Skip to main content

अंदमान : मोअर दॅन अ होम अवे फ्रोम होम भाग ३

लेखक प्रीत-मोहर यांनी बुधवार, 28/06/2017 16:50 या दिवशी प्रकाशित केले.
अंदमान : मोअर दॅन अ होम अवे फ्रोम होम भाग १ अंदमान : मोअर दॅन अ होम अवे फ्रोम होम भाग २ नंतर आम्ही चिडिया टापू भागाकडे जात होतो. हा भाग पोर्ट ब्लेअर च्या दक्षिणेला आहे. नावावरुन कळलंच असेल याला चिडिया टापू का म्हणतात. घनदाट अरण्य, वेगवेगळे पक्षी, अंगावर नाचणारी फुलपाखरं ,वेगवेगळे किडे अशी एक टिपीकल एवरग्रीन फॉरेस्टमधली इको सिस्टम आहे ही.

नविन हायब्रिड सायकल

लेखक केदार बर्वे यांनी बुधवार, 28/06/2017 16:02 या दिवशी प्रकाशित केले.
नविन हायब्रिड सायकल घ्यायचि आहे. पर्याय सुचवा जास्तित जास्त १५००० खर्च करु शकातो. मोन्त्रा डाउन टाउन काशि आहे ?

why is there something rather than nothing???????

लेखक टर्बोचार्जड फिलॉसॉफर यांनी बुधवार, 28/06/2017 15:18 या दिवशी प्रकाशित केले.
देव,धर्म,मृत्युनंतरचे जीवन,अमानवी शक्ती व अनेक गोष्टी मानवाला आकर्षीत करत आल्या आहेत.मी ही लहानपणी या गोष्टींवर विश्वास ठेवायचो,त्यांच्यात असलेल्या गूढत्वाच्या वलयात स्वतःला हरवून जाण्यात एक वेगळीच झिंग असते.बहुतांश लोक या नशेतून बाहेर येत नाहीत.

मनोगत

लेखक अमरेंद्र बाहुबली यांनी बुधवार, 28/06/2017 11:29 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मिसळपाव. मिसळपाव चा आभारी आहे. मला सदस्य बनवल्या बद्दल. मी आंतरजालावर नेहमी कोणत्या ना कोणत्या विषयाची माहीती वाचत असतो. एखादा शब्द शोधला आणि त्याची माहीती मिपावर मिळाली नाही.अस कधीच झाल नाही. सर्व सदस्य अतिशय माहीतगार त्यांच्या प्रतिक्रियांमुळे खूप माहीती मिळाली. सर्वांचा खूप आभारी आहे. प्रतिक जडे. धुळे.

आयुष्याची गाडी

लेखक माम्लेदारचा पन्खा यांनी बुधवार, 28/06/2017 09:48 या दिवशी प्रकाशित केले.
रिकामी दिसली एक गाडी त्यात जाऊन बसलो मी आता मजा येईल प्रवासाची म्हणून स्वतःशीच हसलो मी कधी वाटलं गाडीला थांबवावं कधी सुसाट पळवावं तिला पण आयुष्य नामक चालकाने माझा पूर्ण भ्रमनिरास केला मी नेईन तसंच जायचं तू म्हणालं मला माझं आयुष्य कसला हट्ट करायचा नाही विचारायचं नाही कधी भविष्य घडवीन तुला सफर मी आता एका वेगळ्याच जादुई दुनियेची कुठे फार थांबायचं नाही आपण आणि घाईही नाही करायची आलास जसा जन्माला सगळे रंग तू बघून घे लक्षात नाही यायचा खेळ हा हे पहिल्यांदा समजून घे तुझ्यासारखेच इतर अनेक भेटतील तुला पावलोपावली तू मात्र असशील एकटाच बरोबर फक्त तुझीच सावली वाटेल तुला तूच करतोस सगळं पण तो

हरणेश्वराय नम:

लेखक सौन्दर्य यांनी बुधवार, 28/06/2017 08:01 या दिवशी प्रकाशित केले.
हरणेश्वराय नम: “जा, दूर हो माझ्या नजरेसमोरून" स्व:ताच्या डोळ्यातील अश्रू पुसत, हुंदके आवरत सीतामाई कडाडल्या. “स्व:ताच्या मोहक रंगरुपाने मला फसवलेस, रावणासारख्या दुष्ट व्यक्तीला मदत केलीस आणि माझ्या नशिबी माझ्या प्रिय पतीचा विरह लादलास त्याबद्दल मी तुला कदापि क्षमा नाही करणार.” “माई, माझी बाजू तर ऐकून घ्या” तो मृगाधीपती सांगण्याचा प्रयत्न करू लागला. त्याला मध्येच अडवत सीतामाई पुनः कडाडल्या. “कसली बाजू ? हेच ना की मला तुझ्या रुपाने भुलवलंस, मला मोहात पाडलंस आणि मी मोहात पडले” डोळ्यातील अश्रू पुसत सीतामाई संतापाने ओरडल्या. “जा, आता हेच तुमच्या भाळी लिहिले आहे.

माझ्या गावाचा पाऊस..

लेखक अत्रुप्त आत्मा यांनी मंगळवार, 27/06/2017 19:24 या दिवशी प्रकाशित केले.
माझ्या गावाचा पाऊस आडंरानी आडंवनी.. https://scontent-lax3-1.xx.fbcdn.net/v/t1.0-0/cp0/e15/q65/s600x600/18922033_105872673352925_8587622378336631223_n.jpg?efg=eyJpIjoidCJ9&oh=519629344698b21dc06628f17fbe1306&oe=59D981D6 फुले अंगांगी हो त्याच्या रूजे थेंब पानोपानी..

कविता II अजून एक चान्स तू घ्यायला हवा होता II

लेखक सिद्धेश्वर विलास पाटणकर यांनी मंगळवार, 27/06/2017 17:28 या दिवशी प्रकाशित केले.
अजून एक चान्स तू घ्यायला हवा होता ठाऊक मजला ठिकऱ्या ठिकऱ्या उडाल्यात निवड चुकली जरी तुझी पहिली तरी अजून एक हात धरायला हवा होता II हि वाट नयनांनी खुलते स्पर्शाने फुलते रमते मन सदैव त्यात अचानक सत्य येता बाहेर अकस्मात होतो मनावर आघात II अपघात घडतच असतात अशा फैरी नित्य झडतच असतात म्हणून मनाची बंदूक म्यान करायची नसते पुन्हा नव्याने उठून अजून एक फैरी झाडायची असते II विसरायचे ते सारं काही आता कशात मन रमत नाही असं पुन्हा म्हणायचे नाही पंख छाटलेले नसतात ,असे बंदिस्त अंतरी ते पुन्हा फुलवून सारे ,घे कवेत आकाश ते सोड भूत पाश जुने , अजून एक नवा चान्स घे II सिद्धेश

आमची भारतीय प्रमाणवेळ !

लेखक हेमंतकुमार यांनी मंगळवार, 27/06/2017 11:30 या दिवशी प्रकाशित केले.
‘’अनेक बाबतीत विविधता व मतभिन्नता असलेल्या तुमच्या देशातील नागरिकांमध्ये एखाद्या बाबतीत तरी समानता आहे का हो?’’ असा प्रश्न जर आपल्याला एखाद्या परदेशी व्यक्तीने विचारला, तर त्याचे उत्तर ‘’होय, आम्ही भारतीय, ठरलेली वेळ न पाळण्याच्या बाबतीत समानधर्मी आहोत’’ असे देता येईल! काय, दचकलात ना हे उत्तर ऐकून? पण वास्तव नाकारून कसे चालेल? आपल्याकडे कुठलाही प्रसंग असो, ठरलेली वेळ ही अभावानेच पाळली जाते. थोडाफार उशीर करणे हा आपला स्थायीभाव आहे.

घराला मनांचा उबारा करु!

लेखक सत्यजित... यांनी मंगळवार, 27/06/2017 06:48 या दिवशी प्रकाशित केले.
नको तेच ते तू दुबारा करु हवा देउनी मज निखारा करु! भिजू दे मला तू मिठीशी तुझ्या पुन्हा पावसाला इशारा करु! नको मोकळे केस झटकून तू इथे चांदण्याचा पसारा करु!