Skip to main content

अदा बेगम - भाग २

लेखक बिपीन सुरेश सांगळे यांनी सोमवार, 29/03/2021 21:55 या दिवशी प्रकाशित केले.
अदा बेगम - भाग २ ------------------ शिवाजीमहाराज वेशीवर येऊन ठेपले होते. सुरतच्या पूर्वेला असलेल्या बुऱ्हाणपूर दरवाजाजवळ फौजेची छावणी पडली. पण सुभेदार इनायतखान गाफील राहिला . कारण त्याला कळलं होतं की मोगलांचा मराठा सरदार तर पुढे चाललाय अहमदाबादला. मोगली सरदाराला मदत करायला. तिथे झालेलं एक बंड मोडण्यासाठी. ही आवई तर खुद्द राजांनीच थोडीशी आधी उठवलेली. सुभेदार इनायतखानाला निरोप गेला. सामोपचाराने खंड ठरवता येईल. गिल्ला करण्याची , जाळपोळ करण्याची, नासधूस करण्याची काही गरज नाही. पण इनायतखानाकडून उत्तर आलं नाही , ना कुठल्याही फिरंग्यांकडून . तांबडं फुटलं. पक्ष्यांची किलबिल सुरु झाली.

कोविड अनुभव

लेखक MipaPremiYogesh यांनी सोमवार, 29/03/2021 19:39 या दिवशी प्रकाशित केले.
कोविड अनुभव तसे पहिले तर आता लोकांना नवीन नाहीये तरीही मी हे लिहिण्याचं कारण कि कोणाला थोडासा तरी फायदा होऊ शकेल. तारीख १२ मार्च , माझ्या मुलाचा वाढदिवस. पुरणपोळीचा प्लॅन चालू होता आणि फोन खणखणला कि तडक हॉस्पिटल मध्ये या. माझ्या सासर्यांना वेगळ्या कारणासाठी ऍडमिट केले होते तिकडून फोन होता. आम्ही ब्रेकफास्ट चा घास तसाच ठेवला आणि हॉस्पिटल ला गेलो. ICU मधले डॉ म्हणाले कि त्यांना covid डिटेक्ट झालाय आणि इकडून शिफ्ट करावे लागेल. आमच्या पायाखालची जमीनच सरकली. मेव्हणी आणि मेव्हण्याला फोन केला. ते पण आले. डॉ ची चर्चा केली ते म्हणाले आम्ही चौकशी करतो कुठे जागा मिळेल तशी.

तू जीव माझा- तू प्राण माझा - आलीस तू अवचिता

लेखक चित्रगुप्त यांनी सोमवार, 29/03/2021 17:55 या दिवशी प्रकाशित केले.
तू जीव माझा - तू प्राण माझा - घ्यावया नच होतीस आली मालूम होते मला शौच्यालयात घुसता मग सावरून बसता मोबाइलात रमता आलीस तू अवचिता जवळि जवळ येता मग कडकडून डसता मम उष्ण रक्त प्रशिता मेरा चैन-वैन सब लुटिता वाजवून टाळिका मी जीव तुझा - मी प्राण तुझा - हरिला - अल्विदा मच्छरिनी - अल्विदा. .

शेअरमार्केट ची बाराखडी... भाग १ : Fundamental Analysis

लेखक गणेशा यांनी सोमवार, 29/03/2021 14:55 या दिवशी प्रकाशित केले.
आधिचे भाग - भाग ० : Basics - By गणेशा भाग ०.१: मार्जिन - By बिटाकाका -------------------------------------------- प्रथमता आपण हे लक्षात घेऊ की Fundamental Analysis हे दिर्घकालीन गुंतवणुकीसाठी केले जाते.. म्हणजे फक्त Long term portfolio बनवण्यासाठी Fundamental Analysis चा उपयोग होतो.

अदा बेगम - भाग एक

लेखक बिपीन सुरेश सांगळे यांनी सोमवार, 29/03/2021 11:39 या दिवशी प्रकाशित केले.
अदाबेगम ---------------------------------------------------------------------------------------------------------------------------- सैंया तू झूठीयां मोह माया ये दुनिया दौलत नाही तो कुछ भी नाही उसके बिन तो साथ भी छुटियां अदाबेगम मखमली आवाजात गात होती. तिच्या दालनात बसलेले शौकीन त्या संगीतस्वर्गात भान हरपून गेले होते. तिच्या तानेसरशी, माना डोलत होत्या. तिच्या पदन्यासासरशी नजरा हालत होत्या. तिच्या फिक्या गुलाबी रंगाच्या लेहेंग्याच्या फिरकीसरशी नजर गिरकी घेत होती . साजिन्द्यांनी मध्येच वाजवलेल्या द्रुत लयीवर होणाऱ्या तिच्या वेगवान , मोहक अदांनी तिच्यावर नजर ठरत नव्हती .

अंतर्नाद

लेखक अनन्त्_यात्री यांनी शनिवार, 27/03/2021 19:55 या दिवशी प्रकाशित केले.
अमूर्ताचा अंतर्नाद अक्षरांच्या कपारीत शब्दाशब्दाच्या घळीत ओळीओळीत गुंजला अमूर्ताचा पायरव हलकेच जाणवता अनाहत तरंगांनी डोहडोह डहुळला अमूर्ताचा पोत कसा अमूर्ताचा पैस किती अमूर्ताचा डंख कुठे विचारत विचारत अणुरेणू झंकारला
काव्यरस

गोष्ट सांगा आणि गणित शिकवा... 6

लेखक राजा वळसंगकर यांनी शनिवार, 27/03/2021 17:30 या दिवशी प्रकाशित केले.
To every problem, there is a most simple solution. हे चिंट्या जितके सहज म्हणाला, तितके सहज उत्तर मिळेल याची कुणालाच खात्री नव्हती. पण शोधले तर पाहिजेच! त्याशिवाय गत्यंतर नव्हते... ************************** गोष्टीचा आधीचा भाग.... इथे टिचकी मारा ************************** तिकीटघरात टेबलावर बसून सगळे आयडिया लढवू लागले. बोटीला स्टीयरिंग आहे तर मग काय प्रॉब्लेम आहे? प्रवाहामुळे बोट ओढली गेली तर स्टीयरिंगने ने जागेवर आणता येणार नाही का?

सध्या मी काय पाहतोय ? भाग ३

लेखक मदनबाण यांनी शुक्रवार, 26/03/2021 22:35 या दिवशी प्रकाशित केले.
अनेक वर्ष मी हिंदूस्थानात चांगले रस्ते असावेत यावर बोललो असेन पण आता देशात चांगले रस्ते, हायवे निर्माण होत आहेत याचा विशेष आनंद आहे. :) आज मा.नितीन गडकरी यांची याच विषयावर असलेली मुलाखत पाहिली आणि देशात रस्त्यांचे काम ते अतिशय भव्यतेने, वेगाने आणि पैशांची बचत देखील करुन करत आहेत हे समजले.