Skip to main content

कधी किनारा लिहितो,किंवा...

लेखक सत्यजित... यांनी शुक्रवार, 05/05/2017 00:21 या दिवशी प्रकाशित केले.
कधी किनारा लिहितो किंवा,कधी शिकारा लिहितो तुझ्या मनाच्या लहरींना मी उनाड वारा लिहितो! कधी मनाची लाही होते,कधी शहारा होतो कधी सरी बरसाती लिहितो,कधी निखारा लिहितो! तिच्या घरी माझ्या कवितांना,खुशाल वावर आहे तिला वेळ भेटीची कळते,असा इशारा लिहितो! कधी फुले ती वेचत असता,उशीर होतो तेंव्हा तिचा स्पर्श ओझरता माझ्या मनी पिसारा लिहितो! अजूनही घमघमते अत्तर,तुझ्या रुमालावरचे अजून मी माझ्या श्वासांना,तुझा निवारा लिहितो! तुला जमेशी धरले तेंव्हा,सदा हातचे सुटले हिशोब आता जुळतो जेंव्हा,तुझा घसारा लिहितो! तुझी प्रार्थना बहुधा त्याला कोडे घालत असते उगा न माझ्या नावे तोही जन्म दुबारा लिहितो! —सत्यजित
काव्यरस

दे बहाणे सोडुनी ...

लेखक संदीप-लेले यांनी गुरुवार, 04/05/2017 23:00 या दिवशी प्रकाशित केले.
खास काही आजच्या भेटीत झाले आखरी कावरी झाली किती झाली किती ती बावरी भासवे नाजूक काही भावना या ना मनी सांगते सारे खळी जी लाजते गालावरी मान वेळावून पाही तो बहाणा लाघवी एकदा सारे अशी सारे तशी बट लाजरी ऐकण्यासाठी अबोला कोकिळा झाली मुकी बोलली नाही तरी पंचम तिच्या ओठावरी साधली संधी कशी तो वर्षला ग्रीष्मातही दे बहाणे सोडुनी ती लाज आता सावरी ... संदीप
काव्यरस

चकवा

लेखक रामदास यांनी गुरुवार, 04/05/2017 20:15 या दिवशी प्रकाशित केले.
मी हरवलो आहे असं , माझं मला कळवूनच , मी गहाळ झालो आहे. last seen at 5.45 ही whatsapp वरची अफ़वा आहे . घरून निघताना निळा शर्ट घातला होता आणि घरात सगळे वाट बघत आहेत , ही पण एक आवईच आहे . एसटी स्टैंड वर आणि स्टेशनच्या मुतारीत पोस्टर दिसलेच तर कळवा , मलाच कधीतरी. मी हातचा एक होतो त्या घरालाच, मी एक चकवा दिला आहे . रात्रीच्या खर्जात प्रेम सेवा शरण गाणारं , माझंच बेमालूम version 2.0 वगैरे असंच काहीतरी आहे , believe me वगैरे कशाला ?? मी हरवलोच आहे .
काव्यरस

विंटर स्पोर्ट - स्कीईंग...भाग१

लेखक इडली डोसा यांनी गुरुवार, 04/05/2017 13:46 या दिवशी प्रकाशित केले.
गेल्या सहा सात वर्षात थंडीचे चार सहा महिने घराबाहेर पडायला अगदीच कमी वाव असायचा. थंडीचे विकेंड म्हणजे कोणाच्या तरी घरी जमून गप्पा गोष्टी, पॉट लक किंवा फार फार तर कुठेतरी इनडोअर ठिकाणाला भेट यापेक्षा जास्त इतके दिवस काही केलं नव्हतं. या वर्षी व्हॅंकुवरला शिफ्ट झाल्यामुळे लोकप्रिय विंटर स्पोर्ट असलेल्या स्किईंगचा अनुभव घेता आला. घरापासून ३० ते ५० मिनिटांच्या ड्राईव्हवर ३ स्की रिसॉर्ट असल्यामुळे आधी एखाद्य ठिकाणी जाऊन कसे वाटते ते बघू आणि मग पुढे शिकायचे कि नाही ते ठरवू असं ठरवलं.

(ओंजळीने ती जरी झाकून घेते चेहरा...)

लेखक चतुरंग यांनी गुरुवार, 04/05/2017 05:05 या दिवशी प्रकाशित केले.
सत्यजित भाऊंची उत्तम गजल "ओंजळीने ती जसा झाकून घेते चेहरा" वाचली. एक 'कोबरा' सोडला तर बाकी सगळे शेर डसले! :) ईर्शाद. अर्थातच आमचा नजराणा.... ओंजळीने ती जरी झाकून घेते चेहरा... येत नाही लपवता पण गाल मोठा गोबरा! मोकळ्या केसांतुनी माळून येते तेरडा अन् जटांचा जीवघेणा सुंभ दिसतो का बरा? आरसा भंजाळतो हो ती जशी डोकावते केवढी गबदूल आहे, कोण म्हणते अप्सरा! ओठ ओठांनी स्वतःचे घट्ट मिटते सारखी भिववतो भोळ्या जिवाला चुंबनांचा तोबरा! काय सांगू केवढी असते भयानक भेट ती? ती फुल्यांची मेहुणी अन् मी फुल्यांचा सोयरा! -चतुरंग

काखेत कळसा ... सह्याद्रीला छोटासा वळसा

लेखक भ ट क्या खे ड वा ला यांनी बुधवार, 03/05/2017 18:57 या दिवशी प्रकाशित केले.
काखेत कळसा .. सह्याद्रीला छोटासा वळसा .. ०१ मे .. सुटी .. काल दिवसभर कौटुंबिक स्नेह सन्मेलन व संध्याकाळी cfu करांचे स्नेहमिलन .. अनलिमिटेड गप्पा .. रात्री घरी यायला उशीर आज सुटी असूनही धड कोणती राईड करावी या बद्दल अनिश्चितता.. . उशीरा आलेली जाग .. उन्हाळ्यात योग्य असा सायकलिंग चा मुहुर्त टळलेला ... मग पुर्वी जेथे सायकल ने गेलोय त्याच मार्गावर .. स्कुटर ने केलेली अचानक भ्रमंती .. खंडोबा .. म्हसा .. देवळोलीची विहीर .. एका दमात पाहून दुपारी घरी आलो .. एक मन खातंय .. सतत .. सुटी असून सॅडल पॅडल चा विरह .. अख्या महाराष्ट्रातील सायकलिस्ट कुठे कुठे जाऊन आले आणि तू घरी बसलाहेस ... छा ..

युरोपच्या डोंगरवाटा २: प्लीट्विच्का जेझेरा (Plitvice Lakes) उर्वरित भाग

लेखक निशाचर यांनी बुधवार, 03/05/2017 03:34 या दिवशी प्रकाशित केले.
युरोपच्या डोंगरवाटा १: प्लीट्विच्का जेझेरा (Plitvice Lakes) भाग १ अप्पर लेक्सचा निरोप घ्यावासा वाटत नव्हता, पण जाणं भाग होतं. Lower Lakes were calling...

ये कश्मीर है - दिवस तिसरा - ११ मे

लेखक एक_वात्रट यांनी मंगळवार, 02/05/2017 23:58 या दिवशी प्रकाशित केले.
आज आम्ही उठलो ते नेमके सूर्योदयाच्या वेळी. आणि तो पहायला बोटीच्या छतापेक्षा आणखी चांगली जागा ती कोणती? तेव्हा आम्ही तडक बोटीच्या छतावर गेलो. सूर्यदेव आपल्या कामावर रुजू होत होते. नगीन सरोवराच्या दुस-या टोकाला नांगरलेल्या हाउसबोटी दिसत होत्या. शिका-यांची लगबग अजून सुरु झाली नव्हती. पक्षी मात्र इकडून तिकडे उडत होते. दूरवर 'हरी पर्वत' आणि त्यावरचा राजवाडा दिसत होता.(हा राजवाडा काल आम्हाला श्रीनगर शहर पाहतानाही दिसला होता, मात्र पर्यटकांना तो पाहण्याची परवानगी नाही अशी माहिती सज्जादने दिली.) आम्ही सूर्योदयाचे काही फोटो काढले आणि नगीन तलावात चालू असलेल्या घडामोडी पाहत थोडा वेळ घालवला.

जीवाशी खेळ

लेखक परशुराम सोंडगे यांनी मंगळवार, 02/05/2017 22:46 या दिवशी प्रकाशित केले.
कथा आणि व्यथा . . . . . . . जीवाशी खेळ पहाटं पहाटं नगर गाठलं.जिपडं हास्पीटलच्या दारातचं उभं केलं. शिव्या खाली उतरला .मागं गेला .पल्लीला उचल्लं.तशी ती मोठयांन विव्हळली. तो तिला घेऊन पाय-यावर आला.तिथचं टेकवली .टेकल्याबरूबर ती लगेच कलांडली.तिचा पार आकडा झाला होता.पारचं गळाटून गेली होती.त्याची सासू सारं बोचक घेऊन माग आली. पल्लीच्या त्वांडावर हात फिरवला .तशी पल्ली विव्हाळली,"आयो मेले गं..!!" ड्रायव्हर विलाश्यानं पुढी काढली.ते काय करील दुसऱ...? तसचं धाबाड उचाकलं नि त्यात सोडली अन् पायरीवर टेकला . बसलं पचापचा थुकतं. कचाकचा पाय-यावर चढून तो पार वर आला दुस-या मजल्यावर आला.