सफर ग्रीसची: भाग ६ - असिनीचे अवशेष आणि टोलो
भाग १ - प्रस्तावना आणि केप सूनिअन
भाग २ - प्राचीन कोरिंथ
भाग ३ - अगामेम्नॉनच्या राज्यात
भाग ४ - नाफ्प्लिओचे पुराणवस्तूसंग्रहालय आणि एपिडाउरोस
भाग ५ - पालामिडी किल्ला
पालामिडी किल्ला फिरून होईपर्यंत दुपारचे बारा वाजले होते. पूर्ण दिवस मोकळा होता. होटेलला जाऊन थोडा वेळ घालवला. पण itchy feet शांत बसू देईनात. मग नाफ्प्लिओपासून जवळच टोलो हे लोकप्रिय बीच रिझॉर्ट आहे. तिकडे थोडं फिरू आणि दुपारचं जेवण करू असा विचार करून निघालो. तिथे पोहोचायला गाडीने जेमतेम दहा मिनीटे लागली. गावातून जाणारा मुख्य रस्ता आणि समुद्र यांच्यामध्ये एकमेकांना खेटून होटेल्सची पलटण उभी होती. गावात शिरताना लागलेली एकदोन उपहारगृहं सोडली तर सगळा शुकशुकाट दिसत होता. इकडे यायची अभिनव कल्पना नक्की कोणाची होती आणि/किंवा त्या कल्पनेचं खापर दुसर्यावर कसं फोडता येईल, हा विचार दोन्ही डोक्यांत सुरू झाला होता. आणखी थोडं पुढे जाऊन बघू असं म्हणतम्हणत आम्ही गावाबाहेर पडलोही! फळांनी लगडलेल्या संत्र्याच्या बागा दिसू लागल्या. आणि अचानक रस्त्याच्या कडेला कोणी ग्रीक गॉड/गॉडेस ने (take your pick) मंद स्मित करत वगैरे... पण असं काहीही झालं नाही...
तर रस्त्याच्या कडेला प्राचीन असिनीची (Ancient Asine) दिशा दाखविणारा बाण दिसला आणि पुढेच असिनीची टेकडीही. असिनी टोलोच्या इतकं जवळ आहे, हे ठाऊक नव्हतं. असिनीला पाहण्यासारखं काही विशेष नाही, म्हणून ते आमच्या यादीत नव्हतं. ईथवर आलो आहोत तर जाऊन बघू असा विचार केला. थोडं चढून गेल्यावर एक नवीनच बांधलेलं ऑफिस लागलं आणि त्यात एक वयस्कर रखवालदारही होते. त्यांना इंग्रजीचा गंधही नव्हता, पण आम्हाला बघून त्यांना झालेला आनंद कळायला भाषेची गरज नव्हती. तसेही डिसेंबरमध्ये असे किती पर्यटक इकडे फिरकत असतील!
प्राचीन असिनी
असिनीचे अवशेष तीन वाजेपर्यंत उघडे होते आणि प्रवेशशुल्क नव्हतं. माहितीपत्रक घेऊन आत गेलो. समुद्रकिनारी कास्ट्राकी नावाच्या टेकडीवर असिनी या प्राचीन अक्रोपोलिसचे अवशेष आहेत. सुमारे साडेआठ हजार वर्षांपूर्वीपासून इथे मानवाची वस्ती होती. असिनीचा उल्लेख होमरच्या ट्रोजन युद्धातही येतो. त्याकाळी असिनी हे आर्गोस (Argos) या राज्याचा भाग होतं. आर्गोसचा राजा डायोमिडसच्या ट्रॉयला जाणार्या नौका टोलो बंदरातून निघाल्या होत्या..
पूर्वेच्या बुरुजाचे पत्थर आणि तिथून दिसणारा नजारा
.
वाचने
4956
वाचनखूण
प्रतिक्रिया
6
खूप सुंदर सफर. फार आवडतेय ही
सुंदर फोटो आणि वर्णन.
सुरेख! किती निळेशार पाणी आहे!
फार सुंदर फोटो!निळाई सुखावतेय
अतिशय सुंदर! निळाई मनमोहक आहे
आभार