सत्यजित भाऊंची उत्तम गजल "ओंजळीने ती जसा झाकून घेते चेहरा" वाचली.
एक 'कोबरा' सोडला तर बाकी सगळे शेर डसले! :)
ईर्शाद. अर्थातच आमचा नजराणा....
ओंजळीने ती जरी झाकून घेते चेहरा...
येत नाही लपवता पण गाल मोठा गोबरा!
मोकळ्या केसांतुनी माळून येते तेरडा
अन् जटांचा जीवघेणा सुंभ दिसतो का बरा?
आरसा भंजाळतो हो ती जशी डोकावते
केवढी गबदूल आहे, कोण म्हणते अप्सरा!
ओठ ओठांनी स्वतःचे घट्ट मिटते सारखी
भिववतो भोळ्या जिवाला चुंबनांचा तोबरा!
काय सांगू केवढी असते भयानक भेट ती?
ती फुल्यांची मेहुणी अन् मी फुल्यांचा सोयरा!
-चतुरंग
वाचने
2718
प्रतिक्रिया
10
मिसळपाव
प्रतिक्रिया
मुकर्रर!
छानच जमली आहे!
स्वतंत्र धागा काढून ब्येष्ट
स्वतंत्र धागा काढून ब्येष्ट केलं रंगाभाऊ !
खतरनाक विडंबन ! :))
पण ते तेरडा आलं तर हिरडा, बेहडा, रोहिडा पण यायलाच पायजेल अशी मागणी नोंदविते =))
=))
In reply to स्वतंत्र धागा काढून ब्येष्ट by मितान
=)) =)) =))
नाही रे! नाही !
नाही रे! नाही !
आरसा भंजाळतो हो ती जशी
=))
क ह र !!
क ह र !!
@मोकळ्या केसांतुनी माळून येते
@मोकळ्या केसांतुनी माळून येते तेरडा
अन् जटांचा जीवघेणा सुंभ दिसतो का बरा? ››› =)) वारल्या गेलो आहे! =))
वाह!..
वाह!..चित्र उपलब्ध नाही
कहर ,लोल
कहर ,लोल
ओंजळीने ती जरी झाकून घेते
ओंजळीने ती जरी झाकून घेते चेहरा...
ओंजळीने ती जरी झाकून घेते चेहरा...
जर जमल तर घर सार नीट आवरा
जुळल कि यमक :P