कधी किनारा लिहितो किंवा,कधी शिकारा लिहितो
तुझ्या मनाच्या लहरींना मी उनाड वारा लिहितो!
कधी मनाची लाही होते,कधी शहारा होतो
कधी सरी बरसाती लिहितो,कधी निखारा लिहितो!
तिच्या घरी माझ्या कवितांना,खुशाल वावर आहे
तिला वेळ भेटीची कळते,असा इशारा लिहितो!
कधी फुले ती वेचत असता,उशीर होतो तेंव्हा
तिचा स्पर्श ओझरता माझ्या मनी पिसारा लिहितो!
अजूनही घमघमते अत्तर,तुझ्या रुमालावरचे
अजून मी माझ्या श्वासांना,तुझा निवारा लिहितो!
तुला जमेशी धरले तेंव्हा,सदा हातचे सुटले
हिशोब आता जुळतो जेंव्हा,तुझा घसारा लिहितो!
तुझी प्रार्थना बहुधा त्याला कोडे घालत असते
उगा न माझ्या नावे तोही जन्म दुबारा लिहितो!
—सत्यजित
वाचने
4901
प्रतिक्रिया
20
मिसळपाव
प्रतिक्रिया
तुझी प्रार्थना बहुधा त्याला
+१
In reply to तुझी प्रार्थना बहुधा त्याला by यशोधरा
सुंदर!
भारी !
धन्यवाद!
?
In reply to धन्यवाद! by सत्यजित...
एखाद्या समुद्रकिनाऱ्याच्या
In reply to ? by संजय क्षीरसागर
सत्यजित !
In reply to एखाद्या समुद्रकिनाऱ्याच्या by सत्यजित...
तुमचा नेमका शब्द चुकला '
In reply to सत्यजित ! by संजय क्षीरसागर
धन्स!
In reply to तुमचा नेमका शब्द चुकला ' by यशोधरा
.
In reply to धन्स! by सत्यजित...
गुस्ताख़ी माफ़ .... पण हे चालतंय का पाहा
In reply to . by संजय क्षीरसागर
मला स्वतःला नीट नाही समजली ही
In reply to धन्यवाद! by सत्यजित...
होय
In reply to धन्यवाद! by सत्यजित...
शेवटचे कडवे विशेष आवडले.
सुंदर लिहिलंय
सहमत !
In reply to सुंदर लिहिलंय by पैसा
धन्यवाद!
अतिशय छान!!
धन्यवाद!
In reply to अतिशय छान!! by शार्दुल_हातोळकर