(व्हॅलेंटाईन डे म्हणलं की निसर्गातील सर्व घटकांना त्रास द्यायला हवा का?)
लेखाची प्रेरणा ही आणि इतर अनेक. :)
बरेच दिवस लिहायचे डोक्यात होते पण राहून जात होते. आता फेब्रुवारी महीना उजाडला म्हणल्यावर जगभर व्हॅलेंटाईन डे चे वारे वाहू लागतात त्यामुळे ही वेळ, या संदर्भातील विचार व्यक्त करण्यास आणि विचारांचे आदानप्रदान करण्यास योग्य आहे; असे वाटत असल्याने आता लिहीत आहे. मिपाकरांनो, कृपया गैरसमज नसुंदेत, पण "आक्षेप हा व्हॅलेंटाईन डे साजरा करण्यासंदर्भात नसून, साजरे करण्याच्या पद्धतीबद्दल आहे". कारण चुकीच्या पद्धतीमुळे निसर्गातील सर्व घटकांना त्रास होतो. यात मानव, त्यातही "पुरूषमाणूस" हा देखील निसर्गाचा घटक असल्याचे विशेष करून लक्षात ठेवलेले आहे.
या दिवसाच्या निमित्ताने गुलाबांच्या फुलांची अक्षरशः कत्तल होते. दुसर्या दिवशी नुसती सुकलेली फुलेच रहातात. आता हे कोणी देवाला वाहीलेल्या फुलांच्या आणि नंतर त्याचे होणार्या निर्माल्याच्या बाबतीत पण होते, मग येथे झाले म्हणून काय बिघडले असे देखील म्हणू शकतात. थोडक्यात काय आम्ही पण आमचा खारीचा वाटा उचलणार असे म्हणायचे झाले!
या दिनाचा अजून एक आक्षेपार्ह भाग असतो, तो म्हणजे चॉकलेट्सचा. किती ती चॉकलेट्स आणि किती त्यांचे ते प्रकार! बरं त्यात नको इतकी साखर असते, नको इतके अधिक स्निग्धांशाचे दूध असते. त्याचे परीणाम हे पूर्वपश्चिम वृद्धीसाठी शरीरावर होतात. त्या व्यतिरीक्त चॉकलेट्च्या चांद्या, चकचकीत कागदांनी केलेले त्यांचे खोटे खोटे गुच्छ वगैरे मुळे सर्व कागदांचा कचरा होतो ज्याने आधीच कमी पडत असलेल्या जागेवर कचरा झाल्याने वाढ होते. तुम्ही म्हणाल आता एका चांदीने काय फरक पडतो? पण असा विचार करा की व्हॅलेंटाईन दिन हा विशेष करून तरूणाईमधे प्रिय आहे. (कालांतराने काय होते माहीत नाही, पण तो वेगळ्या चर्चेचा मुद्दा आहे). आता भारतात आजमितीस मला वाटते साधारण ४३-४४ कोटी तरूण जनता भारतात आहे. आता इतक्या जनतेने एक चॉकलेट खाल्ले, एक गुलाब वापरला, तर किती कचरा होणार याचा विचार करा! त्यात अजून बाहेरचा खाण्याचा आणि पिण्याचा खर्च गृहीत धरा...
आता अजून एक महत्वाचा मुद्दा: व्हॅलेंटाईन डे चे निमित्त करून केवळ सभोवतालच्या हरीत निसर्गालाच त्रास सहन करावा लागतो असे नाही तर या दिनाचे निमित्त होऊन निसर्गातील पुरूषप्राणी अधिकच दीन होतो. असा निसर्गाला त्रास देण्याचे काम हे त्याच्या माथीच येते. का? तर त्यावरून प्रेमाची किंमत ठरणार असते? पण ज्या गोष्टींचा दुसर्या दिवशी कचरा होतो अथवा प्रेमापेक्षा शरीरच पूर्व-पश्चिम वृद्धींगत होऊ शकते त्यातून प्रेमाची किंमत कशी बरं ठरवता येते?
पण अशी नुसतीच टिका करत बसण्याऐवजी, काही गोष्टी या निमित्ताने एकमेकांना सुचवाव्यात असे वाटते. अजून १० पेक्षा अधिक दिवस व्हॅलेंटाईन दिनास राहीले आहेत. तो पर्यत या जुनाट पद्धतीत बदल करण्याचा खोक्याबाहेर विचार करता येईल असे वाटते...
सर्व प्रथम, प्रेम हे एका दिवसासाठी निव्वळ शोऑफ अर्थात दाखवायची वस्तू नाही हे ध्यानात घ्या. आपल्या सहचारी व्यक्तीस तसे ते नुसते दाखवत न बसता ते दिवसेंदिवस वृद्धींगत कसे होत आहे हे देखील समजूंदेत. त्यासाठी निसर्गाची हानी करणार नाही अशी प्रत्येकाने प्रतिज्ञा घेतली पाहीजे. समाजात वजन वाढणे महत्वाचे असते, पण त्यासाठी चॉकलेट्स आणि बाहेरचे अरबटचरबट खाणे-पिणे योग्य आहे का ह्याचा देखील विचार करा. त्या ऐवजी आपल्या सहचारी व्यक्तीस घरीच साधा स्वैपांक करायची गळ घालून त्याचे मनमोकळेपणाने कौतुक करा. त्यातून प्रेम पण कळेल, गुलाब पण द्यावे लागणार नाहीत आणि चॉकलेट्स आदींचे परीणाम पण भोवणार नाहीत.
बघा विचार करा आणि अजून देखील काही सुचवता आले तर या धाग्यात अवश्य सुचवावेत ही विनंती
वाचने
8430
वाचनखूण
प्रतिक्रिया
37
ओ विकासदादा, चॉकलेटला अणि
In reply to ओ विकासदादा, चॉकलेटला अणि by यशोधरा
यशोआत्याशी एकदम सहमत!!!
चित्राताईचं यावरचं मत कळवा ना
खुसखुशीत
विडंबन कुठे आहे ?
हा तर इंपोर्टेड फेस्टीव्हल
In reply to हा तर इंपोर्टेड फेस्टीव्हल by मदनबाण
हा तर इंपोर्टेड फेस्टीव्हल
In reply to हा तर इंपोर्टेड फेस्टीव्हल by सुनील
हेच म्हणतो.
In reply to हेच म्हणतो. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
वसंत पंचमी
In reply to हा तर इंपोर्टेड फेस्टीव्हल by सुनील
पण प्रेमी युगुलांसाठी कुठला
In reply to पण प्रेमी युगुलांसाठी कुठला by मदनबाण
खिक्
In reply to खिक् by सुनील
+100
In reply to +100 by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
मग हेच रक्षा बंधन, भाऊबीज,
In reply to मग हेच रक्षा बंधन, भाऊबीज, by मदनबाण
जगभर या एका नव्या संस्कृतीची
In reply to जगभर या एका नव्या संस्कृतीची by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
धावपळी च्या काळात निमित्तानं
In reply to धावपळी च्या काळात निमित्तानं by मदनबाण
असू दया ना यार...
In reply to असू दया ना यार... by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
पण काहींना निमित्त लागतं राजा
ओ असं नै करायचं हं. :)
हो
हाहाहा!
In reply to हाहाहा! by पैसा
अवांतर पण महत्वाचा प्रश्न
In reply to अवांतर पण महत्वाचा प्रश्न by विकास
रिसर्च पेपर. ;)
In reply to रिसर्च पेपर. ;) by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
धन्स!
In reply to धन्स! by पैसा
अगदी बरोबर.....
In reply to रिसर्च पेपर. ;) by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
हेतू
In reply to हेतू by विकास
व्हॅलेंटाईनकडून कुठलिही
विडंबनच समजू की थोडं शिरीअशली
In reply to विडंबनच समजू की थोडं शिरीअशली by वडापाव
प्रतिसाद वगळण्यास मिपा संपादकांना अंमळ संमती
In reply to विडंबनच समजू की थोडं शिरीअशली by वडापाव
नको
हा हा हा हा
इथे यात मानव, त्यातही
In reply to इथे यात मानव, त्यातही by कवितानागेश
बघा नं!
हा धागा सीरिअस्ली वाचला,
फिरून फिरून चॉकलेट्स चा
हं अमंळ चुकतंच
In reply to हं अमंळ चुकतंच by प्रमोद देर्देकर
>>>त्यांना (म्हणजे
आमच्या डोंबिवलीतल्या