Skip to main content

फन एंड फ़ेअर

लेखक अद्द्या यांनी सोमवार, 02/03/2015 19:06 या दिवशी प्रकाशित केले.
हा एक लई भारी प्रकार असतो . गेली कित्येक वर्षे गेलो नवतो . मला वाटतं , ६-७वीत असेन. शेवटचा अशा कोणत्या गोष्टीला गेलो असेन कोणाबरोबर ते. . गावात दर वर्षी उन्हाळ्यात आधी सर्कस आणि मग फन फ़ेअर , काही ना काही येतच . नोवेंबर डिसेंबर पर्यंत डेरा असतो या लोकांचा गावात . घरी लहान बहिण या दोन्ही पैकी एकी कडे जाण्याबद्दल मला विचारून विचारून कंटाळून रडून शेवटी माझा नाद सोडून द्यायची . प्रत्येक वेळी तिला म्हणायचो . मोठी झालीस आता . लहान मुलांचे नाद सोड . पण तरीही त्यादिवशी पोचलो तिथे . काय आहे . बहिणीला नकार देणे सोप्प असतं हो . पण समोर एक अति गोड प्रकारात मोडणारी मुलगी थांबली अहे.

विज्ञान कथा: "अपूर्ण स्वप्न"

लेखक निमिष सोनार यांनी सोमवार, 02/03/2015 17:56 या दिवशी प्रकाशित केले.
शंभू शेवाळे हा माझा परम मित्र. पुण्यात असतो. मी मुंबईला बँकेत नोकरीला लागलो आणि मध्यमवर्गीय मानसिकतेतून आपला संसार सांभाळायला लागलो. माझी पत्नी घर सांभाळते आणि मला आठ महिन्यांचा मुलगा आहे. शंभू लहानपणापासून संशोधक वृत्तीचा. त्या वृत्तीमुळेच तो आज मोबाईल अॅप्लीकेशन बनवणार्‍या एका कंपनी चा मालक बनला आहे. अजूनही तो स्वतः अनेक अॅप बनवत असतो. मला लहानपणापासून अंतराळवीर बनण्याचे स्वप्न होते. आकाशातल्या ग्रहतार्‍यांचे खूप आकर्षण वाटे. अर्थात परिस्थिती मुळे स्वप्न पूर्ण होवू शकले नाही.

प्रकोप

लेखक Maheshswami यांनी सोमवार, 02/03/2015 17:48 या दिवशी प्रकाशित केले.
२९ सप्टेंबर १९९३ -----------------------------------------१---------------------------------- "गोदावरी जगताप !", नर्सने नाव पुकारताच एकदम भानावर आली ती. अगदी हायसं वाटलं तिला. वाट बघून बघून कंटाळा आला होता. सकाळी नऊ वाजल्यापासनं वाट बघत होती ती. २ तासांनी आत्ता कुठे नम्बर आला होता तिचा. देशपांडे बाईंकडे नेहमी अशीच पेशंटची रीघ असायची. आत घाबरत घाबरतच गेली , देशपांडेबाई मान वर न करताच म्हणाल्या "बस गं , गोदावरी!" "म्याडम, जाउद्या मी उभीच बरी हाय. काय रिझल्ट आला ओ त्या टेष्टचा?" "पेढे दे गोदे ! पेढे ! पोटुशी आहेस तू ! मुल होणार आहे तुला !" आनंद गगनात मावेना गोदावरीचा ते ऐकून.

क्लिकक्लिकाट !

लेखक चिनार यांनी सोमवार, 02/03/2015 17:27 या दिवशी प्रकाशित केले.
नवरा- बायको रम्य अश्या एखाद्या हिल स्टेशन वर आलेले आहेत. छानशी संध्याकाळ झालेली आहे . गार वारा घोंगावतोय. निसर्ग सौंदर्य अगदी दृष्ट लागण्याइतकं मनमोहक आहे. इतक्या रम्य वातावरणामुळे असेल कदाचित पण नवऱ्याला कधी नव्हे ती बायको सुंदर दिसतेय. अशातच त्याला 'आज मौसम बडा बेईमान हैं' गुणगुणाव वाटतंय. तेवढ्यात ती म्हणते," चल ना फोटो काढू " पुढची पूर्ण संध्याकाळ तो तिचे, स्वत: चे ,त्यांचे फोटो काढतोय. त्या दोघांनी केलेली बेईमानी सहन न होऊन मौसम निसर्गाशी ईमान राखून शांत झालेला आहे ! वरील प्रसंग ओळखीचा वाटतोय का ? या सारखे कितीतरी प्रसंग आजकाल तुम्ही आसपास बघत असाल.

शेअर गुंतवणुकीला जुगार म्हणणे योग्य आहे का?

लेखक मार्मिक गोडसे यांनी सोमवार, 02/03/2015 16:46 या दिवशी प्रकाशित केले.
माझे बाबा घरूनच ऑनलाईन शेअर ट्रेडिंग करतात. एके दिवशी बाबांबरोबर मी शेअर ट्रेडिंगचे लाइव ट्रेनिंग घेत असताना बाबांचा मित्र घरी आला, माझ्या डोक्यात टपली मारली व म्हणाला जुगाराचे ट्रेनिंग चाललेय वाटत ? बाबा गालातल्या गालात हसले, त्यांनी आपली खुर्ची स्क्रीनपासून बाजूला घेतली व ट्रेडिंगची सूत्रे माझ्याकडे दिली. मित्राला बसावयास खुर्ची दिली. (बाबांचे हे मित्र विज्ञानाचे पदवीधर होते परंतू गावाकडे वडिलोपार्जित २५-३० एकर शेती होती व शेतीची आवड असल्यामुळे त्यांनी शेती हाच व्यवसाय स्वीकारला आज ते यशस्वी बागायतदार म्हणून ओळखले जातात.) बाबांनी आपला मोर्चा मित्राकडे वळवला.

पाऊस....तो ....

लेखक psajid यांनी सोमवार, 02/03/2015 16:39 या दिवशी प्रकाशित केले.
वैशाख वणवा मनांत माझ्या, दोन पावसाळे आले, येउनी त्यांनी जीवनी मला, अर्थी दोन्हीं भिजवले !! कोसळत्या सरीबरोबर रूप , सखये असे बरसत गेले, तुला स्वतःत सामावताना , आकाश हाती आले !! वैशाख वणवा मनांत माझ्या .............. कुंतलात मुख अवचित, मेघ दाटुनी आले स्वर्गसुखास करीत खुजे, तेंव्हा भूमिगंध बरसले !! त्या वर्षावास जसे मी , तुझ्याबरोबर अनुभवले, थांबता पाऊस ते दु:खही, मी मदिरेसवे रिचवले !! तळ्याकाठी रडे प्राजक्त, मुकी का सान झुले, बहारही मग सोडी धर्म, विषन्न पाने फुले !! वैशाख वणवा मनांत माझ्या .............. तोही बरसला पाऊस, मन ज्याला न विसरले, पहिल्यासवे त्याचेही , हृदयाने स्वागत जंगी केले !!

भारत

लेखक जयंत माळी यांनी सोमवार, 02/03/2015 16:36 या दिवशी प्रकाशित केले.
वर्ल्डकप चालु होण्याआधी सगळ्याच भारतीयांना वाटत होते की आपली टीम लवकरच बाहेर पडणार पण हे सगळी चित्र भारताने 3 मँचेस जिंकुन पालटले. 3 महिने आधी तिथे जाऊन राहिल्याने आपली टीम तेथील हवामानाशी जुळली आहे पण इतर टीमनां याचा फटका बसतोय.

इराणचा अणूकोन

लेखक माहितगार यांनी सोमवार, 02/03/2015 16:10 या दिवशी प्रकाशित केले.
आमेरीकेचे अध्यक्ष बराक ओबामांचे निमंत्रण नसतानाही इस्राएलचे पंतप्रधान आमेरीकी काँग्रेसपुढे भाषण करणार आहेत.

आख्खा मसुर

लेखक जयंत माळी यांनी सोमवार, 02/03/2015 15:49 या दिवशी प्रकाशित केले.
मला खुप आवडतो म्हणून शिकलो कराडचा स्पेशल "आख्खा मसूर" साहित्य :- भिजवून फुललेले मसूर दीड वाटी (साधारण अर्धी-पाऊण वाटी कोरडे भिजवावे लागतील, ७-८ तासांसाठी) एक मोठा कांदा - बारीक चिरून एक मध्यम टोमॅटो - बा.चि. टोमॅटो प्युरे - दोन मोठे चमचे कांदा-लसूण मसाला - तिखटाच्या आवडीनुसार हिंग, हळद, मोहरी - फोडणीसाठी तेल, मीठ कृती मसूर कुकरमधे वाफवा. दाणे अखंड आणि वेगळे राहिले पाहिजेत. (म्हणूनच अख्खा मसूर नाव?) तेल तापवून फोडणी करा. कांदा लाल होईपर्यंत परतून घ्या. टोमॅटोही परता.