पेन्स
आज खूप वर्षांनी रेनॉल्ड्सचा पेन लिहायला मिळाला. हा पेन माझ्या लहानपणी फार चालायचा. माझे बाबा तेव्हा हाच पेन वापरायचे आणि सुरुवातीला हा सोडून दुसरा कुठला पेन आम्हाला माहितसुद्धा नव्हता.
प्राथमिक शाळेत २-३ वर्षे आम्हाला पेन वापरायला चालत नव्हतं. पेन्सिलच वापरावी लागायची. लहान मुलं चुका खूप करतात, आणि त्यांना त्या खोडून सुधारता याव्यात म्हणुन पेन्सिल वापरावी असं सांगायचे. म्हणजे वहीत आणि परीक्षेच्या उत्तरपत्रिकेत खाडाखोड जास्त दिसणार नाही.
मिसळपाव
.
शब्दांमागे धावण्यात
'बघणं' राहूनच गेलं
रस्त्याकडेचं इवलं रोपटं
कुणी न बघताच मेलं
शब्दांचा पसारा हवा
मोर-पिसारा नको
शब्दात उलगडून सांगा
'नुस्तं बघणं' नको
'नुस्त्या' बघण्या-ऐकण्यात
सौंदर्यगंध दरवळतो
समजून घेण्याच्या नादात
तोच नेमका हरपतो
समोर अप्सरा उभी
तिचं आधी नाव सांगा
वय-जात-उंची-शिक्षण
सगळं तपशील्वार सांगा
सांदि-कोपर्यात डुलणारं फूल-
त्यात विशेष क