Skip to main content

'अद्वैत'

लेखक drsunilahirrao यांनी रविवार, 02/02/2014 या दिवशी प्रकाशित केले.
'अद्वैत' खांद्यावर रूळते कुंतल बट नादान ओठावर हलके स्मीत : कळ्यांचे रान ! क्षण एक अडकतो मत्स्य जसा जाळ्यात नयनातुन उसळे इंद्रधनुष्यी बाण ! जणू संगमरवरी आरस्पानी कात वक्षात धपापे चंद्र नवा बेभान मनी बधीर भुंगा : भरकटतो विरक्त रात्रीस कवळते आसक्ती वैराण ! नागीण विराजे लवलवती देहात रक्तातुन तुटती तीव्र विजेचे ताण ! श्वासातुन उसळे राग असा बेफाम रात्रीला छळते दूर उषेचे गान बेशीस्त र्रुतुंच्या उजाड भिंतीवरती अस्वस्थ उगवती लवलवती हे प्राण । गात्रात विरघळे गात्र असे बेफाम देहात विजेचा लोळ उसवतो त्राण । अंधार युगांचा असा झळाळुन येतो, प्रीतीत निथळते अद्वैताचे दान। डॉ. सुनील अहिरराव
लेखनविषय:

वाचने 1279
प्रतिक्रिया 2

प्रतिक्रिया