२०१६ आणि सिक्स वर्ड्स स्टोरी
राम राम मंडळी,
बघता बघता २०१६ संपायला फक्त ०२ दिवस उरले आहेत. सरत्या वर्षात बऱ्याच घडामोडी घडल्या आहे ज्या आठवणीत राहतील.
माझ्यसाठी म्हणाल अर्नेस्ट हेमिंग्वेची ट्रेंड मध्ये आलेली ' सिक्स वर्ड्स स्टोरी' हि चांगलीच लक्षात राहिली.त्याची हि स्टोरी होती "For sale: baby shoes, never worn," या सिक्स वर्ड्स स्टोरीच्या ट्रेंडने जगात भरपूर धुमाकूळ घातला. नेमक्या सहा शब्दांत व्यक्त होणं जरा कठीणच काम. पण अनेका जण हि कसरत साधत अगदी सहा शब्दांत व्यक्त झाले.
तर याच सिक्स वर्ड्स स्टोरी आणि सरत्या वर्षाच्या निमित्ताने तुमचं २०१६ कसं गेलं हे सहा शब्दांत सांगा....
मिसळपाव
.
शब्दांमागे धावण्यात
'बघणं' राहूनच गेलं
रस्त्याकडेचं इवलं रोपटं
कुणी न बघताच मेलं
शब्दांचा पसारा हवा
मोर-पिसारा नको
शब्दात उलगडून सांगा
'नुस्तं बघणं' नको
'नुस्त्या' बघण्या-ऐकण्यात
सौंदर्यगंध दरवळतो
समजून घेण्याच्या नादात
तोच नेमका हरपतो
समोर अप्सरा उभी
तिचं आधी नाव सांगा
वय-जात-उंची-शिक्षण
सगळं तपशील्वार सांगा
सांदि-कोपर्यात डुलणारं फूल-
त्यात विशेष क