले.
जागतो आहे रात्र रात्र आठवणी्च्या दुनियेत न राहिलो मी माझा फक्त तुझ्यामुळेच का नाही कळ्ले तुला काय आहे माझ्या मनी बुड्लो आहे आकंठ पोहणे माहीती असुनी पायातील पैजंणात तुझ्या कैद केलेस तु मला सुटका नाही मज आता टाक सरळ चिरडुन मला होते समजत तुला तर का नाही बोललीस आग लागण्याआधीच राख का नाही चोळ्लीस

किती लौकर आज उजाडलं बाई

लेखक पाषाणभेद यांनी शनिवार, 21/05/2016 04:55 या दिवशी प्रकाशित केले.
किती लौकर आज उजाडलं बाई कानडाऊ योगेशू यांच्या या रचनेत रोमांचीत कल्पना आहे. सजणप्रेमाने व्याकूळ झालेली विव्हलता रेखाटली आहे. कुणाचे प्रेम रांगडे असते जसे एखादा जव्हेरगंज "जीव नांगरटीला आलाय" म्हणून हक्काने मागून घेतो किंवा एखादा अल्लड प्रेमाने भारून आपल्या प्रियतमेचे प्रियाराधन करण्यास संकोचतो.

सफर ग्रीसची: भाग १ - प्रस्तावना आणि केप सूनिअन

लेखक निशाचर यांनी शनिवार, 21/05/2016 03:19 या दिवशी प्रकाशित केले.
स्वातंत्र्य किंवा मरण! जगाला लोकशाही, पाश्चिमात्य साहित्य आणि तत्त्वज्ञान देणा-या ग्रीसला साजेसं हे ब्रीदवाक्य! ग्रीस म्हटलं कि आठवतं ते अथेन्सचं अक्रोपोलिस, एजिअन समुद्राचं निळाशार पाणी आणि सान्टोरिनीची निळीपांढरी घरं. ग्रीसला भेट देण्याची आणि विशेषतः तेथील पुरावशेष बघण्याची आम्हा उभयतांची खूप दिवसांपासून इच्छा होती. डिसेंबर २०१५ मध्ये केलेल्या ग्रीसच्या भटकंतीबद्दल लिहिण्याचा हा प्रयत्न आहे.
प्रवासाचे नियोजन
अथेन्स विमानतळावर २१ डिसेंबरला दुपारी आगमन आणि तिथूनच ३० डिसेंबरला संध्याकाळी प्रस्थान ठरले. ग्रीसला प्रथमच जाणा-या इतर अनेक पर्यटकांप्रमाणे आमचाही अथेन्सला अग्रक्रम होता.

मी मारलेल्या एकूण माश्या

लेखक जव्हेरगंज यांनी शुक्रवार, 20/05/2016 20:30 या दिवशी प्रकाशित केले.
मी मारलेल्या एकूण माश्या सत्तावीस मोजण्यात खूप वेळ जातो खिडकीचा एक ग्रील तुटला आहे त्याच्या जरासं खाली एक झुरळ फिरते आहे बघण्यात खूप वेळ जातो कंटाळा आल्यावर मी एखादी कविता लिहायला घेतो शब्द? शोधण्यात खूप वेळ जातो आरसा फुटलाय माझ्याकडचा रोज उठून कोण बघणार त्यात? साला, जगण्यात खूप वेळ जातो आयुष्य ! ही तर एक शिक्षाच आहे भोगण्यात खरंच खूप वेळ जातो -जव्हेरगंज

एक लग्नसमारंभ . . . . . जो खरं तर झालाच नाही

लेखक स्वीट टॉकर यांनी शुक्रवार, 20/05/2016 19:36 या दिवशी प्रकाशित केले.
तीन वर्षापूर्वी आमच्या मुलीचं (कॅप्टन पुनव गोडबोलेचं) लग्न झालं. तेव्हां समारंभ करण्याऐवजी आम्ही ती सगळी रक्कम एका फौंडेशनला दिली जे गेली तीस वर्ष अनाथ मुली आणि निराधार वृद्धांना निवारा आणि शिक्षण देताहेत. साधारण वर्षभरानंतर फौंडेशनचा कुठलासा कार्यक्रम होता जिकडे बरेच महत्वाचे आणि धनाड्य लोक येणार होते. तिथे मी त्यांना काही motivational सांगावं असं फौंडेशनच्या संचालकांनी सुचवलं. बौद्धिक घेणारी भाषणं रटाळ आणि कंटाळवाणी होतात असं माझं मत पण इलाज नव्हता. माझी बोलायची वेळ आली तोपर्यंत खूप उशीर झाला होता. सगळ्यांना भुका लागल्या होत्या, चिडचिड झाली होती, स्वर चढले होते.