गंप्या आणि पाट्या
गंप्या कोठेही जातो तेथे रस्त्याने जाताना त्याला दुकानांचे फलक,घराबाहेर च्या पाट्या,जाहिरातींचे फलक वाचण्याचे वेड आहे,त्यातून तो काही विनोद शोधण्याचा प्रयत्न करत असतो,टकले हेअर कटिंग सलून,अंधळे ओप्टीशियंस ,पुस्तके रद्दी डेपो अशा मजेदार पाट्या होत्या नागडे वस्त्र भंडार वाचून त्याला वाटले अंगावरचे सर्व कपडे काढून दुकानात विकण्यास ठेवले कि काय?
अंधारे विद्युत सेवा केंद्र ,तपस्वी शृंगार सदन,लोखंडे ज्वेलर्स,दाउद खादी भंडार अश्या पाट्या पाहून त्याला विनोद सुचत,डॉ काळे यांचे गोरे पणाचे क्रीम कसे काम करत असेल असे त्याला वाटले,मुळे टिफिन सेंटर च्या डब्यात बहुदा रोज मुळ्याची भाजी असावी असा कयास त्याने केला ,दिवसभर उघडे असणाऱ्या दुकानावर आम्ही दिवसभर उघडे असतो अशी पाटी होती
एका सदनिकेवर सदावर्ते खाली तळ घरात राहतात असे लिहलेले होते एका घरावर मो ठा कोपरकर लिहिलेल्या पाटी वरचा को कोणी व्रात्य मुलाने खोडला होता,त्या मुळे पाटीवर नुसताच मो ठा परकर राहिला होता,वाघ कुक्कुट पालन केंद्र वाचून त्याला वाटले जंगलात काही खायला मिळत नसल्याने वाघाने कोंबड्या पालनाचा धंदा सुरु केला कि काय?मुंगी ट्रान्सपोर्ट सर्विस सामानाची ने आण चांगली करत असावेत कावळे गुरुजी दशपिंड क्रिया कर्म करणारे किरवंत यांच्या कडून क्रिया कर्म केल्यास नक्कीच पिंडाला कावळा शिवत असेल ,
शहरात एका मोठ्या हॉस्पिटल वर एक मोठा फलक लावलेला होता ,कोणते डॉक्टर कशाचे आहेत हे त्यावर लिहिले होते
डॉ साखरे ==मधुमेह तज्ञ, डॉ काणे नेत्ररोग तज्ञ, डॉ बावळे ==मानस रोग तज्ञ, डॉ बहिरट =कर्ण रोग तज्ञ, डॉ विसपुते =संतती नियमन तज्ञ ,डॉ बारलिंगे =कृत्रिम गर्भाधान तज्ञ अशी बरीच नावे होती दवाखान्याच्या समोर स्वर्ग अंत्यविधी साहित्य भंडार चे दुकान होते ते नक्कीच खूप चालत असावे असे त्याच्या मनात आले,दमयंती प्ल्म्बर्स ,नळाचे काम खातीने करून मिळेल असे वाचून नळ दमयंती चे नाव अजूनही टिकून आहे असे त्याच्या मनात आले
वर्गीकरण
अरे वा ! भलतीच मज्जा आहे.
मजा!
काय काय लिव्हता राव तुम्ही .
आजकालची पोट्टीसोट्टीपण असले
In reply to आजकालची पोट्टीसोट्टीपण असले by शिल्पा ब
तुम्हाला आजपासुन शिल्पाचाच्ची
हा हा हा...
खॅ खॅ खे.... ( कसनुसं हसणारी
डॉक्टर बंब
टाका पाट्या