Skip to main content

शतशब्दकथा

लेखक चुकलामाकला यांनी रविवार, 26/07/2015 14:36 या दिवशी प्रकाशित केले.
डोकं ज्याम भणाणून गेलंय . काहीच सुचत नाहीय . पेट्रोलपण संपत आलंय . येताना भरु . सिग्नलपाशी ८० ccवर लोवेस्ट पुढे जायचं ट्राय करतेय . इतर वेळी ऐश वाटली असती पण आज राग येतोय ,च्यायला बुलेटशी स्पर्धा करते? जी झुम्मकन काढली . तिने घाबरून ब्रेकच मारला . आज ऑफिसात पण काय खरं नाय . पीएल उलटसुलट बोलला तर आपलं नक्की वाजणार . दुसरा सिग्नल . पण काहीतरी सुचायलाच हवं . १०० च टार्गेट आहे . १०, ९, यावेळी ५० तरी रिप्लाय हवेत . ६, ५, चला. सुटुया …. झू …… क्रीश्श आई ……………………… .. .. .. .. .. जाग आली ती हॉस्पिटलात . सर्व अंगच प्लास्टरमध्ये गुंडाळलेलं . एकदम ट्यूब पेटली .

आमचाही पाउस.....

लेखक ज्ञानोबाचे पैजार यांनी रविवार, 26/07/2015 12:10 या दिवशी प्रकाशित केले.
मित्रहो, मिपावर सुंदर कवितांचा एवढा पाउस पडतो आहे की सारे वातावरणच बदलले. त्यातच संमं ने पण छायाचित्रकलास्पर्धेचा विषयपण पाउस निवडला आणि मग हे कवी लोक जास्तच पेटले. आमची प्रकृती थोडी नाजुकच. या बदललेल्या वातावरणाचा नाही म्हटले तरी परिणाम होतोच. काल रात्री शेवटी विडंबनारीष्ट घेउन झोपावे लागले. तेव्हा कुठे सकाळी मोकळे मोकळे वाटले. फ्रेश झाल्यावर ठरवले की चला पावसाळ्यात थोडी रंगपंचमी खेळूया...

रीत

लेखक बिपिन कार्यकर्ते यांनी रविवार, 26/07/2015 11:30 या दिवशी प्रकाशित केले.
शहरात राहून आपण आपल्या जाणिवा विसरलोय, वगैरे उगाच लंब्याचौड्या उच्चभ्रू बाता मी मारणार नाही. पण शहरात राहून मी गावातल्या जीवनापासून युगानुयुगांच्या अंतराइतका दूर आहे हे मात्र नक्कीच. अर्थात, हे साहजिकच आहे. त्यात काही फार चांगलं किंवा फार वाईट असं नाहीच. पुण्यात राहून अमेरिकेतलं जीवन अनोळखी आहेच की. अडीचशे किलोमीटरवर असलेलं माझ्या वाडवडीलांचं गावसुद्धा आता मला अनोळखीच. (अमेरिकाच जवळची तुलनेने.) मागच्या आठवड्यात गावाला जायचा योग आला. रस्त्यात असताना एका मित्राबरोबर व्हॉट्सपवर काही तरी टिवल्या बावल्या चालू होत्या. गावात कसं सगळं इनोसंट, छान छान असतं असा काहीसा सूर त्याने लावला होता.

गोषवारा

लेखक drsunilahirrao यांनी शनिवार, 25/07/2015 18:46 या दिवशी प्रकाशित केले.
हा कशाला गोषवारा पाहिजे फक्त थोडासा इषारा पाहिजे माणसाला अन्न वस्त्रे खोपटे शासनाला शेतसारा पाहिजे श्वासही आहेत चोरासारखे जिंदगानीवर पहारा पाहिजे हात या राखेतही टाकेन मी पोळणारा पण निखारा पाहिजे जीव ओवाळून टाकावा असा जीव कोणी लावणारा पाहिजे घोषणांची केवढी बुजबुज इथे- देशव्यापी एक नारा पाहिजे माणके मोती हिरे सगळीकडे फक्त माती खोदणारा पाहिजे काजवे उसने किती आणायचे आपुला कोणी सितारा पाहिजे टाक तू कचरा पुरेसा अंगणी स्वच्छतेसाठी पसारा पाहिजे डॉ.सुनील अहिरराव
काव्यरस

ठाणाळे लेणी

लेखक जय२७८१ यांनी शनिवार, 25/07/2015 17:50 या दिवशी प्रकाशित केले.
ठाणाळे लेणी 18 डॉल्फिन्स ग्रुपच्या बाईक सफर, ट्रेक म्हणजे आता आमच्या जीवनाचा एक अविभाज्य भागच बनला आहे. वर्षाकाठी एक १० दिवसाची हिवाळी बाईक टूर अन एक पावसाळी ३ दिवसाची बाईक सफर हि परंपरा गेले कित्येक वर्षे चालू आहे. गड किल्ल्यांच्या सफरी, डोंगर दऱ्यांमध्ये उनाडकी, बाईकवर गावो पाडी भटकंती हाच आमचा जीवनानंद झाला आहे.(आता तर हे आमच्या बायको-मुलांच्या हि अंगवळणी झाले आहे) अश्याच एका पावसाळी बाईक टूरची आठवण मनावर अगदी कोरली गेली आहे.

गादी - २

लेखक संजय पाटिल यांनी शनिवार, 25/07/2015 17:19 या दिवशी प्रकाशित केले.
भाग १ सर्व प्रतिसादीत वाचकांचे आणी संपादक मंडळींचे आभार! लेखनाला सुरवात केली तेव्हा वाटलं होतं की फार काही मोठा किस्सा नाहीये. तेव्हा एकच किस्सा लिहून खतम करू म्हणून. पण मग लिहायला लागल्यावर कळतंय किती कठीण काम आहे ते. त्यामुळे जमेल तसे छोटे छोटे भाग टाकतोय. बहिणीकडे जायच्या आदल्या दिवशी संध्याकाळी आई बॅग भरत होती. दोघेच बसने जाणार म्हणून अगदी गरजेपुरते सामान एकच बॅग भरून घेऊन जायचं असं बाबांनी बजावून सांगितल्यामुळे आईचा थोडा गोंधळ उडाला होता. त्यातच कन्येने "मी पण आत्या कडे येणार" असा हट्ट धरला होता. "अगं तुझी शाळा चुकेल ना?

शीर्षक सुचले नाही

लेखक स्वामी संकेतानंद यांनी शनिवार, 25/07/2015 00:22 या दिवशी प्रकाशित केले.
कधी कधी निरर्थका लिहा बघू ज़रा उगा असाच मी लिहूनिया प्रसिद्ध जाहलो जगा असाच खेळ खेळलो पिळून शब्द काढले अजून केस ओढतो कशास काव्य वाचले इथून चार चोरले तिथून चार ढापले करून भेळ चट्पटी विका म्हणून आपले म्हणेल तो बळेबळे, "कळेल त्यांस चांगले" छळेल प्रश्न हो मला, "कशास लोक पांगले?" तुम्ही मला बघूनिया कशास दूर भागता तुम्हास सोडणार का न काव्य हे सुनाविता? पळा पळा छळेन मी विडंबने करेन मी उदार काव्यप्रेमिका कशास लाइका कमी? -- स्वामी संकेतानंद आता मी पळतो..........

द स्केअरक्रो - भाग ‍१३

लेखक बोका-ए-आझम यांनी शनिवार, 25/07/2015 00:15 या दिवशी प्रकाशित केले.
द स्केअरक्रो भाग १२ द स्केअरक्रो भाग १३ (मूळ लेखक मायकेल कॉनेली) अँजेलाला तिथे बघून मला एवढा धक्का बसला की मी प्रतिक्षिप्त क्रियेने मागे झालो आणि माझी पाठ जोराने जवळच्या कपाटाला आदळली. त्याच्यावर एक जुन्या पद्धतीचा, लँपशेड असलेला दिवा ठेवलेला होता. तो खाली पडला आणि फुटला. रॅशेल ओरडली, “ काय झालं जॅक?” मी कसंबसं पलंगाकडे बोट दाखवलं, “अँजेला...ती...ती पलंगाखाली आहे.” रॅशेल माझ्या बाजूला आली आणि तिनेही पलंगाखाली वाकून पाहिलं, “ओ माय गॉड!