Skip to main content

व्यक्ती स्वतंत्र

लेखक निनाद जोशी यांनी बुधवार, 04/03/2015 14:27 या दिवशी प्रकाशित केले.
व्यक्ती स्वतंत्र हा सध्याचा फारच ज्वलंत मुद्दा आहे. प्रत्तेक माणूस आपण जे काही करू त्याला व्यक्ती स्वातंत्र्याची जोड लाऊन ते बरोबरच आहे हे पटवण्याचा प्रयत्न करतो. हे व्यक्ती स्वातंत्र्य नक्की आहे तरी काय??? ह्याला काही मर्यादा आहेत का नाहीत??? आज मणिशंकर अय्यर सारखा माणूस अफझल गुरुला दिलेली फाशी हि निष्कारण होती आणि तो दोषी आहे हे निश्चित झाले नव्हते असे म्हणू शकतो. एक चित्रकार भारतमातेचे नग्नचित्र भारतात राहून काढू शकतो. एक लेखक दिग्दर्शक भारतात राहून भारतीय फौजेला गुन्हेगार ठरवणारा आणि स्वतंत्र काश्मीरला समर्थन देणारा चित्रपट काढतो. ह्या सगळ्याला व्यक्ती स्वातंत्र्य म्हणणे योग्य ठरेल का????

ती मात्र ............

लेखक एक एकटा एकटाच यांनी बुधवार, 04/03/2015 13:31 या दिवशी प्रकाशित केले.
हल्ली ती कुणाशी बोलत नाही गप्प असते घुम्यासारखी बघत रहाते तिचं कोरडं आभाळ मग बरसत जाते सरीसारखी सोडवताना प्रश्नांच्या नाजुक गाठी ती मात्र अडकत जाते...............गुंत्यासारखी त्याच्या नजरेतली तिची ओळख आता तिला गवसत नाही काय्,कसे,कुठे बिनसले छेडता मनाला उमगत नाही चुकुन रेंगाळलेल्या त्याच्या प्रतिबिंबामागे ती मात्र धावत रहाते.................वेड्यासारखी त्याने नाकारलेली प्रत्येक आठवण तिचा पदर काही सोडत नाही त्याला घातलेली हरएक साद फिरुनी माघारी कधी येत नाही एकाकीपणाच्या या खोल दरीत ती मात्र साचुन रहाते.................धुक्यासारखी तिच्या स्वप्नांतली त्याची रात्र आता तिच्यासवे जागत नाही विरु

आमच्या विवाहाची कहाणी

लेखक सुबोध खरे यांनी बुधवार, 04/03/2015 10:35 या दिवशी प्रकाशित केले.
आमच्या विवाहाची कहाणी ता क -- यात कोणतीही अतिशयोक्ती नाही किंवा सनसनाटी घटना, उत्कंठावर्धक असे काव्य असे काहीच नाही. म्हणजे झाले असे कि मी लष्करात( नौदलात) डॉक्टर म्हणून विक्रांत या जहाजावर तैनात होतो. वय वर्षे २५(१९९० ची गोष्ट). मुळात आमच्या आईचे म्हणणे असे होते कि घरापासून लांब राहणार तेंव्हा वेळेत लग्न झालेले बरे. पण मला एक, एक वर्षाने मोठा भाऊ( इंजनेर) आहे. आणी त्याचे नुकतेच लग्न झाले होते म्हणजे पाच वर्षे नोकरी करून झाल्यावर धंदा चालू केलेला होता आणि नोकरी सोडण्या अगोदर लग्न केलेले बरे अशा विचाराने त्याचे २६ व्या वर्षी लग्न केले.

छायाचित्रणकला: स्पर्धा क्र. ८: " चतुष्पाद प्राणी"

लेखक संपादक मंडळ यांनी बुधवार, 04/03/2015 09:05 या दिवशी प्रकाशित केले.
छायाचित्रणकलेच्या १७५ व्या वाढदिवसानिमित्त स्पर्धा क्र. ८: "चतुष्पाद प्राणी" *************************************************************************************** छायाचित्रणकला स्पर्धा क्र. १: मानवनिर्मित स्थापत्य छायाचित्रणकला स्पर्धा क्र. २: "आनंद" छायाचित्रणकला स्पर्धा क्र. ३: ऋतु (Seasons) छायाचित्रणकला स्पर्धा क्र.

लायब्ररी लव 2

लेखक mohite jeevan यांनी बुधवार, 04/03/2015 08:06 या दिवशी प्रकाशित केले.
लायब्ररी लव 2 'डस्टी ये आपण थोडे काम करुया, ' डस्टीला पुस्तक रॅक च्या खाली बसलेली पाहून म्हणाले , डस्टी माझ्या कडे पाहून आळसामुळे हळुच डोळे उघड झाक करू लागली, मी रॅक च्या खाली हात घालुन तीला माझ्याकडे ओढले व तीला घेऊन उभी राहीले.  हातात तीला घेता डस्टीने मोठी जांभई दिली व अचानक तीने उंदराचे पिटुकले  पाहून माझ्या हातातुन उडी मारून त्या उंदराच्या मागे धावू लागली. मी तीच्या मागे गेले पण मला ती कोठेच दिसेनासी झाली. ' डस्टी तु कोठे आहेस?,' मी हळु आवाजात म्हणाले' 'माईऊ ..माईऊ....',मी तीचा अवाज काढुन बोलवू लागले.

बिडी काडी

लेखक सुचिकांत यांनी मंगळवार, 03/03/2015 19:57 या दिवशी प्रकाशित केले.
माझे मूळ गाव थेऊर(चिंतामणीचे). तसे उरुळी कांचन (जिथे गांधीजींचा निसर्गोपचार आश्रम आहे) पण बालपण थेऊर मधेच गेले. आई-वडील तिथल्याच हायस्कूल मध्ये शिक्षक म्हणून नोकरीला होते. आम्ही d-type चाळीमध्ये मध्ये रहायचो. साखर कारखान्याने ही चाळ बांधली होती. भरपूर मित्र. गोट्या, सूरपारंब्या, कांदाफोड, क्रिकेट, विष अमृत, लपाछपी, अप्पाराप्पी, शिवाजी म्हणतो, donkey-monkey, विटी दांडू, असे अनेक खेळ आम्ही खेळायचो.

गोवंशहत्या बंदी

लेखक अत्रन्गि पाउस यांनी मंगळवार, 03/03/2015 18:21 या दिवशी प्रकाशित केले.
अलीकडच्या काळातील एक मैलाचा दगड ठरावा असा कायदा ... एकीकडे गाय हि माता तिचे पावित्र्य ..आयुर्वेदिक महत्व ... दुसरीकडे 'गाय हा पशू ..देव नव्हे' हे आमच्या आदरणीय स्वातंत्र्यवीर सावरकरांची स्पष्टोक्ती ... तिसरीकडे ते वेन्दांचे दाखले "अनुस्तरणी कर्म ...चर्मण्वती शब्दाची व्युत्पत्ती" चौथीकडे अन्य धर्मातील त्याज्ज्य प्राणी खाण्याब्द्दल्ची कठोर आचारसंहिता .. त्यातून शाकाहार मांसाहार वाद ...

तपकिरी डोळे

लेखक म्हया बिलंदर यांनी मंगळवार, 03/03/2015 18:04 या दिवशी प्रकाशित केले.
"काय रे? काय करतोस ईथे?" एका रांगड्या आवाजाने विचारले. मी हबकलो, घाबरलो. काहीतरी बोलायचं म्हणून, "म्म..म..मी.." "अरे तू इथे कसा? काही शोधतोयस का? बाबा हा माझ्याच वर्गातला आहे." रांगडा आवाज "हूं " म्हणून नाहीसा झाला. हलके कुरळे केस सावरीत तिने पुन्हा विचारले, "काही शोधत होतास का?" माझ्या तोंडून चटकन निघालं "तूलाच" ती थोडी आश्चर्याने "काय?" "अं.. तूलाच सपना तायडेने ईंग्लीशच्या नोट्स दिल्यात ना! त्या हव्या होत्या" मी कसा बसा हे सगळं बोललो असेन. ती "हो दिल्यात. हव्या आहेत का?" मि "हो." ती "ये ना. ईथेच घर आहे." मि एक पाऊल टाकून दचकलो आणि "न्न.. नको." म्हणालो.

माझी काझिरन्गा सफर

लेखक खंडेराव यांनी मंगळवार, 03/03/2015 17:53 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार. मिसळपाव वरिल हा पहिलाच लेख. अजुन मराठी लिहिणे शिकत आहे, चुकिन्बद्दल माफी असावी. आसाम मधे एकटाच काही कामासाठी पोहोचलो. एक दिवस रविवारची सुट्टी मिळाली. स्थानिक मित्राने काझिरन्गा पहान्याचा सल्ला दिला. तसा मी आपखुश असल्यामुळे एकटाच जाण्याचा निर्णय घेतला. गुवाहाटी ते काझिरन्गा अन्तर जवळ जवळ २०० किमी. रस्ता अगदी चान्गला, बराचसा मुबई पुणे सारखा आहे. बसेस सतत चालू असतात. ४ तासात कोहरा येथे पहोचलो, जे अभयारन्याचे प्रमुख दार आहे. रस्त्यावर खुप सारी होटेल्स व गेस्ट होउसेस आहेत. एकटाच असल्यामुळे जे पहिले दिसले तिथे ९०० रुप्यात खोली घेतली. घोडचुक झाली. रात्रभर गाड्याचे आवाज.