Skip to main content

परीकथा - भाग तेरा - फेसबूक स्टेटस २.७ - २.८ वर्षे

लेखक तुमचा अभिषेक यांनी शनिवार, 19/11/2016 17:14 या दिवशी प्रकाशित केले.
११ ऑक्टोबर २०१६ "पप्पा तू ईथे झोप, उठू नकोस", काल रात्री जेवल्यावर तिने मला सोफ्यावर आडवे केले. मग आतल्या खोलीतून मोबाईलचा चार्जर घेऊन आली. स्वत:च्या गळ्याभोवती लटकावला. माझी बनियान वर सरकवली. आणि त्या चार्जरच्या वायरचे टोक माझ्या उघड्या पोटावर टेकवून म्हणाली, "मी तुला तापवते" मी हडबडलो.. तापवते !! चार्जरने?? पण तिच्या गळ्यात लटकावलेल्या चार्जर कम स्टेथोस्कोपवरून काय ते समजलो.. मी तुला तपासते :) मग मला बाऊ झालाय हे डिक्लेअर करून रीतसर औषध दिले गेले. पण सोबत आईसक्रीम सुद्धा दिले.

डिमॉनेटायझेशन / Demonetisation (भाग ३)

लेखक Anand More यांनी शनिवार, 19/11/2016 12:09 या दिवशी प्रकाशित केले.
---------- भाग १ | भाग २ । भाग ३ । भाग ४ |भाग ५ ----------

नकली चलन आणि काळा पैसा

अनेकांना नकली चलन आणि काळा पैसा हे दोन्ही शब्द समानार्थी शब्द वाटतात. त्यामुळे त्यांचा गैरसमज होतो की नकली चलन पकडले की आपोआप काळा पैसा संपेल. परंतू ज्या देशात सर्व व्यवहार हिशोबात घेऊन करप्रणालीद्वारे सरकारला कळवले जात नाहीत त्या देशात नकली चलन आणि काळा पैसा हे समानार्थी शब्द नसतात. नकली चलन म्हणजे फसविण्याचा हेतूने वापरलेले अनधिकृत चलन.

(काळी असे कुणाची)

लेखक ज्ञानोबाचे पैजार यांनी शनिवार, 19/11/2016 10:11 या दिवशी प्रकाशित केले.
लैच दिवसांनी मिपावर आलो आणि पहिल्याच धाग्यावर हात शिवशिवायला लागले.... काळी असे कुणाची, आक्रंदतात तेची, मज पांढरी स्फुरावी, हा दैवयोग आहे, सांगू कसे कुणाला, मी ब्यांकेत गेलो नाही, ही सवय डेबीट कार्डची, हीतकारी ठरत् आहे, काही करु पहातो, नसतात लोक तेथे, पूसता कळे असे की, तो लायनीत आहे, परीर्वतन जहाले, रात्रीत काय ऐसे, की भर सायंकाळी, हा बार रिक्त आहे, -(पैजारबुवा) आनंदीआनंद

सफर ग्रीसची: भाग ६ - असिनीचे अवशेष आणि टोलो

लेखक निशाचर यांनी शनिवार, 19/11/2016 03:12 या दिवशी प्रकाशित केले.
भाग १ - प्रस्तावना आणि केप सूनिअन भाग २ - प्राचीन कोरिंथ भाग ३ - अगामेम्नॉनच्या राज्यात भाग ४ - नाफ्प्लिओचे पुराणवस्तूसंग्रहालय आणि एपिडाउरोस भाग ५ - पालामिडी किल्ला पालामिडी किल्ला फिरून होईपर्यंत दुपारचे बारा वाजले होते. पूर्ण दिवस मोकळा होता. होटेलला जाऊन थोडा वेळ घालवला. पण itchy feet शांत बसू देईनात. मग नाफ्प्लिओपासून जवळच टोलो हे लोकप्रिय बीच रिझॉर्ट आहे.

Cashless

लेखक निओ१ यांनी शनिवार, 19/11/2016 01:32 या दिवशी प्रकाशित केले.
नोटबंदी जाहीर झाली व ९ ला सकाळी सगळीकडे आहाकार माजला की काय असे वातावरण निर्माण झाले होते. माझ्याकडे रोख रक्कम फक्त ३४० रु होती. तर.. घरी आम्ही चार लोक आहोत. १. महिण्याचा किराणा - कार्ड पेमेंट २. गाडीसाठी पेट्रोल - कार्ड पेमेंट ३. औषधे - कार्ड पेमेंट ४. नेट बील - कार्ड पेमेंट ५. फोन बील - कार्ड पेमेंट ६. लाईट बील - कार्ड पेमेंट ७. सिलेण्डर - कार्ड पेमेंट ८. टिव्ही रिचार्ज - कार्ड पेमेंट ९. ड्रिक्स - कार्ड पेमेंट * यातील कित्येक लोकांना कार्ड मशीन घेण्यास मी गेल्या दोन वर्षापासून सांगत होतो व सकारण, उदाहरण देऊन पटवून दिले होते.

न्यू यॉर्क : १८ : सेंट्रल पार्क-२

लेखक डॉ सुहास म्हात्रे यांनी शुक्रवार, 18/11/2016 22:58 या दिवशी प्रकाशित केले.

मूगाची कचोरी

लेखक स्वाती दिनेश यांनी शुक्रवार, 18/11/2016 21:28 या दिवशी प्रकाशित केले.
खूप पूर्वी ठाण्याच्या गोखले रोड वर छाया स्वीट्स नावाचे दुकान होते. त्यांची कचोरी प्रचंड फेमस होती. अर्थात ठाणेकर असल्याने रांगा बिंगा लागत नसत दुकानात पण ती कचोरी म्हणजे आय हाय.. मस्तच होती. काळाच्या ओघात ते दुकान गेलं आणि त्याबरोबर ती कचोरीही गेली. नंतर मग गोखले रोडलाच आलोक हॉटेलच्या समोर एक हनुमान स्वीटस नावाचे अगदी लहानसे दुकान आहे तेथे तशीच कचोरी मिळायला लागली ती आजतागायत मिळते आहे. सकाळी १०-११ च्या सुमाराला तिथे गेलात तर बरेचदा मस्त गरमागरम मूग कचोर्‍या मिळतात. म्हणजे एरवीही मिळतात पण गरमागरम हव्या असल्या तर तेथे सकाळी जा.

!! जीवना.. !!

लेखक कवि मानव यांनी शुक्रवार, 18/11/2016 18:03 या दिवशी प्रकाशित केले.
!! जीवना.. !! जीवना....तू फार मज छळले, कधी निवांत जगलो नाही तू फुलात दिलेस काटे, मी तरी ही रडलो नाही !! कस लावून मी जीवाचा, दर पाऊल टाकत गेलो, तू क्षणात न्हेले मागे, मी तरी ही दमलो नाही !! कधी दिलेस ऋतू तू हिरवे, मग माझी बहरली पाने, कधी दिलेस वादळ वारे, मी तरी ही पडलो नाही !! तू अमृत देऊन जन्माचा, मज फार लावली आशा, मग दिलेस शाप मरणाचा, पण मी तरीही घाबरलो नाही जीवना....तू फार मज छळले, कधी निवांत जगलो नाही !!
काव्यरस

गोष्ट एका लग्नाची ... भाग - ३

लेखक पियुशा यांनी शुक्रवार, 18/11/2016 16:18 या दिवशी प्रकाशित केले.
गोष्ट एका लग्नाची ... भाग २ गोष्ट एका लग्नाची ... लहानपणी बा च्या पाठडावर बसून घोडा घोडा खेळणं येगळं , न प्रत्येक्षात जित्या जागत्या घोड्यावर बसणं येगळं. नाय नाय बॉ आपल्याला काय झेपणार नव्हतं काही झालं तरी मूक जनावर ते इतक्या गोंधळात बिथरल म्हंजी झाला का खेळ ?