मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

दे बहाणे सोडुनी ...

संदीप-लेले · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
काव्यरस
खास काही आजच्या भेटीत झाले आखरी कावरी झाली किती झाली किती ती बावरी भासवे नाजूक काही भावना या ना मनी सांगते सारे खळी जी लाजते गालावरी मान वेळावून पाही तो बहाणा लाघवी एकदा सारे अशी सारे तशी बट लाजरी ऐकण्यासाठी अबोला कोकिळा झाली मुकी बोलली नाही तरी पंचम तिच्या ओठावरी साधली संधी कशी तो वर्षला ग्रीष्मातही दे बहाणे सोडुनी ती लाज आता सावरी ... संदीप

वाचने 6871 वाचनखूण प्रतिक्रिया 17

सत्यजित... Fri, 05/05/2017 - 03:44
>>>'कैकदा',सारे अशी,सारे तशी,बट लाजरी>>>मिसरा आवडला! >>>बोलली नाही तरी पंचम तिच्या ओठावरी>>>क्या बात है! हा मिसरा तर जबरदस्तच!शेरही छानंच! लिखते रहिये!!

संदीप-लेले Fri, 05/05/2017 - 08:32
एस, तुमचा उत्स्फूर्त अभिप्राय वाचून दिल खुश हो गया ! अनेक धन्यवाद. सत्यजित, तुझ्याकडून शाबासकी मिळाली. त्यानेही दिल खुश हो गया :) 'कैकदा' लिहावे असे मलाही वाटले होते. पण गेयता कमी होईल अशी शंका आली. आता प्रत्यक्ष तूच म्हणतो आहेस तर तसेच करतो. dr अहिरराव, विशाल कुलकर्णी आणि विशेषतः: सत्यजित यांच्या गजल वाचून गजल लिहायची तीव्र इच्छा झाली. गजल च्या नियमांसंबंधी विशाल कुलकर्णी यांनी उपयुक्त माहिती कळवली. त्याबद्दल विशालचे मनापासून आभार. मिपा मुळे हे शक्य झाले. ३ cheers for मिपा !!!

In reply to by संदीप-लेले

सत्यजित... Sat, 05/06/2017 - 05:10
संदीपजी, गझल लिहावयाची तीव्र इच्छा बाळगून आहात हे वाचून आनंद झाला!आणि म्हणूनच अजून लिहितो आहे... शेवटच्या शेरात,दोन मिसऱ्यांमध्ये,राबत्याचा प्रश्न जाणवतो आहे! खरेतर,शेरांना पर्यायी शेर सुचवणे हा माझा स्वभाव नाही.किंबहुना,पहिल्यांदाच सुचवतो आहे,याचे कारण इतकेच की आपली लिखाणाबद्दलची इच्छा जाणवली,व राबता जरा स्पष्ट व्हावा! हां,तर तो शेर मी असा काहिसा लिहिला असता... वर्षतो ग्रीष्मात आहे..साध ही संधी बरी हे बहाणे सोड राणी..चल भिजू आतातरी!

In reply to by मितान

संदीप-लेले Fri, 05/05/2017 - 13:40
धन्यवाद मितान. सुरेश भट यांनी सोप्या शब्दात लिहिलेले गजलेचे नियम या धाग्यावर मिळतील. ही गजल लिहिताना मला गजल लिहिण्याचे, लिहिण्याचे म्हणण्यापेक्षा बनवण्याचे, एक तंत्र लक्षात आले. सिद्धहस्त कवींची बात वेगळी. पण मला कविता आणि गजल, दोन्ही बनवाव्या लागतात. ज्यांना गजल लिहायची इच्छा आहे पण तंत्र माहित नाही, त्यांना ते उपयोगी पडेल असे वाटते. अर्थात मुळात कविता लिहिता येणे आवश्यक आहे. मला सुचलेल्या कवितेवरून ही गजल कशी बनवली यावर सोदाहरण माहिती देऊन स्वतंत्र लेखात हे तंत्र सांगावे की काय असा विचार मनात येतो आहे. कोणाला त्यात रस असल्यास कळवावे.

In reply to by संदीप-लेले

सतिश गावडे Fri, 05/05/2017 - 14:26
गजलेच्या नियमांच्या दुव्यासाठी धन्यवाद.
मला सुचलेल्या कवितेवरून ही गजल कशी बनवली यावर सोदाहरण माहिती देऊन स्वतंत्र लेखात हे तंत्र सांगावे की काय असा विचार मनात येतो आहे. कोणाला त्यात रस असल्यास कळवावे.
जरुर लिहा. माझ्यासारख्या कित्येक यमकहरामांना त्याचा फायदा होऊ शकेल.

मस्त लयबद्ध रचना.... आवडली.... साधली संधी कशी तो वर्षला ग्रीष्मातही दे बहाणे सोडुनी ती लाज आता सावरी क्या बात है....