Skip to main content

सच्चिदानंद बाबांची गोष्ट

लेखक धन्या यांनी रविवार, 11/08/2013 10:58 या दिवशी प्रकाशित केले.
गोष्ट तशी खुप जूनी. जवळपास आठशे वर्षांपूर्वीची. आताच्या आहमदनगर जिल्ह्यातील नेवासा नावाचं गाव. गावातील मोहिनीराजाचं मंदीर थेट समुद्रमंथनातील अमृतवाटप आणि विष्णूच्या मोहीनी अवताराच्या कथेशी निगडीत. या गावातील मुख्य रस्त्यातून एका सुंदर सकाळी संन्याशी वाटावीत अशी चार मुलं, तीन मुलगे आणि एक मुलगी मार्गक्रमण करत असतात. चौघांच्याही वयात थोडे थोडे अंतर असल्याचे जाणवत होते. एकमेकांच्या पाठीला पाठ लावून जन्माला आलेली सख्खी भावंडेच जणू. चौघांच्याही चेहर्‍यावर एक अतीव समाधान, शांती विलसताना दिसत होती. वाट चालत असताना या मुलांच्या समोरुन एक प्रेतयात्रा येते.

अजुन एक बालकथा : शतशब्दकथा

लेखक प्रसाद गोडबोले यांनी शनिवार, 10/08/2013 21:27 या दिवशी प्रकाशित केले.
एक होता ससा एक होतं कासव . त्यांची लागली शर्यत आंब्याच्या झाडापर्यंत पळण्याची पण चिऊचं घर होतं मेणाचं अन काऊचं घर होतं शेणाचं म्हणुन म्हातारी म्हणाली " लेकीकडे जाऊ तुपरोटी खाऊ मस्त जाडजुड होवु ".

गंप्या आणि पाट्या

लेखक राजा सोव्नी यांनी शनिवार, 10/08/2013 19:10 या दिवशी प्रकाशित केले.
गंप्या कोठेही जातो तेथे रस्त्याने जाताना त्याला दुकानांचे फलक,घराबाहेर च्या पाट्या,जाहिरातींचे फलक वाचण्याचे वेड आहे,त्यातून तो काही विनोद शोधण्याचा प्रयत्न करत असतो,टकले हेअर कटिंग सलून,अंधळे ओप्टीशियंस ,पुस्तके रद्दी डेपो अशा मजेदार पाट्या होत्या नागडे वस्त्र भंडार वाचून त्याला वाटले अंगावरचे सर्व कपडे काढून दुकानात विकण्यास ठेवले कि काय? अंधारे विद्युत सेवा केंद्र ,तपस्वी शृंगार सदन,लोखंडे ज्वेलर्स,दाउद खादी भंडार अश्या पाट्या पाहून त्याला विनोद सुचत,डॉ काळे यांचे गोरे पणाचे क्रीम कसे काम करत असेल असे त्याला वाटले,मुळे टिफिन सेंटर च्या डब्यात बहुदा रोज मुळ्याची भाजी असावी असा कयास त्याने क

एक चिऊ, गोजिरवाणी..

लेखक वेणू यांनी शनिवार, 10/08/2013 16:59 या दिवशी प्रकाशित केले.
मी तुळशीपाशी, लावता पणती एक, अंगणी शेजीची येते चिमणी सुरेख कसे गाल गुलाबी, कानी झुलती डूल हातात बाहुली आणि जाईचे फूल... अन् म्हणते करूनी गाल गोबरे मजला, "पाहूनी मला का हसूच फुटते तुजला?" तिज जवळी ओढूनी, सांगू पाहे मग मी, "अगं बाळा, गोड तू सुंदर चपळ गं हरिणी, अशी गोडच दिसशी, हळूच हसता तू गं, तुज पाहून बाळा, हसू फुटे मजला गं" ना कळते तिजला, परि हलविते मान, बाहुलीस धरुनी तिथेच मांडी ठाण, ही तिला भरविते काय पहा हे ध्यान, म्हणे ऐक बाहूले, "करू तयारी छान!" बाहुलीस सजविता, पाहे शांत मी बसूनी, तिचे केस आवरते, फूल जाई गुंफूनी.. मग पावडर खोटे, तिट टिळाही देते ह्रूदयास धरूनी "राणी माझी" म्हणते म्ह

आरोग्य पंचविशी -१

लेखक सुबोध खरे यांनी शनिवार, 10/08/2013 13:49 या दिवशी प्रकाशित केले.
आरोग्य पंचविशी -- प्रस्तावना --हि एक आरोग्य विषयक लेख मला लिहायचे माझ्या मनात होते त्याला सुरुवात करीत आहे त्यातील हा पहिला लेख. यातील साहित्य हे बरेचसे श्रुती, स्मृती, ग्रंथोक्त आहे.बरेचसे लिखाण हे माझ्या वाचन, विचार किंवा चिंतनातील आहे आणी त्यामागे अभ्यासलेल्या वैद्यकीय ज्ञानाचा भाग आहे यामध्ये कोणतीही चूक आढळल्यास (किंवा काही नवीन संशोधन) कृपया निदर्शनास आणावी( संदर्भासहित) म्हणजे त्यात सुधारणा करण्यात येईल. वैयक्तिक मतभेद जरूर लिहावेत. यात कोणतीही संगती नाही जसे सुचेल तसे लिहित आहे( जात्यावर बसल्यावर ओवी सुचते असे म्हणतात तसा एक प्रयत्न आहे.

नजर

लेखक राजा सोव्नी यांनी शनिवार, 10/08/2013 13:48 या दिवशी प्रकाशित केले.
नजरेत कुणा भक्ती,नजरेत कुणा विरक्ती, नजरेत कुणा मोका,नजरेत कुणा धोका , नजरेत कुणा वासना ,नजरेत कुणा कामना , नजरेत कुणा युक्ती,नजरेत कुणा सक्ती, नजरेत कुणा संस्कार ,नजरेत कुणा दुत्कार , नजरेत कुणा जरब,नजर कुणाची खराब, नजरेत दिसे व्यथा ,नजरेत दिसे कथा, नजरेत प्रगटे ज्ञान ,नजर मनाची शान
काव्यरस

परुले येथील आदिनारायण मंदिर जायला मदत हवी आहे

लेखक सुचेता यांनी शनिवार, 10/08/2013 13:19 या दिवशी प्रकाशित केले.
आम्हि येत्या १५ ऑगस्टला परुले येथील आदिनारायण मंदिर येथे जायचे ठरवत आहोत. तर तेथे आजुबाजुला बघन्या सारखं अजुन काय आहे? किति अंतारावर आहे, आमच्याकडे ३ दिवस आहेत, तर विजयदुर्ग हि पाहुन होउ शकतो का? राहन्यासाठी काय सोय असेल, घरातील मंड्ळी सोबत अस्तील तर काही जास्तीची काळजी घेऊ? मु़ख्य म्हणजे जेवायची विषेशःता शाकाहारी काय सोय असेल? आधि कुणी जावुन आलेल्यांनी जर इथे काही लिह्ले असेल तर ते कसे शोधावे. मदत हवी आहे. जाताना चे आरक्शण झालेले आहे पण येताना कुडाळ वरुन फक्त सकाळ्च्या वेळेस च बस दिसतात एस टी च्या वेब साइट वर , तर येताना रात्री काही गाड्या आहेत का? रेल्वे ची सोय कशी आहे?

शिमगा

लेखक अज्ञातकुल यांनी शनिवार, 10/08/2013 09:12 या दिवशी प्रकाशित केले.
माझे कसे म्हणू मी माझाच मी न आहे स्मरतो कधी कुणाला अंतर उगाच दाहे आवेग भावनांचा माया उतून वाहे अभिषेक तोष तरिही संवेदना दुखावे मेघाळ आसमंती संकेत जड पळांचा वारा थके जरासा अंगी उलाल लाही श्वासात जीव लाव्हा रुसवा भला इरेला आतंक सोसलेला शिमगा सुभान देही ………………अज्ञात
काव्यरस