Skip to main content

संत मीराबाईची विराणी

लेखक आयुर्हित यांनी सोमवार, 03/02/2014 21:21 या दिवशी प्रकाशित केले.
नाते जोडले नामाशी, कधीच मी तोडणार नाही|| पिवळ्या पानावानी दिसे मी जरी, नसे हा पंडूरोग| चोरून करीते उपवास, देईल रामभेटीचे योग|| पकडून माझी भुजा, वडिलांनी वैद्य बोलवला | कळे ना त्या मुर्खाला, हृदयात माझ्या पीळ पडलेला|| जावो वैद्य आपुल्या घरी, माझे नाव काढू नको| विरहाने जळालेली मी अशी, औषध मला देऊ नको|| अंगावरील मांस उतरले, उरला हाडांचा सापळा| बोटाच्या अंगठीत घुसेल, झाला बारीक दंड आगळा|| राहून राहून पापी कोकीळ, समोर प्रियाचे नाव आळवतो| विरहात सांभाळते स्वःताला, प्रियासाठी जीव जाळवतो||
काव्यरस
Taxonomy upgrade extras

पाँचफोरोन दाल (Panch Phoron)

लेखक सानिकास्वप्निल यांनी सोमवार, 03/02/2014 15:22 या दिवशी प्रकाशित केले.
अतिशय सोपी व चविष्ट अशी ही बंगाली पद्धतीची डाळ आहे. पाँचफोरोन म्हणजे पाच प्रकारचे जिन्नस ह्यात वापरले आहेत मोहरी, जीरे, बडीशेप, मेथी-दाणे व कांद्याचे बी (कलौंजी).

पांडुरंग

लेखक आतिवास यांनी सोमवार, 03/02/2014 14:16 या दिवशी प्रकाशित केले.
बेल वाजली.. ’आत्ता या वेळी कोण?’ चडफडत दार उघडले, तर समोर पांडुरंग - मला म्हणाला, “बोल". कटेवर हात नव्हते, पायाखाली वीट नव्हती, चंदनाचा टिळा नव्हता, भोवती भक्तीचा मळा नव्हता. मी म्हटले, “या, बसा. सुखदु:खाच्या गोष्टी बोलू हवे तर, पण उगीच दांभिक देवत्त्वाचा आव आणू नका.” “हे तर लई बेस झालं" म्हणत तो विसावला, आरामखुर्चीत बसून गॅलरीतून दिसणारा आकाशाचा तुकडा न्याहाळताना हरवून गेला. त्याने मला प्रश्न विचारले नाहीत, मीही नाही. त्याने मला उपदेश केला नाही, मीही नाही. त्याने स्वत:भोवती एक अदृष्य भिंत रचली, मीही तेच केले. माझ्या सहवासात त्याने स्वत:चे एकाकीपण मनमुराद जपले - मीही तेच केले. तरीही आम्ही

उत्तरायण २०१४ - अमुल डेअरी - आणंद (भाग ४)

लेखक मोदक यांनी सोमवार, 03/02/2014 13:53 या दिवशी प्रकाशित केले.
उत्तरायण २०१४ - पुणे ते बडोदा (भाग १) उत्तरायण २०१४ - पुणे ते बडोदा (भाग २) उत्तरायण २०१४ - काsssssssssssssयपो छेssss (भाग ३) गुजरात आणि बडोद्याचा नकाशा अभ्यासताना 'आणंद' वर नजर गेली.. जागतीक कुतुहलाचा विषय असलेली अमुल डेअरी बडोद्यापासून फक्त ४० किमी अंतरावरच आहे! हे लक्षात आल्यावर लगेचच एक पूर्ण दिवस आणंदसाठी राखीव ठेवला गेला. मंगळवार व बुधवार उत्तरायण झाल्यानंतर लगेचच गुरूवारी आणंदला भेट देणे शक्य होते.

१५ ऑगस्ट इ.स.२९४७ चे आवाहन आणि अभिनंदन संदेश

लेखक माहितगार यांनी सोमवार, 03/02/2014 07:47 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार आपणा सर्वांनाच माहिती आहे की १९४७ मध्ये झालेली भारताची फाळणी एक दुर्दैवी घटना होती. पाकीस्तान आणि बांग्लादेशात विभक्त झालेले प्रदेश भारतात उद्या परत आले तर तेही आपल्याला हवेच आहे. जर जर्मनीच पुर्नएकीकरण होऊ शकत व्हिएतनामच होऊ शकत तर भिविष्यातल्या कोणत्यातरी शुभ मुहूर्तावर एक ना एक दिवस पाकीस्तान आणि बांग्लादेशही भारतात येतील अशी आशा करता येईलच. या धाग्याच्या उद्दीष्टाकरता हे शांततामय मार्गाने होत आहे अस गृहीत धरून चालू (इतर मार्गांच्या चर्चेकरता वेगळा धागा काढला जाण्यास माझी ना नाही.) १ अ) समजा तुम्ही एक सामान्य भारतीय नागरीक आहात.

अमेठीची शेती

लेखक गंगाधर मुटे यांनी सोमवार, 03/02/2014 00:26 या दिवशी प्रकाशित केले.
अमेठीची शेती

सांगा कशी फ़ुलावी, तोर्‍यात कास्तकारी
वाह्यात कायद्यांच्या लोच्यात कास्तकारी

देशात जा कुठेही, भागात कोणत्याही
सर्वत्र सत्य एकच; तोट्यात कास्तकारी!

झिजत़ात रोज येथे, तिन्ही पिढ्या तरी पण;
दारिद्र्य-अवदसेच्या विळख्यात कास्तकारी

कांदा हवा गुलाबी, स्वस्तात इंडियाला
जावो जरी भले मग, ढोड्यात कास्तकारी

पोसून राजबिंडे; आलू समान नेते
उत्पादकास नेते, खड्ड्यात कास्तकारी

सत्ता सुकाळ शेती, बारामती-अमेठी

(व्हॅलेंटाईन डे म्हणलं की निसर्गातील सर्व घटकांना त्रास द्यायला हवा का?)

लेखक विकास यांनी रविवार, 02/02/2014 23:00 या दिवशी प्रकाशित केले.
लेखाची प्रेरणा ही आणि इतर अनेक. :) बरेच दिवस लिहायचे डोक्यात होते पण राहून जात होते. आता फेब्रुवारी महीना उजाडला म्हणल्यावर जगभर व्हॅलेंटाईन डे चे वारे वाहू लागतात त्यामुळे ही वेळ, या संदर्भातील विचार व्यक्त करण्यास आणि विचारांचे आदानप्रदान करण्यास योग्य आहे; असे वाटत असल्याने आता लिहीत आहे. मिपाकरांनो, कृपया गैरसमज नसुंदेत, पण "आक्षेप हा व्हॅलेंटाईन डे साजरा करण्यासंदर्भात नसून, साजरे करण्याच्या पद्धतीबद्दल आहे". कारण चुकीच्या पद्धतीमुळे निसर्गातील सर्व घटकांना त्रास होतो.

'अद्वैत'

लेखक drsunilahirrao यांनी रविवार, 02/02/2014 19:08 या दिवशी प्रकाशित केले.
'अद्वैत' खांद्यावर रूळते कुंतल बट नादान ओठावर हलके स्मीत : कळ्यांचे रान ! क्षण एक अडकतो मत्स्य जसा जाळ्यात नयनातुन उसळे इंद्रधनुष्यी बाण ! जणू संगमरवरी आरस्पानी कात वक्षात धपापे चंद्र नवा बेभान मनी बधीर भुंगा : भरकटतो विरक्त रात्रीस कवळते आसक्ती वैराण ! नागीण विराजे लवलवती देहात रक्तातुन तुटती तीव्र विजेचे ताण ! श्वासातुन उसळे राग असा बेफाम रात्रीला छळते दूर उषेचे गान बेशीस्त र्रुतुंच्या उजाड भिंतीवरती अस्वस्थ उगवती लवलवती हे प्राण । गात्रात विरघळे गात्र असे बेफाम देहात विजेचा लोळ उसवतो त्राण । अंधार युगांचा असा झळाळुन येतो, प्रीतीत निथळते अद्वैताचे दान। डॉ.

काळा घोडा फेस्टिवल कट्टा .... ८/२/२०१४

लेखक मुक्त विहारि यांनी रविवार, 02/02/2014 14:21 या दिवशी प्रकाशित केले.
प्रिय मिपाकरांनो, कसे आहात? रविवारचे जेवण कसे झाले? वामकुक्षी झाली असेलच किंवा वामकुक्षीच्या तयारीत असालच. कळवण्यास अत्यंत आनंद होत आहे, की , आपला हेमांगी के ह्यांच्या बरोबरचा डोंबिवली कट्टा छान पार पडला.प्रथे प्रमाणे पुढील कट्ट्याची योजना पण लगेच तयार झाली. तर मंडळी, आपला पुढील कट्याची योजना / रुपरेखा देत आहे. वार : शनिवार दिनांक : ०८ फेब्रुवारी २०१४ वेळ : भेटण्याची वेळ सकाळी ९ वाजता.बरोब्बर ९:१५ मिनिटांनी भ्रमणास सुरुवात होईल. भेटण्याचे ठिकाण : छत्रपती शिवाजी टर्मिनस पहायच्या गोष्टी , काळा घोडा फेस्टिवल आणि मग फोर्ट मधल्या सुंदर आणि भव्य इमारती. आणि हे सगळे दाखवाय